Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tariff War : ‘तर अब्जावधी डॉलर्स परत करावे लागतील!’ सर्वोच्च न्यायालयाच्या टॅरिफवरील निर्णयापूर्वी ट्रम्पची धाकधूक वाढली

Trump Supreme Court tariff ruling 2026 : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या टॅरिफ धोरणाबाबत एक विधान जारी केले आहे आणि ट्रम्प स्वतः त्याबद्दल चिंतेत असल्याचे दिसून येते.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jan 21, 2026 | 01:24 PM
trump afraid of us supreme court tariff ruling 130 billion refund threat 2026

trump afraid of us supreme court tariff ruling 130 billion refund threat 2026

Follow Us
Close
Follow Us:
  • अब्जावधी डॉलर्सचा रिफंड
  • ट्रम्प यांची कबुली
  • वादग्रस्त विधाने

Trump Supreme Court tariff ruling 2026 : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या दुसऱ्या कार्यकाळाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी आपल्या यशाचा पाढा वाचला खरा, पण एका महत्त्वाच्या मुद्द्यावर त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे चिंता दिसून आली. ती चिंता म्हणजे ‘अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा टॅरिफवरील निकाल’. ट्रम्प यांनी स्पष्ट शब्दांत कबुली दिली की, जर सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या टॅरिफ धोरणाविरुद्ध निकाल दिला, तर अमेरिकेला गेल्या वर्षभरात कमावलेले अब्जावधी डॉलर्स व्याजासह परत करावे लागतील, ज्यामुळे देशाच्या तिजोरीवर मोठा ताण येऊ शकतो.

काय आहे ‘टॅरिफ’चा हा कायदेशीर पेच?

डोनाल्ड ट्रम्प यांनी पदभार स्वीकारताच ‘लिबरेशन डे’ (२ एप्रिल २०२५) अंतर्गत जगातील अनेक देशांतील वस्तूंवर १०% ते ५०% पर्यंत आयात शुल्क (Tariffs) लादले होते. यामध्ये भारत, चीन, ब्राझील आणि युरोपीय देशांचा समावेश होता. ट्रम्प यांनी यासाठी १९७७ च्या ‘आंतरराष्ट्रीय आणीबाणी आर्थिक अधिकार कायद्याचा’ (IEEPA) आधार घेतला होता. मात्र, अमेरिकेतील १२ राज्यांनी आणि अनेक लघु व्यावसायिकांनी याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यांचा दावा आहे की, टॅरिफ लावण्याचा अधिकार काँग्रेसचा (संसद) आहे, राष्ट्राध्यक्षांचा नाही.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘Mr President, F*** Off…’ युरोपियन संसदेत हाय व्होल्टेज ड्रामा! डॅनिश खासदाराने Trumpची काढली खरडपट्टी; पहा VIDEO

“जर आपण हरलो तर…” ट्रम्प यांची भीती

मंगळवारी ओव्हल ऑफिसमध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले, “मला माहित नाही की सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेईल. पण जर हा खटला आमच्या विरोधात गेला, तर आम्हाला टॅरिफमधून जमा केलेले १२० ते १३० अब्ज डॉलर्स परत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावे लागतील. हे काम अत्यंत कठीण आणि गोंधळाचे असेल.” कायदेतज्ज्ञांच्या मते, जर न्यायालयाने ट्रम्प यांचे निर्णय असंवैधानिक ठरवले, तर हा अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठा आर्थिक परतावा (Refund) ठरेल.

JUST IN: 🇺🇸 Supreme Court may force President Trump to refund over $133 billion in tariff revenue. pic.twitter.com/Glx8iZmjB3 — Watcher.Guru (@WatcherGuru) January 6, 2026

credit – social media and Twitter

सोमालिया आणि मिनेसोटावरून खळबळजनक आरोप

याच पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी आपला मोर्चा मिनेसोटा राज्याकडे वळवला. कोणताही ठोस पुरावा न देता त्यांनी दावा केला की, मिनेसोटामध्ये १९ अब्ज डॉलर्सचा मोठा आर्थिक घोटाळा झाला आहे आणि हा पैसा ‘सोमालियन’ लोकांनी लुटला आहे. ट्रम्प यांनी सोमालियावर टीका करताना म्हटले, “सोमालिया हा खरं तर देशही नाही; जर तो देश असेल तर तो जगातील सर्वात वाईट देश आहे.” त्यांच्या या विधानामुळे अमेरिकेतील सोमालियन समुदायात आणि मानवाधिकार संघटनांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Global Trade: भारतावर 500% टॅरिफ लागणार नाही! Trumpच्या मंत्र्यांचा मोठा खुलासा; रशियन तेलाच्या मुद्द्यावर ‘या’ देशाला शिकवणार धडा

