Thousands of people die every year due to heatstroke Saudi Arabia imposes 16-year ban
मक्का : सौदी अरेबियातील हज यात्रा दरवर्षी जगभरातील मुस्लीमांसाठी एक पवित्र आणि अत्यंत भावनिक अनुभव असतो. मात्र गेल्या काही वर्षांपासून, अत्यंत उष्ण हवामानामुळे या यात्रेच्या काळात मृत्यूंचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. विशेषतः 2024 मध्ये मक्कामध्ये तापमान 50 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक नोंदवले गेले, ज्यामुळे 1300 हून अधिक यात्रेकरूंचा मृत्यू झाला, तर हजारो जणांना उष्माघात आणि डिहायड्रेशनचा त्रास झाला.
मात्र आता सौदी सरकारकडून आणि हवामान विभागाकडून दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. 2025 चा हज हंगाम हा उन्हाळ्याच्या तीव्रतेत होणारा शेवटचा हज असणार आहे. 2026 पासून पुढील 16 वर्षांसाठी हज यात्रा हळूहळू थंड हवामानात पार पडणार आहे, ज्यामुळे यात्रेकरूंना उष्णतेचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
इस्लामिक हिजरी कॅलेंडर चंद्राच्या गतीनुसार चालते, त्यामुळे ते ग्रेगोरियन कॅलेंडरच्या तुलनेत दरवर्षी अंदाजे 10 दिवस मागे सरकते. यामुळे हजच्या तारखा देखील दरवर्षी बदलतात. गेल्या अनेक वर्षांपासून हज यात्रा उन्हाळ्याच्या चढत्या तापमानात होत आहे. यावर्षी म्हणजे 2024 मध्ये, हज यात्रा 14 ते 19 जूनदरम्यान पार पडणार आहे. त्यावेळी मक्कामधील तापमान 46 ते 51 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Bangladesh Anti-Israel Passport : बांगलादेशात लाखो लोक रस्त्यावर उतरले पाहून युनूस सरकारचे धाबे दणाणले
गेल्या वर्षीच्या हज यात्रेदरम्यान मक्कामध्ये भयानक उष्णतेचा कहर झाला होता, ज्यात किमान 1301 यात्रेकरूंना आपला जीव गमवावा लागला. तसेच 2760 हून अधिक यात्रेकरूंना उष्माघात, डिहायड्रेशन आणि इतर उष्णतेशी संबंधित आजारांमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले. या गंभीर प्रकारांमुळे सौदी अरेबियाने आणखी प्रभावी उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू केली, आणि हवामान केंद्रानेही यावर संशोधन करत ठोस निष्कर्ष सादर केले.
सौदी राष्ट्रीय हवामान केंद्राने यावर्षी जाहीर केले की 2025 नंतर हज यात्रा हळूहळू वसंत ऋतूकडे, आणि पुढे हिवाळ्याकडे सरकणार आहे. त्यामुळे 2026 नंतरचे हज यात्रेकरूंना अधिक आरामदायक आणि सुरक्षित ठरणार आहे. थंड हवामानामुळे उष्माघात, डिहायड्रेशन आणि उष्णतेशी संबंधित मृत्यूंचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
हज आणि उमराह मंत्रालयाने दरवर्षी कोट्यवधी यात्रेकरूंसाठी यशस्वी व्यवस्थापन केले आहे. पण बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर, सरकारने सुरक्षेच्या दृष्टीने अनेक नवीन उपाय राबवले आहेत – यामध्ये थंड छावण्या, इंधनविरहीत शीतकरण यंत्रणा, आणि वैद्यकीय पथकांची संख्या वाढवण्याचा समावेश आहे. 2026 पासून थंड हवामानात हज होणार असल्यामुळे जगभरातील मुस्लीम भाविकांमध्ये समाधान आणि दिलासा व्यक्त केला जात आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : UAE चे इमाम भारतातील मुस्लिमांना नक्की काय म्हणाले? वक्फ बोर्डाबद्दल केले ‘हे’ विधान
उष्णतेमुळे होणाऱ्या मृत्यूंचा प्रश्न 2026 नंतर पूर्णपणे संपणार आहे, हा संदेश भाविकांसाठी अत्यंत दिलासादायक आहे. सौदी अरेबिया सरकारच्या योग्य नियोजनामुळे आणि इस्लामिक चंद्रकॅलेंडरमधील नैसर्गिक बदलामुळे, हज यात्रा पुन्हा एकदा भाविकांसाठी अधिक सुरक्षित, सोपी आणि सात्त्विक ठरणार आहे. आगामी काळात हज यात्रा केवळ धार्मिक विधी नव्हे, तर एक सुरक्षित आणि सुसज्ज अनुभव म्हणून ओळखली जाणार आहे, हे निश्चित आहे.