Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

War Alert: ‘करार मोडला तर सैन्य पाठवू,’ डोनाल्ड ट्रम्प ब्रिटनवर कडाडले; ‘Diego Garcia’वरून हिंद महासागरात रणकंदन

UK-Mauritius Agreement: ट्रम्प यांनी यूके-मॉरिशस करार व्यवहार्य असल्याचे वर्णन केले, परंतु जर दिएगो गार्सियामधील अमेरिकेच्या लष्करी हितसंबंधांना धोका निर्माण झाला तर अमेरिका बळाचा वापर करेल असा इशारा दिला.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Feb 06, 2026 | 01:00 PM
trump warning uk pm diego garcia military force chagos deal

trump warning uk pm diego garcia military force chagos deal

Follow Us
Follow Us:
  • ट्रम्प यांची उघड धमकी
  • यूकेच्या भूमिकेत बदल
  • ९९ वर्षांचा लीज

Trump Diego Garcia military threat 2026 : जागतिक राजकारणात ‘धमकी’ आणि ‘मुत्सद्देगिरी’ यांचा अनोखा संगम करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी आता हिंद महासागरातील अतिशय महत्त्वाच्या दिएगो गार्सिया (Diego Garcia) लष्करी तळावरून खळबळजनक विधान केले आहे. ५ फेब्रुवारी रोजी ब्रिटीश पंतप्रधान केयर स्टारमर यांच्याशी फोनवर झालेल्या चर्चेनंतर ट्रम्प यांनी कराराला पाठिंबा तर दिला, पण सोबतच “बळाचा वापर” करण्याची उघड धमकी देऊन जगाचे लक्ष वेधून घेतले आहे.

काय आहे ट्रम्प यांची ‘मिलिटरी’ धमकी?

ट्रम्प यांनी आपल्या ‘ट्रुथ सोशल’ पोस्टमध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे की, दिएगो गार्सिया हा अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेचा कणा आहे. ते म्हणाले, “जर भविष्यात हा भाडेपट्टा (Lease) करार मोडला गेला, किंवा पर्यावरण आणि सार्वभौमत्वाच्या ‘खोट्या दाव्यां’खाली अमेरिकेच्या लष्करी सामर्थ्याला आव्हान दिले गेले, तर आम्हाला तो तळ लष्करी बळाने सुरक्षित करण्याचा पूर्ण अधिकार आहे.” ट्रम्प यांच्या या विधानाने ब्रिटन आणि मॉरिशसच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

आधी टीका, आता तडजोड: ट्रम्प यांची दुहेरी चाल

गेल्या महिन्यातच ट्रम्प यांनी चागोस बेटांचे सार्वभौमत्व मॉरिशसला देण्याच्या ब्रिटनच्या निर्णयाचे वर्णन “अत्यंत कमकुवतपणा” असे केले होते. मात्र, ताज्या चर्चेनंतर त्यांनी स्टारमर यांचे कौतुक करत म्हटले की, सध्याच्या राजकीय परिस्थितीत ब्रिटनने केलेला हा “सर्वोत्तम शक्य करार” आहे. तरीही, अमेरिकन लष्करी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा त्यांनी पुनरुच्चार केला.

Donald Trump has accused the UK of ‘stupidity’ and ‘weakness’ over its plan to transfer ownership of the Chagos Islands including the US air base of Diego Garcia to Mauritius, citing the move as a reason for Washington to seize Greenland. https://t.co/eBWn4IW7XJ pic.twitter.com/G6DyEQpTPG — Financial Times (@FT) January 20, 2026

credit – social media and Twitter

दिएगो गार्सिया: का आहे इतके महत्त्वाचे?

