खार्तूम: सुदान देशातून एक मोठी बातमी समोर येत आहे. सुदानमध्ये लष्करी आणि निमलष्करी दलांमध्ये संघर्ष सुरू आहे. शनिवारी या दोघांमध्ये सुरू असलेल्या संघर्षाचा परिणाम पाहायला मिळाला. लष्कर आणि निमलष्कर दल यांच्यात झालेल्या लढाईत 54 निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. सुदानच्या निमलष्करी दलाने खुल्या बाजारात अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये 54 नागरिकांचा जीव गेला आहे. या घटनेचा निषेध संयुक्त राष्ट्र संघाने देखील नोंदवला आहे.
सुदानच्या लष्कराविरुद्ध लढणारया निमलष्कराच्या एका तुकडीने ओमडूरमन शहरात खुल्या बाजारात 54 नागरिकांचा जीव गेला आहे. तर 158 नागरिक जखमी झाले आहेत. सुदानच्या आरोग्य मंत्रालयाने एक निवेदन जारी केले आहे. सबरीन मार्केटमध्ये रॅपिड मार्केट फोर्सद्वारे हल्ला केला गेला. यामध्ये जवळपास 158 नागरिक जखमी झाले आहेत.
रॅपिड मार्केट फोर्सने याबाबत अजून कोणतेही निवेदन जारी केले नाही किंवा घटनेची जबाबदारी स्वीकारली नाही. या हल्ल्यात महिला आणि मुलांचा समावेश आहे. त्यांनी असेही म्हटले की या हल्ल्यात “खाजगी आणि सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.” सुदानकडून या घटनेचा निषेध नोंदवला गेला आहे. सुदानमध्ये हा संघर्ष 2023 मध्ये झाला आहे. सुदानचे लष्कर आणि निमलष्कर दल यांच्यात संघर्ष सुरू आहे,
अफ्रिकी देश असलेल्या सुदानमध्ये (Sudan) सध्या अंतर्गत बंडाळी माजलेली आहे. देशात सैन्य आणि निमलष्करी दलांमध्ये सत्ता कुणी ताब्यात घ्यायची, यावरुन संघर्ष सुरु आहे. देशात सुरु असलेल्या या गृहयुद्धात आत्तापर्यंत 400 हून अधिक जण मारले गेले आहेत. तर 4000 च्या घरात नागरिक जखमी झालेले आहेत. संयुक्त राष्ट्रीय संघाने या घटनेचा निषेध नोंदवला आहे.
हेही वाचा: सुदानमध्ये का सुरुये गृहयुद्ध? भारत का राबवतोय ‘ऑपरेशन कावेरी’? सुदान अफ्रिकेत आहे की अरबस्थानात?
काय होते ऑपरेशन कावेरी?
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरविंद बागची यांनी सांगितलंय की, सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांना पुन्हा देशात परत आणण्यासाठी हे ऑपरेशन सुरु करण्यात आलेलं आहे. पहिल्या पळीत 278 भारतीयांना परत आणण्यासाठी नौदलाची आयएनएस सुमेधा पोर्ट सुदानवरुन जेद्दासाठी पाठवण्यात आली होती.
कुठं आहे सुदान ?
भौगोलिक दृष्ट्या विचार केला तर सुदान उप सहारा अफ्रिका आणि मध्य पूर्वेच्या सीमेवर स्थित आहे. सुदानच्या उत्तरेला लिबिया आणि रोम, पश्चिमेला चाड असे देश आहेत. सात देशांना लागून सुदानची सीमा आहे. सुदान अफ्रिकी आणि अरबी देश आहे. अरबी ही देशातील सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. या देशात 97 टक्के लोकसंख्या ही सुन्नी मुसलमानांची आहे. देशात मुसलमानांचं वर्चस्व आहे.
सुदानमध्ये बोलल्या जातात 1000 भाषा
सुदानमध्ये बोलण्यात येणाऱ्या 1000 भाषांत, सर्वाधिक भाषा या स्वदेशी आहेत. त्यात न्युबियन, ता बेदावी, नीलोटिक आणि निलो-हैमेटिक यांचा समावेश आहे. अरबी ही भाषा सर्वाधिक लोकं बोलतात. यासह काही जण इंग्रजी बोलतात.
सुदानमधील सगळ्यात मोठं शहर कोणतं ?
सुदानमधील एक तृतियांश लोकसंख्या ही शहरांत राहते. उर्वरित 70 टक्के लोकसंख्या ही ग्रामीण भागात राहते. सुदानमधील प्रमुख शहरं ही नील नदी आमि रेड सीच्या किनाऱ्यांवर वसलेली आहेत. ओमडुरमैन हे दाशीतल सर्वात मोठं शहर आहे. दुसरा नंबर खर्तूम या शहराचा आहे.