युनायटेड किंगडम : भारताचा 78 वा स्वांतत्र्य दिन नुकताच साजरा झाला. विशेष म्हणजे भारतीय स्वातंत्र्यदिन हा केवळभारतातच नव्हे तर जगभरात ज्या ज्या ठिकाणी भारतीय नागरिक राहतात, त्या ठिकाणी भारतीय स्वातंत्र्यदिन साजरा केला जातो. असाच युनाटेड किंगडमध्ये भारतीय स्वातंत्र्यदिन साजरा करतानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका व्हिडिओची सर्वाधिक चर्चा होत आहे. ज्यामध्ये भारतीय राष्ट्रगीता दरम्यान पाकिस्तानी नागरिकदेखील तिरंग्याला वंदन करण्यासाठी भारतीय लोकांसोबत उभे असल्याचे दिसत आहे. हा व्हायरल व्हिडिओ यूकेचा असल्याचे सांगण्यात येत आहे.
हा व्हिडिओ एआरवाय न्यूजचे पत्रकार फरीद कुरेशी यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये कुरेशी यांनी लिहिले की, पाकिस्तानी आणि भारतीय एकत्र स्वातंत्र्य दिन साजरा करत आहेत. यामध्ये प्रेक्षकही भारताच्या राष्ट्रगीताचा आदर करत आहेत.
हेदेखील वाचा: भारतातील आवर्जून भेट द्यावी अशी प्रसिद्ध श्रीकृष्णाची मंदिरे
या व्हिडिओमध्ये राष्ट्रगीत वाजत असताना काही लोक पाकिस्तानचा झेंडा हातात घेऊन उभे होते. व्हिडिओमध्ये लोक भारत आणि पाकिस्तानचे झेंडे घेऊन जन गण मन गाताना दिसत आहेत. सोशल मीडियावरही लोक या व्हिडिओला खूप पसंत करत आहेत. या व्हिडिओने मन जिंकल्याची भावना काहींनी व्यक्त केली आहे. त्याचवेळी एका यूजरने कमेंट केली की, हे फक्त सोशल मीडियासाठी केले आहे, बाकीची परिस्थिती काय आहे ते तुम्हाला माहिती आहे. एका युजरने इंस्टाग्रामवर लिहिले की सुशिक्षित लोकही असेच करतात. तर एकाने लिहिले आहे की, ज्या ब्रिटीशांपासून आपली सुटका झाली त्याच्याच देशात आपण स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करत आहोत.
भारतात 15ऑगस्टला स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो, पण पाकिस्तानमध्ये 14ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो. इतिहासकारांच्या मते, पाकिस्तानला 14 ऑगस्ट रोजी स्वतंत्र देश म्हणून मान्यता मिळाली होती, म्हणून या दिवशी तेथे स्वातंत्र्याचा उत्सव साजरा केला जातो.
हेदेखील वाचा: नोकरीच्या मागे न लागता धरली शेतीची वाट; करतोय वार्षिक 15 लाखांची कमाई!