Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सूर्य, चंद्रानंतर आता ताऱ्यालाही ग्रहण; शास्त्रज्ञांनी अनुभवला अद्भूत खगोलशास्त्रीय नजारा

Astronomical Discovery : आपल्या ब्रम्हांडात अशा अनेक घटना घडत असताता, ज्याची मानवाने कधी कल्पनाही केली नसेल. नुकतेच पुण्यातील खगोलशास्त्रज्ञांनी देखील अशीच एक अद्भुत घटना अनुभवली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 17, 2026 | 07:00 AM
Space News

Space News

Follow Us
Close
Follow Us:
  • सूर्य, चंद्रानंतर आता ताऱ्यालाही ग्रहण
  • खगोलशास्त्रज्ञांनी नोंदवली अत्यंत दुर्मीळ घटना
  • नेमकं काय पाहिले?
सुमारे ३,००० प्रकाशवर्ष अंतरावर असलेल्या ‘एएसएएसएसएन-२४एफडब्ल्यू’ या ताऱ्याबाबत खगोलशास्त्रज्ञांनी एक अत्यंत दुर्मीळ घटना नोंदवली आहे. जवळपास नऊ महिन्यांच्या कालावधीत या ताऱ्याची चमक हळूहळू कमी होत गेली आणि नंतर पुन्हा पूर्ववत झाली. या महत्त्वपूर्ण संशोधनात पुण्यातील इंटर-युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स (आयुका) येथील वैज्ञानिकांचा सहभाग असून हा अभ्यास मंथली नोटिसेस ऑफ द रॉयल ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी या वैज्ञानिक नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे.

Astronomy Discovery : ब्रह्मांडाचे अजब गुपित! अवकाशात सापडली उलटी सूर्यमाला; शास्त्रज्ञही आश्चर्यचकित

या संशोधनात डॉ. सारंग शाह, जोनाथन मार्शल (अकॅडेमिया सिनीका संलग्न) तसेच आशिष महाबळ (कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी) यांनी सहभाग घेतला. वैज्ञानिकांच्या मते, हा तारा सूर्यापेक्षा थोडा जड आणि जवळपास दुप्पट आकाराचा आहे. २०२४ च्या शेवटापासून ते २०२५ च्या मध्यापर्यंत सुमारे २०० दिवस हा तारा मंदावत राहिला. त्याची चमक सुमारे ९७ टक्क्यांपर्यंत घटली होती. सुरुवातीला ताऱ्यात काही बदल झाला असावा असा अंदाज होता; मात्र अभ्यासातून तारा स्थिर असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे ही घटना ताऱ्यामुळे नव्हे, तर त्याच्या समोरून गेलेल्या एका मोठ्या उप-तारकीय वस्तूमुळे घडल्याचे निष्पन्न झाले.

संशोधकांच्या मते, ही वस्तू बहुधा ‘ब्राउन ड्वार्फ’ प्रकारातील असून तिच्याभोवती प्रचंड आणि दाट वलयांची प्रणाली आहे. या वलयांचा बाहेरील भाग पातळ असल्याने सुरुवातीला प्रकाश कमी झाल्याचे जाणवले नाही; पण घन भाग समोर आल्यावर ताऱ्याची चमक स्पष्टपणे घटली. अशा प्रकारचे ग्रहण घडण्यासाठी तारा, त्याचा साथीदार आणि पृथ्वी यांची अचूक सरळ रेषा तयार होणे आवश्यक असते, त्यामुळे अशा घटना अत्यंत क्वचित दिसतात.

इतिहासातील नोंदी तपासल्यावर हा तारा १९३७ आणि १९८१ मध्येही मंदावल्याचे आढळले. ही माहिती ‘डिजिटल ॲक्सेस टू अ स्काय सेंच्युरी’ या प्रकल्पातून मिळाली असून तो हार्वर्ड कॉलेज वेधशाळा येथील जुन्या छायाचित्रफलकांचे डिजिटायझेशन करतो. यावरून सुमारे दर ४३ वर्षांनी अशी घटना घडत असल्याचे संकेत मिळतात आणि जुन्या वैज्ञानिक नोंदी जतन करण्याचे महत्त्वही अधोरेखित होते.

या ताऱ्यातील बदल प्रथम ‘ऑल-स्काय ऑटोमेटेड सर्व्हे फॉर सुपरनोव्हा’ या आकाश सर्वेक्षणातून आढळला. हा उपक्रम ओहायो स्टेट विद्यापीठ चालवते. तसेच ‘ॲस्टरॉइड टेरेस्ट्रियल-इम्पॅक्ट लास्ट अलर्ट सिस्टिम’ या प्रणालीनेही निरीक्षणात मदत केली. शास्त्रज्ञांच्या मते, या शोधामुळे उप-तारकीय वस्तू, त्यांच्याभोवती निर्माण होणारी वलये आणि अशा प्रणाली कशा तयार होतात याबाबत अधिक माहिती मिळू शकते. भविष्यात मोठ्या दुर्बिणींच्या साहाय्याने या ताऱ्याचा अधिक सखोल अभ्यास केला जाणार असून खगोलशास्त्रातील अनेक गूढ प्रश्न उलगडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Cosmic Wonder: असं दृश्य पुन्हा दिसणार नाही! फेब्रुवारीत ‘या’ दुर्मिळ घटना ठरतील खगोलप्रेमींसाठी मेजवानी; पाहा भारतातून दिसेल का?

Web Title: Rare stellar eclipse scientists experienced amazing astronomical sight

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2026 | 07:00 AM

Topics:  

  • science news
  • Space News

संबंधित बातम्या

CBSE बोर्डाचा मोठा निर्णय! आता भाषा आणि स्तरानुसार होणार शिक्षण, जाणून घ्या सविस्तर
1

CBSE बोर्डाचा मोठा निर्णय! आता भाषा आणि स्तरानुसार होणार शिक्षण, जाणून घ्या सविस्तर

बाप रे! T Rex डायनासोरच्या अवशेषांपासून शास्त्रज्ञांनी बनवली लेदर बॅग; किंमत ऐकून व्हाल थक्क
2

बाप रे! T Rex डायनासोरच्या अवशेषांपासून शास्त्रज्ञांनी बनवली लेदर बॅग; किंमत ऐकून व्हाल थक्क

ArtemisII: अथांग अवकाशात ‘अशी’ दिसते आपली वसुंधरा; NASAच्या अंतराळवीरांनी टिपले पृथ्वीचे अत्यंत विलोभनीय फोटो
3

ArtemisII: अथांग अवकाशात ‘अशी’ दिसते आपली वसुंधरा; NASAच्या अंतराळवीरांनी टिपले पृथ्वीचे अत्यंत विलोभनीय फोटो

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.