Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Simferopol Sunk : रशियाचे समुद्रात शक्तिप्रदर्शन; युक्रेनची सर्वात मोठी युद्धनौका ‘सिम्फेरोपोल’ ड्रोनने उडवली, VIDEO VIRAL

Russia-Ukraine War: रशिया-युक्रेन युद्धात पहिल्यांदाच रशियाने समुद्री ड्रोनने हल्ला केला आणि युक्रेनचे सर्वात मोठे गुप्तचर जहाज 'सिम्फेरोपोल' बुडवले, ज्यामुळे युद्धाची तीव्रता आणि व्याप्ती वाढली.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Aug 29, 2025 | 05:00 PM
Ukraine's Largest Naval Ship Simferopol Sunk In Russia's Drone Attack

Ukraine's Largest Naval Ship Simferopol Sunk In Russia's Drone Attack

Follow Us
Close
Follow Us:

Russia and Ukraine war update : रशिया-युक्रेन युद्ध आता एका नव्या टप्प्यात प्रवेश करताना दिसत आहे. जवळपास दोन वर्षांपासून सुरू असलेल्या या संघर्षात दररोज नवी पावले उचलली जात आहेत. हवाई हल्ले, क्षेपणास्त्रांचा मारा, ड्रोन हल्ले यानंतर आता समुद्रातही युद्ध पेटले आहे. रशियाने पहिल्यांदाच समुद्री ड्रोनचा वापर करत युक्रेनियन नौदलाच्या सर्वात मोठ्या गुप्तचर जहाजाला  ‘सिम्फेरोपोल’  समुद्राच्या तळाशी पाठवले आहे.

युद्धातील नवा टप्पा: समुद्रातील ड्रोन हल्ला

हा हल्ला डॅन्यूब नदीच्या डेल्टा प्रदेशात झाला. हा भाग अंशतः युक्रेनच्या ओडेसा प्रांतात येतो. आतापर्यंत युद्धभूमीवर हवाई ड्रोनचा वापर होत होता, परंतु आता समुद्रातही मानवरहित हल्ल्यांची नवी पायरी गाठली गेली आहे. तज्ज्ञांच्या मते, ही घटना युद्धाची दिशा बदलणारी ठरू शकते, कारण मोठमोठ्या युद्धनौकांवर थेट धोका निर्माण झाला आहे. रशियन संरक्षण मंत्रालयाने या हल्ल्याची पुष्टी केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, “हा हल्ला अगदी अचूक होता आणि पहिल्यांदाच समुद्री ड्रोनने इतके मोठे लक्ष्य भेदले आहे.” रशियन माध्यमे याला ‘गेम चेंजर’ मानत आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US–Japan Trade Deal: जागतिक राजकारण ‘असे’ फिरले, पंतप्रधान मोदींच्या जपान दौऱ्यामुळे अमेरिकेने अब्जावधी रुपये झटक्यात गमावले

‘सिम्फेरोपोल’चे महत्त्व

‘सिम्फेरोपोल’ हे लागुना-क्लासचे मध्यम आकाराचे गुप्तचर जहाज होते. रेडिओ, रडार, इलेक्ट्रॉनिक आणि ऑप्टिकल पाळत ठेवण्यासाठी त्याचा वापर केला जात असे. हे जहाज २०१९ मध्ये लाँच झाले होते आणि २०२१ मध्ये युक्रेनियन नौदलात सामील झाले. तंत्रज्ञानाने परिपूर्ण अशा या जहाजामुळे युक्रेनला समुद्री गुप्तचर कारवाईत मोठा फायदा होत होता. त्यामुळेच या जहाजाचा नाश युक्रेनसाठी एक मोठा धक्का मानला जात आहे.

💥SUNK: Ukrainian Recon Ship WIPED OUT By 🇷🇺 Unmanned Boats At The Mouth Of The Danube

The drone-like boats had been used during July Storm exercises. Ukrainian Armed Forces have acknowledged the loss of the Simferopol vessel.

