Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Daejeon Fire : काय तो भयानक प्रसंग! पाण्याला स्पर्श होताच सोडियमचा भडका; 10 कामगार आगीत भस्मसात, पहा VIDEO

South Korea डेजॉन येथील एका कार पार्ट्सच्या कारखान्यात लागलेल्या भीषण आगीत १० कामगारांचा मृत्यू झाला आणि ५९ जण जखमी झाले. कारखान्यात असलेल्या २०० किलोग्रॅम सोडियममुळे बचावकार्यात अडथळा निर्माण झाला.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Mar 21, 2026 | 12:01 PM
south korea daejeon factory fire 10 deaths sodium explosion full report video

south korea daejeon factory fire 10 deaths sodium explosion full report video

Follow Us
Close
Follow Us:
  • भीषण अग्नितांडव
  • सोडियमचा धोका
  • युद्धपातळीवर बचावकार्य

South Korea Factory Fire Daejeon : दक्षिण कोरियाच्या (South Korea) डेजॉन शहरात मंगळवारचा दिवस एका भीषण शोकांतिकेने उजाडला. येथील एका कार पार्ट्स तयार करणाऱ्या कारखान्यात दुपारी १ च्या सुमारास अचानक आग लागली आणि पाहता पाहता संपूर्ण इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. ही आग इतकी भयानक होती की, आतील १७० कामगारांपैकी अनेकांना बाहेर पडण्याची साधी संधीही मिळाली नाही. या दुर्घटनेत आतापर्यंत १० कामगारांचा मृत्यू झाला असून, ५९ जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

२०० किलो सोडियम: मृत्यूचा सापळा

या आगीत सर्वात मोठा अडथळा ठरला तो म्हणजे कारखान्यात साठवलेला २०० किलो ‘सोडियम’चा साठा. रसायनशास्त्राच्या भाषेत सोडियम हा अत्यंत क्रियाशील पदार्थ आहे. तो हवा किंवा पाण्याच्या संपर्कात आला की त्याचा भीषण स्फोट होतो. आगीमुळे जेव्हा तापमान वाढले, तेव्हा या सोडियमचा धोका अधिकच वाढला. अग्निशमन दलाच्या जवानांना भीती होती की, जर त्यांनी पाणी मारले तर सोडियमचा स्फोट होऊन संपूर्ण इमारत पत्त्यासारखी कोसळू शकते. याच कारणामुळे जवानांना तातडीने इमारतीत शिरता आले नाही आणि आगीने रौद्र रूप धारण केले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Diego Garcia : महासागरातील अमेरिकेच्या सर्वात ‘सुपर बेस’वर इराणच्या ‘SM-3’चा हल्ला; संरक्षण यंत्रणेचे काढले धिंडवडे

दोन आणि तीन मजल्यावर सापडले मृतदेह

अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, आगीची तीव्रता इतकी जास्त होती की कामगार जिवाच्या आकांताने वरच्या मजल्याकडे धावले. बचाव पथकाला एक मृतदेह दुसऱ्या मजल्यावर तर उर्वरित मृतदेह तिसऱ्या मजल्यावर सापडले. प्रचंड उष्णता, रसायनांचा गुदमरवून टाकणारा धूर आणि अंधार यामुळे दृश्यमानता शून्य झाली होती. अनेक कामगार खिडक्यांजवळ येऊन मदतीसाठी ओरडत होते, पण आगीच्या ज्वाळांनी त्यांना कवेत घेतले होते.

🇰🇷 At least 50 people were injured in a massive fire at an auto parts plant in Daejeon, South Korea, which partially collapsed. pic.twitter.com/AKMbD8pIqd pic.twitter.com/BgLRV0SGVa — Argonaut (@FapeFop90614) March 20, 2026

credit – social media and Twitter

जखमींची प्रकृती चिंताजनक

या दुर्घटनेत जखमी झालेल्या ५९ जणांपैकी २५ जणांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. त्यांना स्थानिक रुग्णालयातील ‘बर्न युनिट’मध्ये दाखल करण्यात आले आहे. अनेक कामगारांचे शरीर ७० ते ८० टक्क्यांहून अधिक भाजले असून डॉक्टर त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. अद्याप ४ कामगार बेपत्ता असून ढिगारा उपसण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : War Update: इराणी दादागिरीला चोख प्रत्युत्तर! नेतान्याहूंनी शोधला होर्मुझला ‘हा’ पर्यायी मार्ग, बनणार जगाचं ‘पेट्रोल स्टेशन’

राष्ट्राध्यक्षांचे आदेश आणि तपासाचे चक्र

दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली जे-म्युंग यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला असून “ही एक राष्ट्रीय आपत्ती आहे” असे म्हटले आहे. त्यांनी तातडीने सर्व संसाधने तैनात करण्याचे आदेश दिले आहेत. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, पण शॉर्ट सर्किट किंवा रसायनांच्या प्रक्रियेतील त्रुटीमुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. कारखान्यात अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित होती की नाही, याचीही चौकशी केली जाणार आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: दक्षिण कोरियातील ही आग नेमकी कुठे लागली?

    Ans: ही आग दक्षिण कोरियातील डेजॉन (Daejeon) शहरातील एका कार पार्ट्स बनवणाऱ्या कारखान्यात लागली.

  • Que: सोडियममुळे बचावकार्यात अडथळा का आला?

    Ans: सोडियम हवा किंवा पाण्याच्या संपर्कात आल्यास स्फोट होतो, त्यामुळे अग्निशमन दलाला पाणी वापरताना मर्यादा आल्या आणि आग विझवण्यास उशीर झाला.

  • Que: या दुर्घटनेत किती जीवितहानी झाली आहे?

    Ans: आतापर्यंत १० कामगारांचा मृत्यू झाला असून ५९ जण जखमी आहेत, तर ४ जण अद्याप बेपत्ता आहेत.

Web Title: South korea daejeon factory fire 10 deaths sodium explosion full report video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2026 | 12:01 PM

Topics:  

  • South korea

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.