Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Global India:’ते सोबत रामायण अन् गीता घेऊन आले होते!’ PM कमला प्रसाद यांच्या भाषणाने भारतीय अंतर्मुख; नेल्सन बेटाचे होणार नामांतर

Nelson Island : पंतप्रधान कमला प्रसाद यांनी एक प्रभावी भाषण दिले आहे, जे सध्या चर्चेत आहे. त्या म्हणाल्या, "ते (भारतीय वेठबिगार) आपल्यासोबत रामायण, गीता आणि कुराण घेऊन आले होते.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: May 10, 2026 | 01:34 PM
trinidad pm announces renaming of nelson island to honor indian heritage 2026

trinidad pm announces renaming of nelson island to honor indian heritage 2026

Follow Us
Close
Follow Us:
  • ऐतिहासिक घोषणा
  • भारतीय वारशाचा सन्मान
  • वेठबिगारीची अमानवीय प्रथा

Nelson Island Renaming Trinidad 2026 : त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या भूमीवरून आज एका नवीन इतिहासाची ठिणगी पडली आहे. सात समुद्र पार करून, ‘काळे पाणी’ ओलांडून आलेल्या लाखो भारतीय पूर्वजांच्या संघर्षाला आणि त्यागाला अखेर न्याय मिळताना दिसत आहे. त्रिनिदादच्या पंतप्रधान कमला प्रसाद-बिसेसर यांनी ९ मे रोजी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या उपस्थितीत एक ऐतिहासिक निर्णय जाहीर केला. पोर्ट-ऑफ-स्पेनच्या पश्चिमेला असलेल्या आणि भारतीय मजुरांचे पहिले पाऊल पडलेल्या ‘नेल्सन बेटाचे’ (Nelson Island) नाव आता बदलले जाणार आहे. हे नाव भारतीय वारसा आणि ओळखीला खऱ्या अर्थाने प्रतिबिंबित करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Cyber Attack: जगभरातील 9000 विद्यापीठांवर सायबर अटॅक; विद्यार्थ्यांच्या कॉम्प्युटरवर हॅकर्सनी पाठवला ‘असा’ संदेश, इंटरनेटवर वादळ

एका भावूक प्रवासाची आठवण: रामायण, गीता आणि कुराण

पंतप्रधान कमला प्रसाद-बिसेसर यांनी या प्रसंगी दिलेले भाषण केवळ राजकीय नव्हते, तर ते प्रत्येक भारतीय वंशाच्या व्यक्तीच्या हृदयाला भिडणारे होते. त्या म्हणाल्या, “जेव्हा आमचे पूर्वज या बेटावर उतरले, तेव्हा त्यांच्याकडे भौतिक संपत्ती नव्हती. पण ते आपल्यासोबत रामायण, गीता आणि कुराण घेऊन आले होते. त्यांच्या डोळ्यांत स्वतःसाठी आणि आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक स्वप्न होते.” त्यांना इंग्रजी भाषा येत नव्हती, त्यांना कोणत्या अटींवर येथे आणले जात आहे हे ठाऊक नव्हते, तरीही त्यांनी या मातीत आपले रक्त सांडले आणि आज त्रिनिदादच्या प्रगतीत सिंहाचा वाटा उचलला.

NELSON ISLAND TO BE RENAMED
Today, the Honourable Dr. Subrahmanyam Jaishankar, India’s Minister of External Affairs, and I visited Nelson Island, where we unveiled a commemorative plaque marking the restoration and upgrading of this historic site.
Nelson Island holds profound… pic.twitter.com/8OnnO1PSZR — Kamla Persad-Bissessar (@PM_Kamla) May 9, 2026

