Tonight a rare sight of the Black Moon in space will be seen
आज २३ ऑगस्ट भारताचा राष्ट्रीय अंतराळ दिन. आजच्या दिवशी भारताने मोठा इतिहास रचला होता. २०२३ मध्ये आजच्या दिवशी भारताने चांद्रयान -३ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवले होते. असे करणारा भारत हा पहिला देश ठरला होता. हा दिवस भारतीयांसाठी खास आहेत. पण आजचा दिवस जगभरातील अंतराळवीर आणि खगोलशास्त्रज्ञांसाठी देखील खास ठरणार आहे.
यामागाचे कारणे म्हणजे आज अंतराळप्रेमी आणि खगोलशास्त्रज्ञ एक दुर्मीळ घटना म्हणजे ‘ब्लॅक मून (Black Moon)’ पाहू शकणार आहेl. ही घटना ३३ महिन्यांनी एकदा घडते. खरे तर ‘ब्लॅक मून’ हा शब्द खगोलशास्त्रीय नाही, पण अवकाश निरीक्षणाची आवड असणाऱ्यांसाठी आजचा चंद्र एक रोमांचकारी अनुभव घेऊन येणार आहे.
तुम्हाला माहितच असेल की दर महिन्यात एकच अमावस्या येते. पण जर एखाद्या महिन्यात दोन अमवस्या आल्या तर त्या दिवसाला ‘ब्लॅक मून’ असे म्हटले जाते. तसेच एका ऋतूमध्ये जेव्हा तीन ऐवजी चार अमवस्या येतात, त्यावेळी तिसऱ्या अमवस्येला ‘ब्लॅक मून’ म्हणतात. ही घटना अत्यंत दुर्मीळ असते. साधरण २९ ते ३३ महिन्यांनी घडते.
आजही अमावस्या असून चंद्रचा पृथ्वीच्या दिशेने असलेला भाग हा सूर्याच्या प्रकाशाने झाकला जाईल. यामुळे आजच्या दिवशी तुम्हाला आकाशात चंद्र दिसणार नाही. म्हणूनच याला ब्लॅक मून किंवा अदृश्य मून असे म्हटले जाते. पण हे दृश्य याला अतिशय खास बनवून टाकते.
यंदाच्या वर्षी ऋतू २० जून ते २२ सप्टेंबर दरम्यान विषुववृत्तांदरम्यान आहे. यावेळी २५ जून, २४ जुलै, २३ ऑगस्ट आणि २१ सप्टेंबर रोजी चार अमवस्या येत आहेत. या क्रमाने पाहिल्या आज २३ ऑगस्ट तिसरी अमवस्या आहे. यामुळे आज तुम्हाला ब्लॅक मून पाहायला मिळेल.
साधारणपणे एका ऋतूमध्ये तीन अमवस्य़ा येतात पण यंदाच्या वर्षी चार अमवस्या आहे. यातील तिसरी अमवस्या ब्लॅक मून म्हणून ओळखली जात असल्याचे आजच्या दिवसाचे महत्व अधिक वाढले आहे.
आज तुम्हाला अवकाशात प्रत्यक्ष ब्लॅक मून पाहायला मिळणारक नाही, तो अदृश्य असेल. चंद्रप्रकाश नसल्यामुळे रात्र अधिक गडद असले. यामुळे तारे, आकाशगंगा व इतर खगोलीय घटना तुम्हाला आज स्पष्टपणे पाहाता येणार आहे.
आज आणि उद्याच्या रात्री भारतासह उत्तर गोर्लाधाकतील देशांमध्ये आकाशगंगजेचे मनमोहक दृश्य तुम्हाला पाहायला मिळणार आहे. ही अंतराळप्रेमी आणि खगोलशास्त्रज्ञांसाठी अत्यंत सुवर्णसंधी आहे.
न्यूयॉर्कमध्ये पर्यटक बसचा भीषण अपघात; भारतीयांसह पाच परदेशींचा बळी, अनेक जखमी