नवी दिल्ली : चीनने (China) भूतानलगत (Bhutam) असलेल्या डोकलाम पठाराजवळ (Doklam Plateau) गाव वसवले आहे. उपग्रहाच्या सहाय्याने काढण्यात आलेल्या फोटोतून (Satellite Photo) ही धक्कादायक बाब समोर आली आहे. भारताच्या दृष्टीने धोकादायक असल्याचे दिसून येते. ही छायाचित्रे एमएएक्सएआर (Maxar) कंपनीने काढली आहेत.
अमो चू नदीच्या (Amo Chu River) खोऱ्यात चीन एक गाव वसवत (Building) असल्याचे समोर आले आहे. तसेच, या गावाचे काम पूर्णत्वाकडे आल्याचेही फोटोतून दिसते. त्याचवेळी चीनने दक्षिण भागात तिसऱ्या गावाचीदेखील निर्मिती सुरू केली असून, फोटोंमध्ये ६ इमारतींचा पायाही दिसत आहे. याशिवाय इतर अनेक बांधकामांचे कामही वेगाने सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे. गावातील प्रत्येक घराच्या दारात कार उभ्या दिसत आहेत. नव्याने समोर आलेल्या या फोटोंवर अद्यापपर्यंत लष्कराकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.