Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 6 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Midterms : कोण आहेत हरमीत ढिल्लन? ट्रम्प यांच्या निवडणुकीतील पराभवानंतर राजीनामा; अमेरिकेत राजकीय गदारोळ

US Midterms : अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकांनंतर ट्रम्प प्रशासनाला मोठा धक्का बसला आहे. नागरी हक्क विभागाच्या प्रमुख हरमीत ढिल्लन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Nov 06, 2026 | 12:39 PM
Harmeet Dhillon Resignation US Midterm Election Results 2026

Harmeet Dhillon Resignation US Midterm Election Results 2026

Follow Us
Follow Us:
  • ट्रम्प प्रशासनाला मोठा झटका
  • विभागाच्या धोरणात मोठा बदल
  • न्यायालयीन पराभव आणि कर्मचाऱ्यांची गळती

अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीचे (US Midterms) निकाल समोर आल्यानंतर वॉशिंग्टनच्या राजकीय वर्तुळात मोठे हादरे बसू लागले आहेत. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाला पहिला मोठा धक्का बसला असून, अमेरिकेच्या न्याय विभागातील नागरी हक्क विभागाच्या (Civil Rights Division) प्रमुख आणि भारतीय वंशाच्या वकील हरमीत ढिल्लन यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. मध्यावधी निवडणुकांमध्ये ट्रम्प यांच्या पक्षाला बसलेल्या फटक्यानंतर प्रशासनातून बाहेर पडणाऱ्या ढिल्लन या पहिल्या वरिष्ठ अधिकारी ठरल्या आहेत. त्यांच्या या अचानक एक्झिटमुळे अमेरिकन न्याय विभाग आणि राजकीय वर्तुळात तीव्र चर्चांना उधाण आले आहे.

हरमीत ढिल्लन कोण आहेत आणि ट्रम्प प्रशासनातील त्यांची भूमिका काय होती?

भारतीय वंशाच्या नामांकित वकील हरमीत ढिल्लन या ट्रम्प यांच्या अत्यंत विश्वासू आणि निकटवर्ती मानल्या जातात. डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचार मोहिमेत त्यांनी प्रमुख कायदेशीर सल्लागार म्हणून काम पाहिले होते. त्यानंतर ट्रम्प प्रशासनात त्यांच्यावर न्याय विभागाच्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या नागरी हक्क विभागाची (Assistant Attorney General for Civil Rights) धुरा सोपवण्यात आली होती.

सुमारे दीड वर्षांच्या आपल्या कार्यकाळात ढिल्लन यांनी या विभागाची पारंपारिक कार्यपद्धती पूर्णपणे बदलून टाकली. पूर्वी हा विभाग मुख्यत्वे मतदानाचा अधिकार, पोलिसांमधील सुधारणा आणि वर्णद्वेषविरोधी कायदे राबवण्यावर भर देत असे. परंतु, ढिल्लन यांनी ट्रम्प यांच्या पुराणमतवादी अजेंड्यानुसार काम करत ‘DEI’ (Diversity, Equity, and Inclusion – विविधता, समानता आणि समावेश) या धोरणांना कठोर विरोध केला. तसेच महिला व मुलींच्या खेळांमधील सुरक्षितता आणि ‘वोक’ (Woke) विचारसरणीविरोधात त्यांनी आक्रमक भूमिका घेतली.

ॲटर्नी जनरल टॉड ब्लँच यांच्याकडून कौतुक अन् सोशल मीडियावरील प्रतिक्रिया

हरमीत ढिल्लन यांच्या राजीनाम्याची बातमी समोर आल्यानंतर अमेरिकेचे ॲटर्नी जनरल टॉड ब्लँच यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ (X) वर पोस्ट करत त्यांच्या कामाचे कौतुक केले. ब्लँच यांनी म्हटले की, “हरमीत ढिल्लन यांनी अत्यंत खंबीरपणे आणि अढळ निष्ठा ठेवून नागरी हक्क विभागाचे नेतृत्व केले. कोणत्याही भेदभावाशिवाय कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे.”

