फोटो सौजन्य - Social Media
अगार्था हे प्राचीन रहस्यमय शहर मानले जाते, जे पृथ्वीच्या पोकळ भागात (Hollow Earth) वसलेले असल्याचा दावा आहे. विविध कथांनुसार, हे शहर प्रगत तंत्रज्ञानाने युक्त असून येथे उच्च बुद्धिमत्ता असलेली सजीव जात राहते. अगार्थाच्या संकल्पनेचा उल्लेख विविध संस्कृती आणि पुराणकथांमध्ये आढळतो, ज्यात मुख्यतः तिबेटी बौद्ध धर्मातील शंबाला साम्राज्याचा संदर्भ दिला जातो. अगार्था या शहराशी जोडलेले अनेक गोष्टी आपण नक्कीच ऐकल्या असतील. एका विमान चालकाचा दावा होता कि त्याने हे शहर पाहिले आहे. अगार्था असे शहर आहे, ज्याचे सध्या तरी अस्तित्व फक्त कथा आणि पुराणांमध्ये आहे.
प्राचीन ग्रंथ: काही तत्त्वज्ञ आणि संशोधकांनी अगार्थाचे अस्तित्व प्राचीन ग्रंथांतून शोधले आहे. हिंदू आणि बौद्ध धर्मातील “पाताळलोक” किंवा “शंबाला” याचा संबंध अगार्थाशी जोडला जातो. म्हणतात कि, पृथ्वी आतून पोकळ आहे. आणि त्याखाली देखील एक विश्व आहे, असे बऱ्याच जणांचे म्हणणे आहे. यालाच एक प्रकारे HALLOW EARTH थेअरी म्हणतात. 19व्या आणि 20व्या शतकातील लेखकांनी पृथ्वी पोकळ असल्याच्या सिद्धांतातून अगार्थाची कल्पना पुढे नेली. एडमिरल रिचर्ड बर्ड यांच्यासारख्या संशोधकांनी अगार्थाच्या प्रवेशद्वारांचा शोध घेतल्याचा दावा केला आहे. अगार्थाच्या प्रवेशद्वाराचे अनेक वर्णन अनेकांनी केले आहेत. काही जणांनी तर याचा संदर्भ बर्मुडा तिकोनाशी जोडला आहे.
नेमकं काय आहे अगार्थाचे रहस्य?
वैज्ञानिक दृष्टिकोनातून पृथ्वीची रचना घन मानली जाते, पण पोकळ पृथ्वीच्या सिद्धांतानुसार, पृथ्वीच्या आत वेगळी सभ्यता अस्तित्वात असल्याचा विश्वास आहे. असे मानले जाते की, अंटार्क्टिका, हिमालय आणि काही इतर भागांवरून अगार्थामध्ये प्रवेश करता येतो. अगार्थामधील लोक उच्च तांत्रिकदृष्ट्या प्रगत असून मानवाच्या समस्यांचे समाधान शोधण्यास सक्षम असल्याचे सांगितले जाते.
अगार्थाचे अस्तित्व मानणाऱ्या लोकांच्या मते, हे शहर केवळ भौतिक नव्हे तर आध्यात्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे. मात्र, विज्ञानाच्या दृष्टिकोनातून याचा कोणताही पुरावा नाही. अनेकांनी या शहराचे वर्णन केले आहे. म्हंटले जाते कि हे शहर स्वर्गाहून सुंदर आहे. डोळे दिपवणारे उंच इमारत्या येथे आहेत. येथे सगळीकडे चमक आहे.
अगार्था: सत्य की कल्पना?
अगार्थाच्या कथेने विज्ञान, पुराणकथा आणि गूढशास्त्र यांचा संगम घडवला आहे. तरीही, त्याचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी कोणताही ठोस पुरावा अद्याप उपलब्ध नाही. अगार्थाचे रहस्य माणसाच्या कल्पनाशक्तीला चालना देणारे आहे. त्यामुळे हे शहर खरोखर अस्तित्वात आहे की केवळ पुराणकथांपुरते मर्यादित आहे, हे प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत.