• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • Russia To Launch Free Cancer Vaccine In Year 2025 Nrhp

रशियाचा मोठा दावा; कॅन्सरवर लस केली तयार, 2025 पासून Freeमध्ये उपलब्ध होणार

कर्करोगासारख्या गंभीर आजाराबाबत रशियाने मोठा दावा केला आहे. रशियाने सांगितले की त्यांनी कर्करोगाची लस तयार केली आहे. सर्व रुग्णांना ही लस मोफत मिळणार आहे. या लसीचे नाव अद्याप समोर आलेले नाही.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Dec 18, 2024 | 10:36 AM
Russia to launch free cancer vaccine in year 2025

रशियाने केला मोठा दावा; म्हणाले,आम्ही कॅन्सरची लस बनवली आहे, सर्वांना Free मिळणार ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मॉस्को : कर्करोगासारख्या जीवघेण्या आजाराविरोधात मोठे यश मिळवल्याचा दावा रशियाने केला आहे. रशियन आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच केलेल्या घोषणेनुसार, कर्करोगावर उपचारासाठी त्यांनी एक प्रभावी लस विकसित केली आहे. 2025 च्या सुरुवातीला ही लस उपलब्ध होईल, आणि विशेष म्हणजे रशियामध्ये सर्व कर्करोगग्रस्त रुग्णांना ही लस मोफत दिली जाणार आहे.

लसीचे नाव अद्याप गुप्त, परंतु प्रभावीपणा आशादायक

रशियाच्या रेडिओलॉजी मेडिकल रिसर्च सेंटरचे जनरल डायरेक्टर आंद्रे काप्रिन यांनी या लसीबाबत महत्त्वाची माहिती दिली. या लसीमुळे ट्यूमरची वाढ रोखता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. ही लस केवळ ट्यूमरचा आकार कमी करण्यास सक्षम नाही, तर त्याचा वाढीचा वेगही आटोक्यात आणू शकते. मात्र, ही लस कोणत्या प्रकारच्या कर्करोगासाठी विशेषतः प्रभावी ठरेल, याबाबत अद्याप सविस्तर माहिती जाहीर झालेली नाही.

जगभरातील कर्करोगाच्या वाढत्या समस्या

आज जगभरात कर्करोगाने गंभीर स्वरूप धारण केले आहे. रशियासारख्या देशातही या आजाराचे प्रमाण चिंताजनक आहे. 2022 मध्ये रशियात कर्करोगाच्या 6,35,000 हून अधिक प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी कोलन, स्तन आणि फुफ्फुसाचा कर्करोग हे सर्वात सामान्य प्रकार आहेत. अशा परिस्थितीत रशियाच्या या नव्या लसीचा दावा जगभरातील कर्करोगग्रस्तांसाठी एक मोठा दिलासा ठरू शकतो.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : सत्ता सोडताना बायडेन यांनी उचलले अत्यंत महत्त्वाचे पाऊल; भारताला होणार मोठा फायदा

रुग्णांसाठी मोफत उपचाराची सुविधा

रशियाच्या आरोग्य मंत्रालयाने ही लस देशातील सर्व कर्करोगग्रस्त रुग्णांसाठी मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय कर्करोगाविरुद्धच्या लढाईतील एक मोठा टप्पा मानला जात आहे. या लसीमुळे रुग्णांना महागड्या उपचारांपासून दिलासा मिळणार आहे.

संशोधन आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील अपेक्षा

आंतरराष्ट्रीय आरोग्य क्षेत्रात या लसीमुळे कर्करोगाविरुद्धच्या उपचारांमध्ये महत्त्वपूर्ण बदल होण्याची शक्यता आहे. मात्र, या लसीच्या प्रभावीतेबाबत आणि तिच्या क्लिनिकल चाचण्यांच्या यशाबाबत अद्याप पूर्ण माहिती उपलब्ध नाही. तरीही, या लसीच्या घोषणेमुळे संपूर्ण जगाचे लक्ष रशियाच्या या नव्या संशोधनाकडे वळले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : दुबईत नाही तर जगातील सर्वात स्वस्त सोने ‘इथे’ मिळते; नाव जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल

कर्करोगाविरुद्ध लढाईतील आशेचा किरण

कर्करोगावर प्रभावी उपाय शोधण्यासाठी गेल्या अनेक दशकांपासून जगभरात संशोधन सुरू आहे. रशियाच्या या नव्या यशामुळे कर्करोगाविरोधातील लढाईत एक नवीन दिशा मिळाली आहे. ट्यूमरच्या वाढीस प्रतिबंध करणारी आणि त्याचा आकार कमी करणारी लस तयार करणे हे निश्चितच विज्ञानातील मोठे यश मानले जाईल.