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Israel Politics : नेतान्याहूंचे वर्चस्व संपणार? इस्रायलमध्ये सत्तांतराचे वारे; गादी आयझेनकोट यांना 67 खासदारांचा मोठा पाठिंबा

दुसरीकडे, हरमीत ढिल्लन यांनी स्वतः ‘एक्स’वर पोस्ट लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या. नागरी हक्कांसाठी सहाय्यक ॲटर्नी जनरल (AAG) म्हणून अमेरिकेची सेवा करणे हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा बहुमान होता, असे त्यांनी म्हटले. आपल्या कार्यकाळात डाव्या विचारसरणीच्या बेकायदेशीर धोरणांना तिलांजली देण्याचे काम केल्याचा दावा त्यांनी केला. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या संधीबद्दल आभार मानत, आपण भविष्यातील नव्या संधींसाठी उत्सुक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 ढिल्लन यांच्या कार्यकाळातील मोठे वाद आणि निर्णय

हरमीत ढिल्लन यांचा कार्यकाळ अत्यंत वादग्रस्त आणि राजकीय घडामोडींनी भरलेला राहिला. त्यांच्या कारकिर्दीतील प्रमुख मुद्दे खालीलप्रमाणे आहेत:

 १. कर्मचाऱ्यांची मोठी गळती (७५% कर्मचाऱ्यांचा राजीनामा)

ढिल्लन यांच्या विभागात पदभार स्वीकारल्यानंतर काही काळातच जुन्या कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला. त्यांच्या वादग्रस्त कार्यपद्धतीमुळे आणि धोरणांमधील बदलांमुळे नागरी हक्क विभागातील ७५ टक्क्यांहून अधिक अनुभवी कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडली किंवा त्यांना काढण्यात आले. या रिक्त जागांवर ढिल्लन यांनी उजव्या विचारसरणीच्या वकिलांची नियुक्ती केली खरी, परंतु या नवीन कर्मचाऱ्यांना अनुभवाची मोठी कमतरता भासत होती.

 २. शस्त्र बाळगण्याच्या हक्कासाठी (Second Amendment) स्वतंत्र विभाग

अमेरिकन संविधानाच्या दुसऱ्या दुरुस्तीनुसार नागरिकांना शस्त्र बाळगण्याचा हक्क मिळतो. या उजव्या विचारसरणीच्या अजेंड्याला पाठिंबा देत ढिल्लन यांनी न्याय विभागात या हक्काच्या संरक्षणासाठी एक स्वतंत्र कक्ष किंवा विभागच स्थापन केला होता, ज्यावरून अमेरिकेत मोठा वाद झाला होता.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : France Protest : फ्रान्समध्ये महागाई अन् बजेट कपातीविरोधात उद्रेक; पॅरिसमध्ये 6 लाखांहून अधिक नागरिक रस्त्यावर

३. मतदार याद्या आणि न्यायालयीन पराभव

निवडणुकांपूर्वी ढिल्लन यांनी अनेक राज्यांमध्ये मतदार याद्यांमधून ‘गैर-अमेरिकन’ नागरिकांची नावे हटवण्यासाठी आक्रमक कायदेशीर मोहीम उघडली होती. मात्र, अमेरिकेतील विविध न्यायालयांनी हे खटले फेटाळून लावले. ढिल्लन यांच्या या पावसामुळे वैध मतदारांच्या अधिकारांवर गदा येईल आणि त्यांच्या गोपनीयतेचा गैरवापर होईल, अशी टिप्पणी न्यायाधीशांनी केली होती. याशिवाय, विद्यापीठांमधील ज्यूद्वेष आणि श्वेतवर्णीय विद्यार्थ्यांविरोधातील भेदभावाच्या मुद्द्यांवरून त्यांनी घेतलेल्या कायदेशीर भूमिकेलाही न्यायालयात मोठे यश मिळू शकले नाही.

