Bangladesh Violence: 'बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारामागे मास्टरमाईंड'...; शेख हसीना यांचा मोहम्मद युनूसवर गंभीर आरोप
नवी दिल्ली: बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदूंवर अत्याचार सुरूच आहे. शेख हसीना यांच्या देश सोडून गेल्यानंतर सत्तापालट झाली आणि मोहम्मद युनूस यांचे अंतरिम सरकार सत्तेत आले. अंतरिम सरकार सत्तेत आल्यानंतरही हिंदूंवरील हल्ले सुरूच आहेत. दरम्यान शेख हसीना यांचे मोठे वक्त्यव्य समोर आले आहे. त्यांनी मुहम्मद युनूस यांच्यावर सामूहिक हत्या आणि अल्पसंख्याकांवरील हल्ल्यांमागे मास्टरमाईंड असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
हिंदूवरील हल्लयांमागे मोहम्मद युनूस मास्टरमाईंड
शेख हसीना यांनी म्हटले आहे की, बांगलादेशात होत असलेला नरसंहाराला मुहम्मद युनूस जबाबदार आहेत. न्यूयॉर्कमधील आवामी लीगच्या कार्यक्रमाला संबंधित करत हे वक्तव्य केले. त्यांनी म्हटले की, मंदिरे, चर्च आणि धार्मि संघटना ISKCON वर होणाऱ्यां वारंवार हल्ल्यांमागे मुहम्मद युनूस आहेत. तसेच त्यांनी असेही सांगितले की, त्यांच्यावर सामूहिक हत्यांचे आरोप आहेत, मात्र, या हल्ल्यांचे सूत्रधार मोहम्मद युनूस आहेत. असा गंभीर आरोप शेख हसीना यांनी केला.
बांगलादेशात अल्पसंख्याकांना अजूनही का लक्ष्य केले जात आहे? -शेख हसीना
शेख हसीना यांनी म्हटले की, आज शिक्षक, पोलीस, नेते या सर्वांवर हल्ले गोते आहे. या हल्ल्यांमध्ये विशेष करुन हिंदू, बौद्ध आणि ख्रिश्चनांना लक्ष्य केले जात आहे. त्यांनी युनूस सरकारला प्रश्न करत विचारले की, 11 चर्च आणि अनेक मंदिरांवरील हल्ले झाले आहेत, तसेतच अजूनही हल्ले सुरू आहेत मात्र, बांगलादेशात अल्पसंख्याकांना अजूनही का लक्ष्य केले जात आहे? तसेच शेख हसीना यांनी आपला बांगलादेश सोडण्यामागचे कारण त्यांना ‘नरसंहार ‘नको होता असे त्यांनी सांगितले.
फोटो सौजन्य: सोशल मीडिया
BNP नेते राहुल कबीर रिजवी यांचे शेख हसीनांवर आरोप
बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे (बीएनपी) वरिष्ठ नेते राहुल कबीर रिजवी यांनी माजी पंतप्रधान शेख हसीना आणि भारतावर गंभीर आरोप केले आहेत. एका पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी म्हटले आहे की, शेख हसीना यांनी बांगलादेशातून भारतात पळ काढल्याने देशात शांतता परतली आहे. त्यांनी दावा केला की, 15 वर्षांपासून नागरिकांच्या खांद्यावर असलेला भार आता उतरला आहे. आता बांगलादेश शेख हसीना यांना परत स्वीकारणार नाहीत.
चिन्मय दास यांच्या अटकेनंतर हिंसाचार उफाळला
बांगलादेशात हिंदू समुदायावरील ह्ल्ले सुरूच आहेत. चिन्मय दास आणि त्यांच्यासह आणखी दोन हिंदू व्यक्तींच्या अटकेनंतर हा हिंसाचार अधिक उफाळला आहे. चितगाव येथील इस्कॉन पुंडरिक धामचे अध्यक्ष चिन्मय प्रभू यांच्या अटकेनंतर परिस्थिती आणखीनच बिकट झाली आहे. चिन्मय प्रभू यांच्या अटकेच्या निषेध करत हजारो हिंदू लोक रस्त्यावर उतरले आहेत.