Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

India-US Trade Deal: बजेटनंतरचा सर्वात मोठा धमाका! भारत-अमेरिका जारी करणार संयुक्त निवेदन; पियुष गोयल यांनी सांगितली ‘ती’ तारीख

India-US Trade Deal: भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराचे काम वेगाने सुरू आहे. येत्या चार ते पाच दिवसांत दोन्ही देश संयुक्त निवेदन जारी करतील अशी अपेक्षा आहे. जाणून घ्या याबाबत सविस्तर अपडेट.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Feb 06, 2026 | 09:25 AM
india us trade deal piyush goyal confirms date tariff cut 50 to 18 percent news

india us trade deal piyush goyal confirms date tariff cut 50 to 18 percent news

Follow Us
Close
Follow Us:
  • ऐतिहासिक शुल्क कपात
  • संयुक्त निवेदनाची प्रतीक्षा
  • मार्चमध्ये स्वाक्षरी

India US Trade Deal 2026 Piyush Goyal : भारत आणि अमेरिका (India-US Trade Deal) यांच्यातील व्यापाराच्या दृष्टिकोनातून एक अतिशय मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेला आणि चर्चेत असलेला ‘भारत-अमेरिका व्यापार करार’ (BTA) आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत दोन्ही देशांच्या वतीने एक संयुक्त निवेदन प्रसिद्ध केले जाईल आणि मार्चच्या मध्यापर्यंत या ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी केली जाईल. या करारामुळे अमेरिकेने भारतीय वस्तूंवर लादलेले ५०% आयात शुल्क आता केवळ १८ टक्क्यांवर येणार आहे.

पियुष गोयल यांनी काय म्हटले?

नवी दिल्ली येथे गल्फ कोऑपरेशन कौन्सिल (GCC) च्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या एका महत्त्वाच्या बैठकीनंतर पियुष गोयल यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, “आमच्या दोन्ही देशांच्या नेत्यांनी (पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प) या करारावर सहमती दर्शवली आहे. व्यापार कराराचा पहिला टप्पा पूर्णपणे तयार असून येत्या ४ ते ५ दिवसांत किंवा त्यापूर्वीही भारत आणि अमेरिका संयुक्त निवेदन जारी करतील.” हे निवेदन जारी झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत अमेरिका शुल्क कपातीचा कार्यकारी आदेश जारी करेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

हे देखील वाचा : End FGM : बापरे! अंगावर काटा आणणारी प्रथा; पाहा काय आहे ‘महिला जननेंद्रियांची विकृती’ आणि का आवश्यक आहे त्याविरुद्ध लढा

५०% वरून १८% पर्यंत घसरण: भारतीय निर्यातदारांना दिलासा

अमेरिकेने रशियाकडून तेल खरेदी केल्याच्या कारणावरून भारतावर २५% परस्पर शुल्क आणि २५% दंडात्मक शुल्क लादले होते. हे एकूण ५०% शुल्क आता १८% पर्यंत कमी केले जाणार आहे. याचा सर्वात मोठा फायदा भारताच्या ३० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त किमतीच्या निर्यातीला होणार आहे. विशेषतः कापड (Textiles), तयार कपडे (Garments), चामड्याचे उत्पादने, पादत्राणे आणि सागरी उत्पादने यांसारख्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (MSME) जागतिक बाजारपेठेत मोठी उभारी मिळणार आहे.

