Trump order isarel to halt bombing in gaza as hamas approves his plan
Trump Gaza Peace Plan : अखेर दोन वर्षांपासून सुरु असलेले इस्रायल हमास युद्ध (Israel Hamas War) थांबवण्याचे चिन्ह दिसू लागले आहे. डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इस्रायलला गाझातील कारवाया थांबवण्याचे आदेश देत हमासने गाझा सोडण्यासाठी सहमती दिल्याचा दावा केला आहे. त्यांनी त्यांच्या ट्रुथ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर यासंदर्भात एक पोस्ट केली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला त्यांचा गाझा पट्टीतील युद्धं थांबवण्याची योजना मान्य करण्यासाठी रविवारपर्यंत ४८ तासांची मुदत दिली होती. पण यापूर्वी हमासने त्यांच्या अटी मान्य केल्याचे आणि गाझा सोडण्यास सहमती दर्शवली असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. तसेच हमास इस्रायली ओलिसांची देखील सुटका करणार असल्याचे त्यांनी सांगितले. ट्रम्प यांनी हमासला अल्टीमेटमसह त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील असाही इशारा दिला होता.
ट्रम्प यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील पोस्टमध्ये हमासच्या घोषणेनंतर म्हटले आहे की, हमासने नुकत्याच जारी केलेल्या विधानानुसार, ते गाझात कायमस्वरुपी शांततेसाठी तयार असल्याचे मला वाटते. त्यांनी पुढे म्हटले की, इस्रायलले गाझातील बॉम्ब हल्ले तातडीने थांबवले पाहिजेत जेणेकरुन ओलिसांना सुरक्षितपणे आणि लवकर बाहेर काढता येईल. सध्या आपण बोलल्या तपशीलांवर काम करणे गरजेचे आहे. हे फक्त गाझाबद्दल नसून मध्य पूर्वेतही शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांबद्दल असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले.
ट्रम्प यांच्या इस्रायलला गाझावरील हल्ले थांबवण्याच्या आवाहनानंततर, इस्रायलच्या सैन्याने त्यांनी गाझातील युद्ध संपवण्यासाठी पाऊल उचलले असल्याचे म्हटले इस्रायलने म्हटले की, त्यांचे सैन्य ट्रम्प यांच्या योजनेच्या पहिल्या टप्पा अंमलात आणण्याच्या तयारीत आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netnyahu) यांच्या कार्यालयाने शनिवारी (०४ ऑक्टोबर) यावर निवेदन जारी करत याची माहिती दिसी. तसेच गाझातील युद्ध संपवण्याच्या ट्रम्प यांच्या योजनेला पूर्ण पाठिंबा दर्शवला.
ट्रम्प यांनी हमाससमोर काय अटी ठेवल्या आहेत?
ट्रम्प यांना गाझामध्ये शांतात प्रस्थापित करण्यासाठी, हमासला त्यांची ठिकाणे आणि शस्त्रे सोडण्यास सांगितली आहेत. तसेच त्यांनी सर्व ओलिसांच्या सुटकेचीही मागणी केली आहे. गाझामध्ये सरकार स्थापन करताना हमासला हस्तक्षेप करण्याचा अधिकारही नसणार आहे. या अटीपूर्ण झाल्यानंतर गाझाचे पुनर्वसन सुरु होणार आहे.
प्रश्न १. हमासने कोणता निर्णय घेतला आहे?
हमासने ट्रम्प यांच्या गाझा योजनेला पाठिंबा देत आपली सत्ता सोडण्याचा आणि ओलिसांची सुटका करण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रश्न २. ट्रम्प यांनी हमासला काय अल्टीमेटम दिला होता?
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला सर्व ओलिसांना तातडीने सोडण्याचा आणि त्यांची शस्त्रे सोडण्याचा रविवार (०५ ऑक्टोबर) पर्यंत अल्टीमेटम दिला होता.
प्रश्न ३. हमासने गाझा योजनेला मंजुरी देताचा इस्रायलला ट्रम्प यांनी काय आवाहन केले?
हमासकडून गाझा योजनेला मंजुरी मिळताच ट्रम्प यांनी इस्रायलला गाझातील बॉम्ब हल्ला थांबवण्याचे आणि ओलिसांच्या सुटेकसाठी कार्य करण्याचे आवाहन केले.
प्रश्न ४. इस्रायलने ट्रम्प यांच्या आवाहानावर काय प्रतिक्रिया दिली?
इस्रायलने ट्रम्प यांच्या आवाहानावर प्रतिक्रिया देत, त्यांनी गाझातील हल्ले थांबवून त्यांच्या योजनेच्या पहिल्या टप्प्यावर कार्य सुरु केले असल्याचे म्हटले.
300 वर्षांनी सापडले ‘मृत्युचे जहाज’, सोन्याच्या शिक्क्याने भरलेला खजिना; Divers चे डोळेच दिपले