credit – social media and Twitter

नेल्सन बेटाचे ऐतिहासिक महत्त्व आणि समितीची स्थापना

हे नामांतर केवळ नावापुरते मर्यादित नसावे, यासाठी एका उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. पंतप्रधान कार्यालयातील स्थायी सचिव नताशा बॅरो या समितीच्या अध्यक्ष असतील. ही समिती नॅशनल ट्रस्टच्या सहकार्याने आणि नागरिकांच्या सूचनांनुसार नवीन नाव निश्चित करेल. १८६६ ते १९१७ या काळात नेल्सन बेट हे भारतीय मजुरांसाठी ‘क्वारंटाइन’ आणि नोंदणीचे केंद्र होते. ‘हंबर’ नावाचे पहिले जहाज जेव्हा १८६६ मध्ये येथे आले, तेव्हा त्यातील ४७३ भारतीयांच्या संघर्षाची कहाणी याच बेटावर लिहिली गेली होती.

My remarks at the historic Nelson Island where the Girmitiyas first arrived. With @PM_Kamla #TrinidadAndTobago https://t.co/yT8IhLdmhc — Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) May 10, 2026

credit – social media and Twitter

वेठबिगारी: गुलामीचाच एक प्रकार

पंतप्रधानांनी अत्यंत स्पष्टपणे मांडले की, करारबद्ध मजुरी (Indentured Labour) हा मानवी तस्करीचाच एक प्रकार होता. पूर्वीच्या गुलामीच्या व्यापाराप्रमाणेच येथेही शोषण आणि अपमान होता. “आज आपण आपल्या पूर्वजांचा सन्मान करत असताना, ज्या अन्यायकारक व्यवस्थेत ते अडकले होते, त्याबद्दल सत्य बोलणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल,” असे सांगत त्यांनी मजुरांच्या अमानवीय छळाचा पाढा वाचला. आज त्रिनिदादची ४२% लोकसंख्या भारतीय वंशाची असून, ही घोषणा या समुदायासाठी अत्यंत गौरवाची मानली जात आहे.

Honored to travel with PM Kamla Persad-Bissessar to Nelson Island where the Girmitiyas first arrived. @PM_Kamla #TrinidadAndTobago 🇮🇳 🇹🇹 pic.twitter.com/9jmRXCDjas — Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) May 9, 2026

credit – social media and Twitter

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Victory Day : ‘युक्रेनमध्ये जे घडतंय ते योग्य’ विजय दिनी पुतिन यांची नाटोवर तोफ; रणगाड्यांशिवाय पार पडलं रशियन लष्करी संचलन

एस. जयशंकर यांची उपस्थिती आणि भारताचे वाढते वर्चस्व

भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या उपस्थितीत या बेटावर एका विशेष स्मारक फलकाचे अनावरण करण्यात आले. वॉटर टॅक्सीने या ऐतिहासिक बेटाला भेट देणे, हा एक प्रतिकात्मक संदेश होता की भारत आपल्या परदेशातील बांधवांच्या मुळांशी आजही जोडलेला आहे. त्रिनिदादमध्ये राहणारे ५.५ लाखांहून अधिक भारतीय वंशाचे लोक आजही आपली संस्कृती आणि धर्म जोपासत आहेत. या नामांतराच्या निर्णयामुळे भारत आणि त्रिनिदाद यांच्यातील राजनैतिक संबंधांना एक नवीन भावनिक परिमाण प्राप्त झाले आहे.

Web Title: Trinidad pm announces renaming of nelson island to honor indian heritage 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 10, 2026 | 01:27 PM

Topics:  

  • S. Jaishankar

संबंधित बातम्या

Vaccine Maitri : ‘या’ एका देशाने लोकसंख्येच्या 8 पट लसी साठवल्या; सुरीनाममध्ये S Jaishankar यांनी विकसित देशांचे काढले वाभाडे
1

Vaccine Maitri : ‘या’ एका देशाने लोकसंख्येच्या 8 पट लसी साठवल्या; सुरीनाममध्ये S Jaishankar यांनी विकसित देशांचे काढले वाभाडे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.