Trump Says US Plans Return To Afghanistan Because Of China
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प एकामागूएक मोठे निर्णय घेत आहेत. ट्रम्प यांनी टॅरिफच्या घोषणेनंतर पनामा कालव्यावरील अमेरिकेच्या नियंत्रणाबाबत मोठे विधान केले आहे. आता त्यांनी आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. ट्रम्प यांनी अमेरिका अफगाणिस्तानातील बग्राम एअरबेसवर आपले सैन्य पुन्हा तैनात करणार असल्याचे म्हटले आहे. ट्रम्प यांनी दावा केला आहे की, हे बग्राम लष्करी तळ सध्या चीनच्या ताब्यात असून अमेरिका या तळावर लहान लष्करी तुकडी तैनात करणार आहे. यामुळे चीनच्या वाढत्या प्रबावार नियत्रंण ठेवता येईल.
तालिबानची प्रतिक्रिया
दरम्यान चीनच्या बग्राम एअरबेसवरील ताब्याचा दावा तालिबनाने फेटाळून लावला आहे. ट्रम्प यांनी केलेल्या चीनच्या लष्करी तळावरील ताब्याच्या दाव्याला तालिबानने फेटाळले आहे. तालिबानचे प्रवक्ते जबिउल्लाह मुजाहिद यांनी हे दावे भावनिक आणि चुकीच्या माहितीवर आधारित असल्याचे म्हटले आहे. त्यांनी स्पष्ट केले आहे की, अफगाणिस्तानात एकही चिनी सैन्य उपस्थित नाही.
अमेरिकेसाठी बग्राम एअरबेस महत्त्वाचा का?
बग्राम एअरबेस अफगाणिस्तानातील परवान प्रांतात असून अमेरिकेसाठी धोरणात्मक दृष्टीतोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे. हे लष्करी तळ चीनच्या अणुतलांपासून एक तासाच्या अंतरावर आहे.यामुळे अमेरिका या एअरबेसवरुन चीनवर लक्ष ठेवू शकते. सोव्हिएत युनियने 1950 च्या दशकात हा लष्करी स्थळ बांदला होता. त्यानंतर 1997 मध्ये अफगाणिस्तानातील आक्रममादरम्यान रशियाने या तळाचा वापर केला. नंतर 2001 मध्ये पुन्हा हे तळ अमेरिकेच्या नियंत्रणात आले आणि सर्वात मोठ्या लष्करी तळांपैकी एक बनले.
एकेकाळी अफगाणिस्तानच्या ग्वांतानामो तुरुंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बग्राम एअरबेसचा वापर अमेरिकन गुप्तचर संस्था CIA ने अल-कायदाच्या दहशतवाद्यांची चौकशी करण्यासाठी केला होता. या एअरबेसची क्षमता 10 हजार सैनिक सामावून घेण्याची आहे. या एअरबेसवर स्विमिंग पूल, सिनेमा, स्पा आणि बर्गर किंग सारखे रेस्टॉरंट देखील आहेत. 2020 मध्ये अमेरिकेने तालिबानशी सैन्य माघारीची चर्चाकेली आणि नंतर डो बायडेन यांच्या प्रशासनात ती अमंलात आली. मात्र चीनच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमिवर पुन्हा एकदा अमेरिकेचे सैन्य बग्राम एअरबेसवर असणे महत्त्वाचे म्हटले.
चीनचा अफगाणिस्तानमधील वाढता प्रभाव
चीनचा अफगाणिस्तानमदील प्रभाव वाढत आहे. चीनच्या अनेक कंपन्यांनी 2023 मध्ये अनेक करार केले आहेत. मात्र, चीनच्या म्हणण्यानुसार त्यांचा एकही सैन्य अफगाणिस्तानात नाही.अफगाणिस्तानातील अब्जावधी डॉलर्स किमतीच्या लिथियम साठ्यांवर आणि तेल आणि खनिजांवर चीनची नजर आहे. चीनला अफगाणिस्तानने बीआरआयमध्ये सामील व्हावे असे वाटते.