📹: 🇷🇺 MoD pic.twitter.com/ZKdL2PCdLC

— RT_India (@RT_India_news) August 28, 2025

credit : social media

युक्रेनची पुष्टी आणि हानी

युक्रेनियन नौदलानेही या हल्ल्याची पुष्टी केली आहे. प्रवक्त्याच्या म्हणण्यानुसार, या हल्ल्यात एक क्रू मेंबरचा मृत्यू झाला असून अनेक जखमी झाले आहेत. काही अजूनही बेपत्ता आहेत, त्यांचा शोध सुरू आहे. उर्वरित क्रू मेंबरना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. युक्रेनचे संरक्षण तज्ज्ञ मानतात की या घटनेमुळे युद्ध अधिक जटिल झाले असून रशियाचे वर्चस्व समुद्रावरही वाढत आहे.

रशियाचा वाढता ड्रोन शस्त्रसाठा

मागील काही महिन्यांत रशियाने समुद्री ड्रोन आणि इतर मानवरहित शस्त्रांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढवले आहे. यामुळे त्यांना हवाई तसेच समुद्री युद्धात वरचष्मा मिळत आहे. त्याचबरोबर रशियाने कीवमधील एका महत्त्वाच्या ड्रोन उत्पादन केंद्रावर क्षेपणास्त्र हल्ला करून युक्रेनला आणखी धक्का दिला आहे. तिथे तुर्की बनावटीचे प्रसिद्ध बायरक्तार TB-2 ड्रोन तयार होत होते, असा दावा करण्यात येतो.

युद्धविरामाच्या आशा धुळीस मिळाल्या

या महिन्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची बैठक झाली होती. त्यातून संघर्ष थांबण्याची आशा निर्माण झाली होती. परंतु, सध्याचा समुद्री ड्रोन हल्ला आणि युक्रेनच्या सर्वात मोठ्या जहाजाचा नाश या आशांवर पाणी फेरत आहे. युद्धाची तीव्रता आणि व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असून तोडगा अजूनही दूरवर दिसतो आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Peter Navarro on India: ‘भारत अमेरिकन डॉलर वापरून रशियन तेल खरेदी करतो’; पीटर नवारोचे पुन्हा भडक वक्तव्य

भविष्यातील संकेत

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की युद्धातील हा समुद्री ड्रोन हल्ला केवळ सुरुवात आहे. मानवरहित शस्त्रास्त्रांचा वापर भविष्यात आणखी वाढेल. विशेषत: समुद्रातील ड्रोन युद्ध मोठ्या नौदल शक्तींना आव्हान ठरणार आहे. या घटनेनंतर युक्रेनच्या नौदल क्षमतेला मोठा धक्का बसला आहे आणि रशियाचे वर्चस्व आणखी मजबूत झाले आहे.

Web Title: Russia ukraine war russia uses naval drone ukraine simferopol ship update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2025 | 05:00 PM

Topics:  

  • Russia and Ukraine war update
  • Russia Ukraine War
  • Vladimir Putin
  • Volodymir Zelensky

संबंधित बातम्या

Russia EU Uk Conflict : युरोप हादरला! कीवमध्ये रशियाचा विध्वंसक हल्ला; ईयू व ब्रिटिश कॉन्सिल कार्यालये जमीनदोस्त
1

Russia EU Uk Conflict : युरोप हादरला! कीवमध्ये रशियाचा विध्वंसक हल्ला; ईयू व ब्रिटिश कॉन्सिल कार्यालये जमीनदोस्त

Russia Ukraine War: रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा हल्ला; 29 मिसाईल्सने युरोपियन…; 14 पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू
2

Russia Ukraine War: रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा हल्ला; 29 मिसाईल्सने युरोपियन…; 14 पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू

Kim Jong Un China visit : अमेरिकेने तयार राहावे! किम जोंग उन चीन दौऱ्यावर; पुतिनही राहणार उपस्थित
3

Kim Jong Un China visit : अमेरिकेने तयार राहावे! किम जोंग उन चीन दौऱ्यावर; पुतिनही राहणार उपस्थित

US Russia: अमेरिकेचा मोठा निर्णय; रशियावर निर्बंध तरीही ट्रम्प यांचा हिऱ्यांच्या कराराला ग्रीन सिग्नल, जाणून घ्या कारण
4

US Russia: अमेरिकेचा मोठा निर्णय; रशियावर निर्बंध तरीही ट्रम्प यांचा हिऱ्यांच्या कराराला ग्रीन सिग्नल, जाणून घ्या कारण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.