व्हेनेझुएला आणि ‘डॉनरो’ डॉक्ट्रिन (Donroe Doctrine)

परराष्ट्र धोरणावर बोलताना ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मदुरो यांना पकडण्याच्या मोहिमेचे समर्थन केले. “व्हेनेझुएला आता आमच्या नियंत्रणात आहे आणि आम्ही तिथल्या तेल उद्योगाचा विकास करून अमेरिकन कंपन्यांना फायदा मिळवून देऊ,” असे ते म्हणाले. त्यांनी जुन्या ‘मनरो डॉक्ट्रिन’ला बदलून स्वतःच्या नावावर ‘डॉनरो डॉक्ट्रिन’ असे नाव दिले असून, पश्चिम गोलार्धात अमेरिकेचे वर्चस्व कोणीही आव्हावू शकणार नाही, अशी गर्जना केली.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ट्रम्प यांचे टॅरिफ धोरण का वादात आहे?

    Ans: ट्रम्प यांनी संसदेच्या मंजुरीशिवाय आणीबाणीच्या अधिकारांचा वापर करून आयात शुल्क लावले आहे, ज्याला १२ राज्यांनी असंवैधानिक ठरवत कोर्टात आव्हान दिले आहे.

  • Que: सर्वोच्च न्यायालयाने निकाल विरोधात दिल्यास काय होईल?

    Ans: सरकारला आतापर्यंत वसूल केलेले सुमारे १३० अब्ज डॉलर्स संबंधित कंपन्या आणि देशांना परत करावे लागतील, ज्यामुळे अर्थव्यवस्थेत गोंधळ उडू शकतो.

  • Que: ट्रम्प यांनी सोमालियाबद्दल काय म्हटले?

    Ans: ट्रम्प यांनी सोमालियाला "जगातील सर्वात वाईट देश" म्हटले असून, मिनेसोटातील १९ अब्ज डॉलर्सच्या घोटाळ्यासाठी सोमालियन स्थलांतरितांना जबाबदार धरले आहे.

Web Title: Trump afraid of us supreme court tariff ruling 130 billion refund threat 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 21, 2026 | 01:24 PM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • international news
  • Trump tariffs

संबंधित बातम्या

स्वित्झर्लंड दौऱ्यादरम्यान ट्रम्प यांच्या Air Force One विमानात तांत्रिक बिघाड; अमेरिकेत खळबळ
1

स्वित्झर्लंड दौऱ्यादरम्यान ट्रम्प यांच्या Air Force One विमानात तांत्रिक बिघाड; अमेरिकेत खळबळ

‘Mr President, F*** Off…’ युरोपियन संसदेत हाय व्होल्टेज ड्रामा! डॅनिश खासदाराने Trumpची काढली खरडपट्टी; पहा VIDEO
2

‘Mr President, F*** Off…’ युरोपियन संसदेत हाय व्होल्टेज ड्रामा! डॅनिश खासदाराने Trumpची काढली खरडपट्टी; पहा VIDEO

Global Trade: भारतावर 500% टॅरिफ लागणार नाही! Trumpच्या मंत्र्यांचा मोठा खुलासा; रशियन तेलाच्या मुद्द्यावर ‘या’ देशाला शिकवणार धडा
3

Global Trade: भारतावर 500% टॅरिफ लागणार नाही! Trumpच्या मंत्र्यांचा मोठा खुलासा; रशियन तेलाच्या मुद्द्यावर ‘या’ देशाला शिकवणार धडा

नोबेल पुरस्कारासाठी वेडे झाले ट्रम्प! १, २ नव्हे थेट ८ पुरस्काराची केली मागणी; म्हणाले…
4

नोबेल पुरस्कारासाठी वेडे झाले ट्रम्प! १, २ नव्हे थेट ८ पुरस्काराची केली मागणी; म्हणाले…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.