Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

28 तासांच्या प्रवासानंतर शुभांशू शुक्ला अंतराळात पोहोचले; आयएसएसला जोडले ड्रॅगन कॅप्सूल

Shubhanshu Shukla Axiom-4 Mission update : भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांनी नवा इतिहास रचला आहे. शुभांशु शुक्ला आपल्या टीमसह आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात यशस्वीपणे पोहचले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 26, 2025 | 05:23 PM
Shubanshu Shukla reaches International Space Station, Dragon spacecraft docks successfully

Shubanshu Shukla reaches International Space Station, Dragon spacecraft docks successfully

Follow Us
Close
Follow Us:

भारतासाठी आनंदाची बतमी आहे. भारताने अंतराळात मोठी झेप घेतली असून अंतराळवीर शुभांशू शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पोहोचले आहेत. शुभांशू शुक्ला आणि त्यांच्या टीमला घेऊन जाणारे ड्रॅगन कॅप्सून देखील यशस्वीरित्या आयएसएसशी जोडले गेले आहे. गुरुवारी दुपारी ४ वाजता शुंभांशू शुक्ला यांचे ड्रॅगन कॅप्सूल आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पोहोचले. २८ तासांच्या प्रवासानंतर शुभांशू शुक्ला यांच्या ड्रॅगन कॅप्सूलची सध्या डॉकिंग प्रक्रिया सुरु आहे.

अमेरिकेच्या स्पेसएक्स आणि अ‍ॅक्सिओम स्पेस यांच्या अ‍ॅक्सिओम -4 मोहिमेअंतर्गत अंतराळात बुधवारी २५ जून रोजी शुभांशू शुक्ला यांनी आपल्या टीमसह उड्डाण केले होते. नासाच्या फ्लोरिडातील केनेडी स्पेस सेंटरमधून त्यांनी उड्डाण केले. स्पेसएक्सच्या फाल्कन-९ रॉकेटचा यामध्ये वापरण्यात आले आहे.

LIVE: @Axiom_Space‘s #Ax4 mission is scheduled to dock with the @Space_Station at approximately 6:30am ET (1030 UTC). Watch with us as the multinational crew starts their two-week stay aboard the orbiting laboratory. https://t.co/NrThYrmRrN

— NASA (@NASA) June 26, 2025

भारतासाठी मोहीम अत्यंत महत्त्वाची

ही मोहीम भारतासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. भारताचे विंग कमांडर राकेश यांच्यानंतर अंतराळात जाणारे दुसरे भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला ठरले आहेत. दोन आठवड्यांच्या कालावधीसाठी ही मोहीम असणार आहे.  चारही अंतराळवीर १४ दिवस अंतराळात राहून विविध वैज्ञानिक, जैववैज्ञानिक आणि अभियांत्रिक प्रयोग करणार आहेत. या मोहिमेदरम्यान शुभांशू शुक्ला अंतराळात भारतीय संस्कृतीच्या विविध कलाकृतींचे आणि योगासनांचे सादरीकरण करणार आहेत.

या मोहिमेत शुभांशू शुक्ला यांच्यासह इतर तीन आंतरराष्ट्रीय अंतराळवीर नासाच्या अंतराळवीर आणि Ax-4 मोहिमेच्या प्रमुख पेगी व्हिटसन, तसेच पोलंडचे स्लावोस उजनास्की-विस्निवेस्की आणि हंगेरीचे तिबोर काबू सहभागी झाले आहेत.

शुभांशू शुक्लाच्या वडिलांनी केला आनंद व्यक्त

दरम्यान शुभांशू शुक्ला अंतराळात पोहचल्यानंतर त्यांच्या वडिलांनी आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले की, “आम्हाला खूप आनद होत आहे. मी देवाचे यशस्वी डॉकिंगबद्दल आभार मानतो. आम्हाला आमच्या मुलाचा खूप अभिमान आहे”

#WATCH लखनऊ: शुभांशु शुक्ला के पिता शंभू दयाल शुक्ला ने कहा, “हमें बहुत खुशी है। सफल डॉकिंग हुई है इसके लिए हम भगवान का धन्यवाद करते हैं। हमें ये देख कर बहुत अच्छा लगा। हमें अपने बच्चे पर गर्व है।”#AxiomMission4 https://t.co/aaDwNohKsc pic.twitter.com/s5iDgUVIZC

— ANI_HindiNews (@AHindinews) June 26, 2025

शुभांशू शुक्ला यांच्या पहिला स्पेस राईडचा अनुभव

शुभांशू शुक्ला यांनी अंतराळात पोहोचल्यानंतर त्यांनी देशवासियांना नमस्कार केला होता. त्यांनी म्हटले की, “अंतराळातून नमस्कार! मला खूप आनंद होत आहे. माझ्या सहकारी अंतराळवीरांसह मला एक अद्वितीय क्षण अनुभवायला मिळत आहे. ”शुभांशू यांनी त्यांचा हा प्रवास भारताच्या मानवी अंतराळ कार्यक्रमासाठी आणि आगामी मोहीमेसाठी एक सकारात्मक आणि मोठे पाऊल असल्याचे म्हटले.

Web Title: Shubanshu shukla reaches international space station dragon spacecraft docks successfully

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2025 | 04:44 PM

Topics:  

  • Space News

संबंधित बातम्या

खरंच चंद्रावर जमीन खरेदी करता येते का? जाणून घ्या आंतरराष्ट्रीय नियम, करार आणि खरी वस्तुस्थिती
1

खरंच चंद्रावर जमीन खरेदी करता येते का? जाणून घ्या आंतरराष्ट्रीय नियम, करार आणि खरी वस्तुस्थिती

वधू जमिनीवर आणि तिचा वर अवकाशात…! ‘अशा’ प्रकारे झाले होते जगातील पहिले अंतराळातील लग्न
2

वधू जमिनीवर आणि तिचा वर अवकाशात…! ‘अशा’ प्रकारे झाले होते जगातील पहिले अंतराळातील लग्न

महासत्तांचा नवा डावपेच! चंद्रावर अणुऊर्जा तळ उभारण्यासाठी ‘या’ देशांमध्ये सुरु झालीये अनोखी अंतराळ स्पर्धा
3

महासत्तांचा नवा डावपेच! चंद्रावर अणुऊर्जा तळ उभारण्यासाठी ‘या’ देशांमध्ये सुरु झालीये अनोखी अंतराळ स्पर्धा

पृथ्वीची श्वास रोखू शकते सूर्याची वाढती उष्णता; नासाच्या अभ्यासानुसार जवळ आली ‘ऑक्सिजनच्या शेवटाची तारीख’?
4

पृथ्वीची श्वास रोखू शकते सूर्याची वाढती उष्णता; नासाच्या अभ्यासानुसार जवळ आली ‘ऑक्सिजनच्या शेवटाची तारीख’?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.