
Marco Rubio Resignation Trump Administration News
अमेरिकन राजकारणात सध्या प्रचंड उलथापालथ पाहायला मिळत आहे. नुकत्याच पार पडलेल्या मध्यावधी निवडणुकांमध्ये (Midterm Elections) राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या रिपब्लिकन पक्षाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. काँग्रेसच्या दोन्ही सभागृहांमधील बहुमत गमावल्यानंतर व्हाईट हाऊसमध्ये राजीनाम्यांचे सत्र सुरू झाल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. यातच अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो (Marco Rubio) हे देखील आपल्या पदाचा राजीनामा देऊन ट्रम्प प्रशासनातून बाहेर पडणार आणि २०२८ च्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीची तयारी करणार, असा दावा एका अहवालात करण्यात आला होता. मात्र, या सर्व अटकळींवर स्वतः मार्को रुबियो यांनी मौन तोडले असून या बातम्या पूर्णपणे निराधार असल्याचे स्पष्ट केले आहे.
ब्लूमबर्ग आणि द इंडिपेंडेंट सारख्या आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, मध्यावधी निवडणुकांतील पराभवानंतर रुबियो ट्रम्प प्रशासनातून बाहेर पडण्याचे पर्याय शोधत असल्याचा दावा करण्यात आला होता. या वृत्ताने अमेरिकन राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Los Angeles : ‘लज्जास्पद…’ लॉस एंजेलिसमधील पराभवांनंतर ट्रम्प संतापले; भारतीय वंशाच्या नित्या रमण यांचा ऐतिहासिक विजय
परंतु, ‘द न्यूयॉर्क टाइम्स’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत मार्को रुबियो यांनी या सर्व बातम्या फेटाळून लावल्या. व्हाईट हाऊसमधील आपल्या कार्यालयात बोलताना रुबियो म्हणाले, “प्रामाणिकपणे सांगायचे तर, या गोष्टी नेमक्या कुठून आणि कशा पसरतात हे मला खरोखरच ठाऊक नाही. मला माझे काम अत्यंत आवडते. जेव्हा लोक म्हणतात की मी माझी नोकरी सोडणार आहे, तेव्हा मला हसू येते आणि मी विचारतो— नक्की कोणती नोकरी सोडणार?” रुबियो यांनी पुढे स्पष्ट केले की, डोनाल्ड ट्रम्प यांच्या संपूर्ण कार्यकाळाच्या शेवटपर्यंत त्यांच्यासोबत काम करणे हीच त्यांची नेहमीची योजना राहिली आहे.
अमेरिकेत नुकत्याच झालेल्या मध्यावधी निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षाची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली. यामुळे प्रशासनाविरोधात आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांवर टीका वाढू लागली आहे. काही दिवसांपूर्वीच ट्रम्प यांच्या अत्यंत जवळच्या मानल्या जाणाऱ्या आणि अमेरिकेच्या न्याय विभागाच्या नागरी हक्क विभागाच्या प्रमुख हरमीत ढिल्लन यांनी राजीनामा दिला होता. या घडामोडींमुळे रुबियो यांच्या राजीनाम्याच्या चर्चांना अधिक खतपाणी मिळाले. तथापि, अमेरिकन परराष्ट्र व्यवहार विभागाने (State Department) आणि व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्यांनीही या वृत्तांना “पायाहीन आणि काल्पनिक षड्यंत्र” असल्याचे सांगत वृत्त पूर्णपणे फेटाळले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Israel Politics : नेतान्याहूंचे वर्चस्व संपणार? इस्रायलमध्ये सत्तांतराचे वारे; गादी आयझेनकोट यांना 67 खासदारांचा मोठा पाठिंबा
मुलाखतीदरम्यान रुबियो यांना २०२८ मध्ये होणाऱ्या अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याबाबतही प्रश्न विचारण्यात आला. यावर रुबियो यांनी स्पष्टपणे सांगितले की, त्यांना सध्या २०२८ च्या राजकारणावर कोणतीही चर्चा करायची नाही. उपाध्यक्ष जे.डी. व्हान्स (JD Vance) आणि रुबियो यांच्यात २०२८ च्या उमेदवारीवरून अंतर्गत तणाव असल्याच्या बातम्यांवर उत्तर देताना रुबियो म्हणाले, “जे.डी. व्हान्स हे माझे अत्यंत चांगले मित्र आहेत. जर त्यांनी २०२८ मध्ये राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला, तर मी त्यांना नक्कीच पाठिंबा देईन.” या सर्व स्पष्टीकरणानंतर आता मार्को रुबियो यांच्या राजीनाम्याबाबत सुरू असलेल्या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला असून, ते ट्रम्प यांच्या परराष्ट्र धोरणांचे नेतृत्व यापुढेही खंबीरपणे करत राहतील हे निश्चित झाले आहे.
Ans: नाही, मार्को रुबियो यांनी राजीनाम्याच्या बातम्या पूर्णपणे फेटाळून लावल्या असून ते ट्रम्प यांच्या कार्यकाळाच्या शेवटपर्यंत परराष्ट्र सचिव म्हणून कार्यरत राहतील असे स्पष्ट केले आहे.
Ans: अमेरिकन मध्यावधी निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षाचा पराभव झाल्यानंतर ब्लूमबर्ग आणि इतर काही माध्यमांनी रुबियो पद सोडू शकतात असा अहवाल प्रसिद्ध केला होता.
Ans: रुबियो यांनी २०२८ च्या शर्यतीवर थेट बोलणे टाळले आणि उपाध्यक्ष जे.डी. व्हान्स जर निवडणुकीच्या शर्यतीत उतरले, तर त्यांना आपला पूर्ण पाठिंबा असेल असे सांगितले.