World News : सौदी अरेबियाच्या रास तनुरा तेल रिफायनरीवर हौथींचा हल्ला; आगीचा दावा, चार ड्रोन पाडल्याची माहिती

येमेनमधील हौथी बंडखोरांनी सौदी अरेबियाच्या रास तनुरा तेल रिफायनरीवर हल्ला केल्याचा दावा केला आहे. हल्ल्यात आग लागल्याचे सांगण्यात आले असून सौदीच्या हवाई संरक्षण यंत्रणेने चार ड्रोन पाडले आहेत. या घटनेमुळे सौदी आणि हौथी यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
फोटो सौजन्य सोशल मीडिया
फोटो सौजन्य सोशल मीडिया फोटो सौजन्य सोशल मीडिया
Published on: 
Updated on: 
  • सौदीच्या महत्त्वाच्या तेल रिफायनरीला लक्ष्य

  • सौदीच्या हवाई संरक्षण यंत्रणेने चार ड्रोन पाडले

  • सौदी-हौथी संघर्षामुळे तेल बाजारपेठेवर परिणामाची शक्यता

येमेनमधील हौथी बंडखोरांनी सौदी अरेबियाच्या महत्त्वाच्या रास तनुरा तेल रिफायनरीवर हल्ला केल्याचा दावा केला आहे. हौथींचे लष्करी प्रवक्ते याह्या सरी यांनी या हल्ल्यात रिफायनरी परिसरात आग लागल्याचे सांगितले. दुसरीकडे, सौदी अरेबियाच्या हवाई संरक्षण यंत्रणेने परिसरात चार ड्रोन पाडल्याची माहिती दिली आहे. या घटनेमुळे आखाती देशांमधील तणाव आणखी वाढला आहे.

सौदीच्या महत्त्वाच्या तेल रिफायनरीला लक्ष्य

रास तनुरा ही सौदी अरेबियातील सर्वात मोठ्या तेल रिफायनरींपैकी एक आहे. या प्रकल्पाची दररोज सुमारे ५ लाख ५० हजार बॅरल तेल शुद्धीकरण करण्याची क्षमता आहे. सौदीच्या तेल निर्यातीसाठीही हा परिसर अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.

हौथी प्रवक्त्याने थेट हल्ला केल्याचा दावा करत रिफायनरी परिसरात आग लागल्याचे सांगितले. मात्र, प्रत्यक्ष हल्ल्यामुळे किती नुकसान झाले, याबाबत स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.

फोटो सौजन्य सोशल मीडिया
Business News : फ्लिपकार्टमध्ये मोठा नेतृत्वबदल; CEO कल्याण कृष्णमूर्ती पद सोडणार; ११ वर्षांच्या प्रवासाला पूर्णविराम

सौदीच्या हवाई संरक्षण यंत्रणेने चार ड्रोन पाडले

हौथींच्या हल्ल्याच्या दाव्यानंतर सौदीच्या नेतृत्वाखालील आघाडीने रास तनुरा परिसरात चार ड्रोन रोखून नष्ट केल्याचे सांगितले. या कारवाईदरम्यान ड्रोनचे अवशेष खाली पडल्याची माहिती देण्यात आली. प्राथमिक माहितीनुसार, या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान, रिफायनरी परिसरातून काळा धूर उठत असल्याचे उपग्रह छायाचित्रांमध्ये दिसून आल्याने या घटनेचे गांभीर्य वाढले आहे.

फोटो सौजन्य सोशल मीडिया
World News : AI च्या गैरवापराला दक्षिण कोरियाचा मोठा दणका; परीक्षेत कॉपी करणाऱ्यांची माहिती देणाऱ्यांना ३.७५ लाख डॉलरचे बक्षीस

सौदी-हौथी संघर्षामुळे तेल बाजारपेठेवर परिणामाची शक्यता

सौदी अरेबिया आणि येमेनमधील हौथी बंडखोरांमधील संघर्ष पुन्हा तीव्र झाला आहे. यापूर्वी रियाधमधील आर्थिक केंद्रातील एका इमारतीवर ड्रोन हल्ला झाला होता. या हल्ल्यात ११ जण जखमी झाल्याचे समजते आहे .

त्यानंतर सौदीच्या नेतृत्वाखालील आघाडीने येमेनमधील होदेइदा बंदर आणि इतर ठिकाणांवर कारवाई केली. आता तेल रिफायनरीला लक्ष्य केल्याच्या दाव्यामुळे जागतिक तेल पुरवठ्याबाबत चिंता वाढली आहे. हा संघर्ष आणखी वाढल्यास आखाती प्रदेशातील ऊर्जा पुरवठा आणि आंतरराष्ट्रीय तेल बाजारपेठेवर त्याचे परिणाम होऊ शकतात.