निवडणूक प्रकरणांमधून काढले बाजूला अन् अखेर राजीनामा

राजीनामा देण्याच्या काही आठवड्यांपूर्वीच न्याय विभागातील अंतर्गत घडामोडींमुळे ढिल्लन एकाकी पडल्याचे चित्र दिसू लागले होते. डेमोक्रॅटिक पक्षाने निवडणुकीत हेराफेरी केल्याच्या ट्रम्प यांच्या आरोपांशी संबंधित अनेक खटल्यांमधून ढिल्लन यांना हळूहळू बाजूला करण्यात आले होते. ज्या खटल्यांमध्ये ट्रम्प यांना वैयक्तिकरीत्या रस होता, त्या प्रकरणांमधील ढिल्लन यांची भूमिका नगण्य झाली होती. अखेर मध्यावधी निवडणुकीतील दारुण पराभवानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देणेच योग्य मानले. ढिल्लन यांच्या या एक्झिटमुळे येत्या काळात ट्रम्प प्रशासनात आणखी काही मोठे राजीनामे सत्र सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: हरमीत ढिल्लन कोण आहेत?

    Ans: हरमीत ढिल्लन या भारतीय वंशाच्या अमेरिकन वकील असून त्यांनी ट्रम्प प्रशासनात न्याय विभागाच्या नागरी हक्क विभागाच्या प्रमुख (Assistant Attorney General for Civil Rights) म्हणून काम केले आहे.

  • Que: हरमीत ढिल्लन यांनी आपल्या पदाचा राजीनामा का दिला?

    Ans: अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकांमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या पक्षाला बसलेल्या फटक्यानंतर आणि न्याय विभागातील वाढत्या राजकीय दबावामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

  • Que: हरमीत ढिल्लन यांच्या कार्यकाळातील सर्वात मोठा वाद कोणता होता?

    Ans: त्यांच्या कार्यकाळात नागरी हक्क विभागातील ७५% पेक्षा जास्त जुन्या कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिला होता आणि त्यांनी मतदार यादीशी संबंधित दाखल केलेले खटले न्यायालयाने फेटाळून लावले होते.

Web Title: Harmeet dhillon resigns us doj civil rights chief trump administration hp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2026 | 12:39 PM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • World news

संबंधित बातम्या

Los Angeles : ‘लज्जास्पद…’ लॉस एंजेलिसमधील पराभवांनंतर ट्रम्प संतापले; भारतीय वंशाच्या नित्या रमण यांचा ऐतिहासिक विजय
1

Los Angeles : ‘लज्जास्पद…’ लॉस एंजेलिसमधील पराभवांनंतर ट्रम्प संतापले; भारतीय वंशाच्या नित्या रमण यांचा ऐतिहासिक विजय

Israel Politics :  नेतान्याहूंचे वर्चस्व संपणार? इस्रायलमध्ये सत्तांतराचे वारे; गादी आयझेनकोट यांना 67 खासदारांचा मोठा पाठिंबा
2

Israel Politics : नेतान्याहूंचे वर्चस्व संपणार? इस्रायलमध्ये सत्तांतराचे वारे; गादी आयझेनकोट यांना 67 खासदारांचा मोठा पाठिंबा

France Protest : फ्रान्समध्ये महागाई अन् बजेट कपातीविरोधात उद्रेक; पॅरिसमध्ये 6 लाखांहून अधिक नागरिक रस्त्यावर
3

France Protest : फ्रान्समध्ये महागाई अन् बजेट कपातीविरोधात उद्रेक; पॅरिसमध्ये 6 लाखांहून अधिक नागरिक रस्त्यावर

POK Violence: नालायकपणाचा कळस! स्वतःच्या नागरिकांना मारत सुटली Pakistan Army; ‘इतके’ ठार तर…
4

POK Violence: नालायकपणाचा कळस! स्वतःच्या नागरिकांना मारत सुटली Pakistan Army; ‘इतके’ ठार तर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.