
Death in Sudan..! Piles of bodies piled up..; Horrifying scene captured from space
एअरबस डिफेन्स अँड स्पेस सारख्या एयरोनॉटिकल कंपनीने २७ ऑक्टोबर रोजी उत्तर दारफूरमधील काही शहराचे फोटोज काढले. ज्यात, रॅपिड सपोर्ट फोर्सेस च्या सैन्याने बंडखोरी करत अल-फशर या शहरावर कब्जा केला. आणि, १५०० च्या आसपास नागरिकांची निर्घृण हत्या केली. याच हत्येचा पुरावा म्हणून उपग्रहाने टिपलेला फोटो मिळाला. उत्तर दारफूर या ठिकाणी सुदान सैनिकांनी तळ ठोकला होता. आता त्याच शहरावर बंडखोरी करत रॅपिड सपोर्ट फोर्सेसने ताब्यात घेतला.
हे वाचा : Tanzania Violence : टांझानियात निवडणुकीनंतर भीषण हिंसाचार ; ५०० हून अधिक लोकांचा मृत्यू
अंतराळातून उपग्रहाने काढलेल्या फोटोंमध्ये बंडखोर सैन्यांच्या गाड्या दराजा ऊला भागात दिसत आहेत. या सर्व गाड्या घुसखोरी करायच्या तयारीत असल्याचे दिसत आहे. शहरातील सामान्य माणसांना बंदिस्त करण्यात आले. असून, त्या नागरिकांचे बंडखोरांनी रस्ते बंद केले आहेत.
याची माहिती मिळताच तज्ञांकडून या फोटोचे विश्लेषण करण्यात आले. त्या फोटोत किमान ५ ठिकाणी भडक तांबूस डाग दिसत असून, जवळपास १ ते २ मीटर लांब हा डाग पसरलेला दिसत आहे. फोटोमध्ये अल-फशर शहरातील जमिनीवर १५०० च्या आसपास नागरिकांची बंडखोरांनी हत्या केली असून आरएसएफने ते शहर ताब्यात घेतले आहे. हा फोटो शहराच्या संरक्षणासाठी उभारलेल्या भिंतीजवळचा असून, स्वतःच्या संरक्षणासाठी शहर सोडणाऱ्या नागरिकांना बंडखोरांनी क्रूरपणे संपवल्याचे पुरावे हे आहेत.
सुदान देशावर वर्चस्व मिळवायच्या हेतूने आरएसएफ सुदान सैन्याशी लढत आहे. जवळपास काही दिवसांपासून सुरु असलेल्या हत्यांच्या साखळीची माहिती अल जझीराने दिली. स्वत:चे प्राण वाचवण्यासाठी शहर सोडण्याच्या तयारीत असणाऱ्याचा पाठलाग करत त्यांचा अतिशय अमानुषपणे नरसंहार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.