Tanzania Violence : टांझानियात निवडणुकीनंतर भीषण हिंसाचार ; ५०० हून अधिक लोकांचा मृत्यू (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Tanzania News in Marathi : डोडोमा : आफ्रिकन देश टांझानियामध्ये नुकत्याच सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. पण या निवडणुकीनंतर देशभरात हिंसाचाराची आग उसळली होती. तणाव तीव्र वाढला होता, यामुळे संपूर्ण देशात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. तसेच इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्या आहेत. राष्ट्राध्यक्ष सामिया सुलुहू हसन यांच्यावर विरोधकांचा आरोप आहे की त्यांनी आपल्या राजकीय प्रतिस्पर्ध्यांना अन्याय्यपणे तुरुंगात डांबले, ज्यामुळे लोकांमध्ये संतापाची लाट उसळली. विरोधी पक्ष चाडेमा दावा केला आहे की, या संघर्षामध्ये ७०० लोकांचा बळी गेला आहे. देशातील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात जीवीतहानी झाली आहे. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे.
काय आहे संघर्षाचे कारण?
टांझानियामध्ये २९ ऑक्टोबर २०२५ रोजी सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. पण या निवडणुकांनंतर विरोधकांनी निदर्शने सुरु केली. विरोधकांनी आरोप केला की राष्ट्राध्यक्ष सुलुहू हसन आणि सत्ताधारी पक्ष चामाडा चा मापिंदुजी (CCM) यांच्या बाजूने सर्व निवडणूकांचे निकाल लागले आहे. पण यामध्ये काही घोटाळा असल्याचे म्हटले जात आहे. यामुळे या निकालानंतर हजारो लोक रस्त्यांवर उतरले आहेत. पोलिसांच्या चौक्यांवर हल्ला करण्यात आला आहे, तसेच निदर्शक आणि सुरक्षा दलांमध्ये झटापटही झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, टांझानियाच्या दार-एस-सलाम, म्वांजा, डोडोमा आणि इतर काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार घडला आहे. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली असून सरकारने कर्फ्यू लागू केला आहे. इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्या आहे. AFP ने दिलेल्या वृत्तानुसार, सरकारने गेल्या तीन दिवसांपासून इंटरनेट बंद ठेवले आहे. या हिंसाचारामुळे टांझानियामध्ये भीतीचे आणि अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.
प्रश्न १. कोणत्या आफ्रिकन देशात हिंसाचाराची लाट उसळली आहे?
आफ्रिकन देश टाझांनियात हिंसाचाराची लाट उसळळी आहे.
प्रश्न २. काय आहे टाझांनियातील हिंसाचाराचे कारण?
टांझानियामध्ये २९ ऑक्टोबर २०२५ रोजी सार्वत्रिक निवडणूका पार पडल्या होत्या. पण निवडणुकांचा निकाल हा राष्ट्राध्यक्ष सामिया सुलुहू हसन सत्ताधारी पक्ष चामाडा चा मापिंदुजी (CCM) यांच्या बाजूने निकाल लागला, ज्यामुळे विरोधकांमध्ये संताप उसळला आणि हिंसाचाराला सुरुवात झाली.
प्रश्न ३. टांझानियामधील हिंसाचारात किती जीवितहानी झाली.
टांझानियातील हिंसाचारात ७०० लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.






