जागतिक सुरक्षेला धोका? चीनच्या बॉर्डरवर उत्तर कोरियाने उभारला 'Secrate Base' ; अमेरिकेची वाढली चिंता? (फोटो सौजन्य: सोशल मीजिया)
अमेरिकेच्या थिंक टॅंकने दिलेल्या माहितीनुसार, चीनच्या सीमेपासून उत्तर कोरियाचा हा गुप्त तळ केवळ २७ किलोमीटर अंतरावर आहे. या तळावर ९ अणु क्षेपणास्त्रे तैनात केली आहेत. त्यांचे लॉन्चर्सही तैनात करण्यात आले आहेत. उत्तर कोरिया या तळावरुन थेट शत्रूवर हल्ला करण्याची योजना आखत असल्याचे अमेरिकेच्या थिंक टॅंकने म्हटले आहे.
किम जोंग उनची सटकली; दक्षिण कोरिया आणि अमेरिकेला दिला खतरनाक इशारा
थिंक टॅंकच्या अहवालानुसार, उत्तर कोरियाचा हा तळ नॉर्थ प्योंगयांग प्रदेशातील एका बेटाजवळ आहे. या ताळावरुन अमेरिका केवळ ७ हजार किलोमीटर अंतरावर आहे, तर दक्षिण कोरिया आणि जपान १०० किलोमीटरवर आहे. हे तिन्ही देश उत्तर कोरियाचे मोठे शत्रू आहेत. यामुळे हा तळ उत्तर कोरियाला त्यांच्या शत्रू राष्ट्रांवर थेट दबाव आणण्यासाठी महत्वाचा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या तळाचे बांधकाम २००४ मध्ये सुरु करण्यात आले होते. २०१४ पर्यंत हा तळ पूर्णत: कार्यरत झाला आहे. याचे क्षेत्रफळ २२ चौरस किलोमीटर आहे. या तळावर हजारो उत्तर कोरियाचे सैनिक तैनात आहेत. या तळावर १५ क्षेपणास्त्रे सामावून घेण्याची क्षमता आहे. तसेच याठिकाणी भूमिगत तळही तयार करण्यात आले आहे. यामुळे जमिनीखालूनही उत्तर कोरिया सहज हल्ल करु शकतो तसेच मोठा शस्त्रसाठाही करु शकतो. पूर्वी हा तळ झाडांच्या फाद्यांना झाकून ठेवण्यात आला होता, परंतु हा तळ आहात उघडपणे दिसून येत आहे.
चीनजवळच का उभारला तळ?
सध्या प्रश्न पडला आहे की, किम जोंग उन यांना हा तळ चीनजवळ का उभारला आहे असा प्रश्न पडला आहे. तज्ज्ञांच्य मते, अमेरिका हा चीनचाही मोठा शत्रू आहे. यामुळे युद्धात चीनही अमेरिकेविरोधात उत्तर कोरियाला साथ देण्याची शक्यता आहे. शिवाय अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांजवळ तळ उभारणे उत्तर कोरियासाठी धोकादायक आहे. यामुळे चीनच्या मदतीने हा तळ उत्तर कोरियाचा एक सुरक्षा कवच बनु शकतो.
उत्तर कोरियाची शस्त्र ताकद
सध्या उत्तर कोरियाकडे ५० अण्वस्त्रे आहेत. याचा वापर झाल्यास प्रचंग विध्वंस होईल. शिवाय उत्तर कोरिया सध्या त्यांच्या शस्त्रांमध्ये वाढ करत आहे. लष्करी ताकदीमध्येही वाढ करत आहे.