BREAKING: Historic statement by Commerce Minister Piyush Goyal in Parliament! India’s core sensitivities in food & agriculture fully safeguarded in the India-US trade deal. Farmers and dairy interests remain untouched. US tariffs slashed from 50% to 18%—boost for textiles,… pic.twitter.com/NUEJLd5BIX — Aditya Kumar Trivedi (@adityasvlogs) February 4, 2026

credit – social media and Twitter

हे देखील वाचा : भारतातील ‘त्या’ डॉक्टर ज्यांनी पुरुषप्रधान काळात गाजवले वैद्यकीय क्षेत्र; आज प्रत्येक महिलांसाठी आहेत प्रेरणास्थान 

पुढील प्रक्रिया काय असेल? (राजेश अग्रवाल यांचे स्पष्टीकरण)

वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांनी या प्रक्रियेबद्दल अधिक माहिती देताना सांगितले की, “नेतृत्व पातळीवर सहमती झाल्यानंतर संयुक्त निवेदन काढणे ही एक तांत्रिक प्रक्रिया आहे. एकदा हे निवेदन प्रसिद्ध झाले की, त्याचे रूपांतर कायदेशीर करारात केले जाईल.” अमेरिकेत शुल्क कपातीचा निर्णय कार्यकारी आदेशाद्वारे (Executive Order) जलद गतीने घेता येतो, त्यामुळे तिथली अंमलबजावणी लवकर होईल. मात्र, भारताची टॅरिफ कपात ही मार्चच्या मध्यावर अधिकृत स्वाक्षरी झाल्यानंतरच अंमलात येईल, कारण भारताची आयात शुल्क प्रणाली ही ‘मोस्ट फेवर्ड नेशन’ (MFN) नियमांतर्गत नियंत्रित केली जाते.

💡

Frequently Asked Questions

  • Que: भारत-अमेरिका व्यापार करारावर कधी स्वाक्षरी होणार आहे?

    Ans: केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या माहितीनुसार, मार्च २०२६ च्या मध्यापर्यंत या करारावर औपचारिक स्वाक्षरी होण्याची अपेक्षा आहे.

  • Que: या करारामुळे आयात शुल्कात किती कपात होईल?

    Ans: अमेरिकेने भारतीय वस्तूंवर लावलेले एकूण ५०% शुल्क (२५% टॅरिफ + २५% दंड) १८% पर्यंत कमी केले जाईल.

  • Que: या निर्णयाचा कोणत्या क्षेत्राला सर्वाधिक फायदा होईल?

    Ans: कापड, तयार कपडे, चामड्याचे वस्तू, सागरी उत्पादने आणि लघु उद्योगांशी (MSME) संबंधित क्षेत्रांना याचा थेट फायदा होईल.

Web Title: India us trade deal piyush goyal confirms date tariff cut 50 to 18 percent news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2026 | 09:25 AM

Topics:  

  • Donald Trump
  • Piyush Goyal
  • PM Narendra Modi
  • US-India Relation

संबंधित बातम्या

एपस्टिन फाईलमध्ये पंतप्रधानांचे नाव येणे अत्यंत गंभीर, RSS ने मोदींचा राजीनामा घ्यावा; काँग्रेसची मागणी
1

एपस्टिन फाईलमध्ये पंतप्रधानांचे नाव येणे अत्यंत गंभीर, RSS ने मोदींचा राजीनामा घ्यावा; काँग्रेसची मागणी

India First : सरकार संवेदनशील, सतर्क आणि मदतीसाठी सज्ज, 3.75 लाख भारतीय परतले; PM Modiनी लोकसभेत मांडली रणनीती
2

India First : सरकार संवेदनशील, सतर्क आणि मदतीसाठी सज्ज, 3.75 लाख भारतीय परतले; PM Modiनी लोकसभेत मांडली रणनीती

US Iran War : इराण झुकला की नडला? युद्धबंदीसाठी आता ६ अटींची गुगली, आता काय करणार ट्रम्प?
3

US Iran War : इराण झुकला की नडला? युद्धबंदीसाठी आता ६ अटींची गुगली, आता काय करणार ट्रम्प?

Modi’s 8931 Days: मोदींचा ऐतिहासिक विक्रम! देशात सर्वाधिक काळ ‘सरकार प्रमुख’ पद भूषवणारे पहिले भारतीय नेते
4

Modi’s 8931 Days: मोदींचा ऐतिहासिक विक्रम! देशात सर्वाधिक काळ ‘सरकार प्रमुख’ पद भूषवणारे पहिले भारतीय नेते

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.