
Joe Biden
नवी दिल्ली – अमेरिकाने चीनच्या सेमीकंडक्टर उद्योगाला मोठा झटका दिला आहे. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी चीनच्या सेमीकंडक्टर उद्योगात कार्यरत अमेरिकी नागरिकांना कठोर संदेश देत म्हटले की, चीनमध्ये नोकरी करणे सोडावे किंवा अमेरिकी नागरिकत्व. यामुळे १७ ऑक्टोबरच्या रात्री चीनच्या सेमी कंडक्टर कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या अमेरिकी कर्मचाऱ्यांनी एकाच वेळी राजीनामे दिले.
राजीनामा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आकड्याबाबत चीनने माैन बाळगले आहे. मात्र, अमेरिकी वृत्तसंस्थांच्या दाव्यानुसार, अशा कर्मचाऱ्यांची संख्या हजारांत आहे. हे सर्व मोठ्या पदांवर काम करत आहेत. अमेरिकेने गेल्या काही दिवसांत ३० चिनी सेमी कंडक्टर कंपन्यांना काळ्या यादीत टाकले होते. यासोबत चीनमध्ये आर्टिफिशयल इंटेलिजन्स विषयात प्रशिक्षित करणाऱ्या प्राध्यापकांना पाठवण्यासही मनाई केली होती.