Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ट्रम्प यांनी ४ वेळा फोन केला, पण मोदींनी संवाद टाळला? जर्मन मासिकाचा खळबळजनक दावा

टॅरिफ वादावरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चार वेळा फोन केला, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद टाळला. जर्मन मासिकाच्या या खळबळजनक दाव्यामुळे दोन्ही देशांच्या संबंधात तणाव असल्याच्या चर्चांना उधाण.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Aug 26, 2025 | 09:18 PM
ट्रम्प यांनी ४ वेळा फोन केला, पण मोदींनी संवाद टाळला? जर्मन मासिकाचा खळबळजनक दावा
Follow Us
Close
Follow Us:
  • ट्रम्प यांनी ४ वेळा फोन केला, पण मोदींनी संवाद टाळला?
  • जर्मन मासिकाचा खळबळजनक दावा
  • दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये तणाव असल्याच्या चर्चांना उधाण
Trump Modi Phone Calls: अमेरिका आणि भारत यांच्यातील टॅरिफ वादावरून एक धक्कादायक दावा समोर आला आहे. जर्मन मासिकाने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चार वेळा फोन केला, पण मोदींनी त्यांच्याशी बोलणे टाळले. या दाव्यानंतर दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये तणाव असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

जर्मन मासिकाचा मोठा खुलासा

जर्मनीतील एका प्रतिष्ठित मासिकाने (FAZ) दिलेल्या वृत्तानुसार, टॅरिफच्या मुद्द्यावर सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी मोदींशी चार वेळा फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना यश आले नाही. जर ही बातमी खरी असेल, तर ट्रम्प यांच्या दबावाखाली न झुकणारे मोदी हे एकमेव जागतिक नेते ठरले आहेत. मात्र, या प्रकरणावर दोन्ही देशांच्या सरकारांनी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

TRUMP CALLS, MODI DOESN’T PICK UP So far, the US President has overwhelmed all opponents in the tariff dispute. NOT INDIA. Trump called Prime Minister Narendra Modi 4 times in the Past Few Weeks PM didn’t Respond to Any Call by Trump 💯 Chad Priest King for a Reason 🗿🔥 pic.twitter.com/FgnDIkLka9 — Nationalist Mumbaikar 🇮🇳™ (@Ayush_Shah_25) August 26, 2025

उपराष्ट्रपतींचाही फोन घेतला नव्हता

यापूर्वीही पंतप्रधान मोदींनी अशाच प्रकारे अमेरिकेच्या नेत्यांशी संवाद टाळल्याची घटना घडली होती. पाकिस्तानसोबतच्या संघर्षाच्या वेळी, ९ मे च्या रात्री, अमेरिकेच्या उपराष्ट्रपतीने ३-४ वेळा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्या वेळी लष्कराच्या बैठकांमध्ये व्यस्त असल्याने मोदींनी त्यांचा फोन घेतला नव्हता, असे त्यांनी लोकसभा निवडणुकीत सांगितले होते.

भारतीयांसाठी H1-B व्हिसा होणार बंद? जाणून घ्या काय म्हणाले अमेरिकन रिपब्लिकन सिनेटर

मोदींनी सांगितले होते की, “जेव्हा मी त्यांना फोन केला, तेव्हा उपराष्ट्रपतीने मला पाकिस्तान मोठ्या हल्ल्याची तयारी करत असल्याची माहिती दिली. त्यावेळी मी त्यांना सांगितले की, जर पाकिस्तानने भारतावर हल्ला केला, तर आमचा हल्ला त्याहून मोठा असेल, कारण आम्ही गोळीला तोफेने उत्तर देऊ.”

भारतावर अमेरिकेने लावला टॅरिफ

डोनाल्ड ट्रम्प पुन्हा व्हाईट हाऊसमध्ये आल्यापासून भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंधात तणाव दिसून येत आहे. ट्रम्प प्रशासनाने भारतावर २५% टॅरिफ लावला आहे. तसेच, रशियाकडून तेल खरेदी केल्यामुळे अतिरिक्त २५% टॅरिफ लावण्यात आला आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंधात दुरावा निर्माण झाल्याचे संकेत मिळत आहेत. मात्र, दोन्ही देशांमध्ये टॅरिफ वादावर चर्चा सुरू असल्याचे भारताने स्पष्ट केले आहे.

Web Title: Trump called 4 times but modi avoided communication german magazine makes sensational claim

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2025 | 09:17 PM

Topics:  

  • Donald Trump
  • international news
  • PM Narendra Modi
  • Tarrif

संबंधित बातम्या

अमेरिकेने सौदी क्राउन प्रिन्सला दिला धोका? F-35 फायटर जेटबाबत ट्रम्प यांनी खेळली ही मोठी खेळ, प्रकरण काय?
1

अमेरिकेने सौदी क्राउन प्रिन्सला दिला धोका? F-35 फायटर जेटबाबत ट्रम्प यांनी खेळली ही मोठी खेळ, प्रकरण काय?

खासगी अंतराळ क्षेत्रात भारताची मोठी भरारी! पंतप्रधान मोदींच्या हस्ते ‘Vikram-I रॉकेटचे अनावरण, जाणून घ्या क्षमता आणि वैशिष्ट्ये
2

खासगी अंतराळ क्षेत्रात भारताची मोठी भरारी! पंतप्रधान मोदींच्या हस्ते ‘Vikram-I रॉकेटचे अनावरण, जाणून घ्या क्षमता आणि वैशिष्ट्ये

Radar Proof : युद्धाच्या पार्शवभूमीवर ड्रॅगनचा आश्चर्यकारक दावा; लुफा तंत्रज्ञानामुळे गुप्तचर विमान होऊ शकते पूर्णपणे ‘अदृश्य’
3

Radar Proof : युद्धाच्या पार्शवभूमीवर ड्रॅगनचा आश्चर्यकारक दावा; लुफा तंत्रज्ञानामुळे गुप्तचर विमान होऊ शकते पूर्णपणे ‘अदृश्य’

Transcript : ‘Trumpना प्रशंसा आवडते, म्हणून जेव्हा Putin फोन करतात…’ लीक फोन कॉलमुळे आंतरराष्ट्रीय राजकारणातील गुपिते उघड
4

Transcript : ‘Trumpना प्रशंसा आवडते, म्हणून जेव्हा Putin फोन करतात…’ लीक फोन कॉलमुळे आंतरराष्ट्रीय राजकारणातील गुपिते उघड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.