2025 पासून ही लस बाजारात उपलब्ध होईल, तेव्हा तिच्या यशस्वीतेबाबत अधिक माहिती मिळेल. सध्याच्या परिस्थितीत, या लसीमुळे कर्करोगग्रस्त रुग्णांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला आहे. या यशामुळे रशियाने आरोग्य क्षेत्रात एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.

Web Title: Russia to launch free cancer vaccine in year 2025 nrhp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 18, 2024 | 10:36 AM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
मोठी बातमी! जुन्नरमधून 20 बिबट्यांची पाठवणी; ‘वनतारा’ केंद्रात स्थलांतर केले जाणार

मोठी बातमी! जुन्नरमधून 20 बिबट्यांची पाठवणी; ‘वनतारा’ केंद्रात स्थलांतर केले जाणार

Mar 08, 2026 | 02:35 AM
दारूच्या नशेत पोलिसांशी अरेरावी; शिक्रापूर पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?

दारूच्या नशेत पोलिसांशी अरेरावी; शिक्रापूर पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?

Mar 08, 2026 | 12:30 AM
30 हजारांच्या पगारात कोणती कार तुमची होईल हमसफर? ‘या’ 2 पर्यायांचा नक्की करा विचार

30 हजारांच्या पगारात कोणती कार तुमची होईल हमसफर? ‘या’ 2 पर्यायांचा नक्की करा विचार

Mar 07, 2026 | 10:07 PM
Tata Punch EV की MG Comet, कोणत्या इलेक्ट्रिक कारमध्ये किती दम? खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या रेंज, फीचर्स आणि बरंच काही

Tata Punch EV की MG Comet, कोणत्या इलेक्ट्रिक कारमध्ये किती दम? खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या रेंज, फीचर्स आणि बरंच काही

Mar 07, 2026 | 09:47 PM
वाशिम जिल्ह्यात ध्यान क्रांतीची सुरुवात! शहरातील विविध भागांमध्ये निःशुल्क ध्यान सत्रांचे आयोजन

वाशिम जिल्ह्यात ध्यान क्रांतीची सुरुवात! शहरातील विविध भागांमध्ये निःशुल्क ध्यान सत्रांचे आयोजन

Mar 07, 2026 | 09:32 PM
IND Vs NZ: “…ती मॅच खेळण्यात मजा नाही”; Final आधी सूर्यकुमार यादवचे मोठे विधान

IND Vs NZ: “…ती मॅच खेळण्यात मजा नाही”; Final आधी सूर्यकुमार यादवचे मोठे विधान

Mar 07, 2026 | 09:25 PM
Ahilyanagar News: ‘या’ कारणामुळे राहुरी-शनिशिंगणापूर रेल्वेमार्गाला शेतकऱ्यांचा कडाडून विरोध

Ahilyanagar News: ‘या’ कारणामुळे राहुरी-शनिशिंगणापूर रेल्वेमार्गाला शेतकऱ्यांचा कडाडून विरोध

Mar 07, 2026 | 09:04 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Mar 07, 2026 | 07:03 PM
Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Mar 07, 2026 | 06:18 PM
Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Mar 07, 2026 | 06:12 PM
Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Mar 07, 2026 | 06:01 PM
Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Mar 07, 2026 | 05:54 PM
Kolhapur : गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकच शत्रू 

Kolhapur : गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकच शत्रू 

Mar 07, 2026 | 05:45 PM
Latur : राज्याच्या अर्थसंकल्पावर लातूरच्या व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया

Latur : राज्याच्या अर्थसंकल्पावर लातूरच्या व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया

Mar 07, 2026 | 05:31 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.