Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पापुआ न्यू गिनीमध्ये 7.1 तीव्रतेचा भूकंप; त्सुनामीचा इशाराही जारी

Papua New Guinea Earthquake: पापुआ न्यू गिनीमध्ये शनिवारी (05 एप्रिल) 7.1 तीव्रतेच्या भूकंपाचे जोरदार झटके जाणवले. पापुआ न्यू गिनीमधील न्यू ब्रिटन प्रदेशाच्या किन्याऱ्यावर मोठा भूकंप झाला.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 05, 2025 | 11:13 AM
Strong 7.1 magnitude earthquake strikes Papua New Guinea tsunami warning

Strong 7.1 magnitude earthquake strikes Papua New Guinea tsunami warning

Follow Us
Close
Follow Us:

पापुआ न्यू गिनीमध्ये शनिवारी (05 एप्रिल) 7.1 तीव्रतेच्या भूकंपाचे जोरदार झटके जाणवले. पापुआ न्यू गिनीमधील न्यू ब्रिटन प्रदेशाच्या किन्याऱ्यावर मोठा भूकंप झाला. ही माहिती युरोपियन-भमध्ये भूकंपशास्त्रीय क्रेंद्राने (EMSC) दिली. सध्या कोणत्याही प्रकारच्या जीवीत व वित्तहानीची माहिती समोर आलेली नाही. पंरतु भूकंपाच्या जोरदार झटक्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे. तसेच त्सुनामीचा इशाराही जारी करण्यात आला आहे.

त्सुनामीचा इशारा जारी

EMSC ने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाची खोली सुमारे 49 किलोमीटर खोल होती. अमेरिकेच्या त्सुनामी चेतावणी केंद्राने त्सुनामीचा इशाराही दिला आहे. यापूर्वी शुक्रवारी (04 एप्रिल) संध्याकाळी पश्चिम नेपाळमध्ये तीन मिनिटांच्या अंतराने दोन भूकंपाचे तीव्र झटके जाणवले होते. यामुळे सध्या संपूर्ण परिसरात भितीचे वातावरण पसरलेले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- शुल्काचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न; भारत-अमेरिका दोघांनाही फायदा होईल अशी यादी होत आहे तयार

जाजरकोटमध्येही भूकंपाचे दोन धक्के

राष्ट्रीय भूकंपक्षेत्राच्या दिलेल्या माहितीनुसार, जाजरकोट जिल्ह्यातही शुक्रवारी (04 एप्रिल) रात्री 8:07 वाजता 5.2 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. त्यानंतर 8:10 वाजता 5.5 तीव्रेतेचा दुसरा भूंकप झाला. मिळालेल्या माहितीनुसार या दोन्ही भूकंपाचे क्रेंद्रबिंदू काठमांडूपासून 525 किलोमीटर पश्चिमेला जाजरकोटच्या पणिक क्षेत्रात होते.

म्यानमार भूकंपामुळे मोठ्या प्रमाणा जीवित आणि वित्तहानी

नेपाळसह भारतातही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. गेल्या महिन्यांत म्यानमार आणि थायलंडमध्येही मोठा भूकंप झाला. यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली होती. म्यानमारच्या लष्करी सरकारने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपामुले आतापर्यंत 3 हजार 85 लोकांचा बळी गेला आहे. या आपत्तीत सुमारे 4 हजार 715 लोक जखमी झाले असून अद्याप 341 लोक बेपत्ता आहेत.

म्यानमारमध्ये तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा

या संकटाच्या पार्श्वभूमीवर म्यानमारच्या लष्करी सरकारने 22 एप्रिलपर्यंत तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा केली आहे, जेणेकरून बचाव कार्य अधिक प्रभावीपणे राबवता येईल. म्यानमारच्या संरक्षण सेवा कमांडर-इन-चीफच्या कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले की, “भूकंपग्रस्तांप्रती सहानुभूती व्यक्त करण्यासाठी आणि मदत कार्याला गती देण्यासाठी हा युद्धविराम लागू केला जात आहे.” तसेच, देशात शांतता आणि स्थैर्य राखण्याचाही प्रयत्न करण्यात येणार आहे.

देशभरात बचाव आणि पुनर्बांधणी कार्य सुरू

भूकंपामुळे बाधित भागांमध्ये रुग्णालये, आपत्कालीन निवारा केंद्रे आणि मदत छावण्या स्थापन केल्या जात आहेत. अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांनी म्यानमारला मदत पुरवण्यासाठी पुढाकार घेतला असून, जीवनावश्यक वस्तू पुरवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. म्यानमारच्या लष्करी प्रशासनाने देशभरातील स्वयंसेवी संस्था, मदत कार्यकर्ते आणि आंतरराष्ट्रीय समुदायाला भूकंपग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन केले आहे. “आम्ही संकटाचा सामना करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत,” असे लष्कराच्या वतीने सांगण्यात आले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- ट्रम्प’ कार्डवर चीनचे प्रत्युत्तर अमेरिकन वस्तूंवर 34% कर लादणार; 11 कंपन्या ‘अविश्वसनीय’ घोषित

Web Title: Strong 71 magnitude earthquake strikes papua new guinea tsunami warning

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2025 | 11:13 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.