दिएगो गार्सिया हे चागोस द्वीपसमूहातील सर्वात मोठे बेट आहे. १९६० पासून अमेरिका आणि ब्रिटन या तळाचा वापर करत आहेत. अफगाणिस्तान, इराक आणि मध्यपूर्वेतील युद्धात अमेरिकेच्या लांब पल्ल्याच्या बॉम्बर्ससाठी हा तळ ‘लाँच पॅड’ राहिला आहे. हिंद महासागरात चीनच्या वाढत्या प्रभावाला रोखण्यासाठी या तळाची भूमिका अत्यंत मोलाची आहे. म्हणूनच ट्रम्प यांनी “पर्यावरणीय सबबीं” खाली या तळाच्या कारवाया रोखण्याचा प्रयत्न झाल्यास लष्करी हस्तक्षेपाचा इशारा दिला आहे.

यूके-मॉरिशस कराराचे भवितव्य

२०२५ मध्ये झालेल्या करारानुसार, ब्रिटनने चागोस बेटांवरील मॉरिशसचे अधिकार मान्य केले आहेत. बदल्यात मॉरिशसने दिएगो गार्सियाचा तळ ९९ वर्षांसाठी अमेरिकेला वापरू देण्याचे मान्य केले. मात्र, ट्रम्प यांच्या ताज्या इशाऱ्यामुळे हा करार अमलात येताना नवीन अडचणी निर्माण होऊ शकतात. विशेषतः चीनचा मॉरिशसवर असलेला प्रभाव हा अमेरिकेसाठी सर्वात मोठा चिंतेचा विषय आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्रिटनला कोणती धमकी दिली आहे?

    Ans: ट्रम्प यांनी इशारा दिला आहे की, जर दिएगो गार्सिया येथील लष्करी कारवायांमध्ये मॉरिशस किंवा ब्रिटनने अडथळा आणला, तर अमेरिका सैन्य पाठवून तो तळ स्वतःच्या ताब्यात घेईल.

  • Que: दिएगो गार्सिया लष्करी तळाचे महत्त्व काय आहे?

    Ans: हा तळ हिंद महासागराच्या मध्यभागी असून अफगाणिस्तान आणि मध्यपूर्वेतील मोहिमांसाठी अमेरिकेचा मुख्य आधार आहे.

  • Que: यूके-मॉरिशस करार नक्की काय आहे?

    Ans: या करारानुसार ब्रिटन चागोस बेटांचे सार्वभौमत्व मॉरिशसला देईल, पण दिएगो गार्सियाचा तळ ९९ वर्षांसाठी अमेरिका-ब्रिटनच्या ताब्यात राहील.

Web Title: Trump warning uk pm diego garcia military force chagos deal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2026 | 01:00 PM

Topics:  

  • Britain pm
  • Donald Trump
  • Great Britain
  • World War 3

संबंधित बातम्या

Trump vs US Media : डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा मोठा धक्का; CNN सह 3 माध्यम संस्थांवरील बंदी अखेर उठवली
1

Trump vs US Media : डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा मोठा धक्का; CNN सह 3 माध्यम संस्थांवरील बंदी अखेर उठवली

Trump-Xi Meet : रेड कार्पेट, 21 तोफांची सलामी अन् B-1 बॉम्बरची गर्जना; जिनपिंग यांचे USमध्ये जंगी स्वागत, चर्चेत 4 मोठे मुद्दे
2

Trump-Xi Meet : रेड कार्पेट, 21 तोफांची सलामी अन् B-1 बॉम्बरची गर्जना; जिनपिंग यांचे USमध्ये जंगी स्वागत, चर्चेत 4 मोठे मुद्दे

Iran–US War : होर्मुझवर पेझेश्कियानांचा इशारा; युद्धाला कोणतीही सीमा नसते
3

Iran–US War : होर्मुझवर पेझेश्कियानांचा इशारा; युद्धाला कोणतीही सीमा नसते

Iran–US War :ट्रम्प-इराण चर्चेला पुन्हा वेग; न्यूयॉर्कमध्ये शटल डिप्लोमसी सुरू
4

Iran–US War :ट्रम्प-इराण चर्चेला पुन्हा वेग; न्यूयॉर्कमध्ये शटल डिप्लोमसी सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.