Trump Tariff Bomb Trump imposed taxes of up to 40% on these 14 countries; Find out if India is included
New US Tariff 2025 : वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा आपल्या टॅरिफच्या निर्णयाने संपूर्ण जगाला झटका दिला आहे. ट्रम्प यांनी ८ जुलै रोजी १४ देशांवर नवीन व्यापार कर लादण्याची घोषणा केली आहे. म्यानमार आणि लाओसवर सर्वाधिक शुल्क लादण्यात आले आहेत. ०१ ऑगस्टपासून हे नवीन शुल्क लागू होणार आहे. ट्रम्प यांनी या निर्णयाशी संबंधिक सर्व अधिकृत पत्रे कर लागू होणाऱ्या देशांना पाठवण्यात आली असल्याचे म्हटले. परंतु त्यांच्या या निर्णयामुळे सध्या जगभरात टॅरिफची नवीन लाट उसळली आहे.
ट्रम्प यांनी एकूण १४ देशांवर नवीन व्यापार टॅरिफ लागू केले आहे. त्यांना या सर्व देशांना एक कडक इशारा दिला आहे. या १४ देशांना पाठवलेल्या पत्रात ट्रम्प यांनी म्हटले आहे की, जर या देशांनी अमेरिकेवर कर वाढवला तर अमेरिका देखील तेवढाच कर वाढेवल किंवा त्याहून अधिक करही लागू करेल. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की, जर कोणत्याही देशाने कोणत्याही कारणास्तवर अमेरिकवर टॅरिफ वाढवले, तर अमेरिका देखील त्या देशावर तितकाच किंवा त्यापेक्षा अधिक टॅरिफ लागू करेल.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी १४ देशांवर ४० टक्क्यांपर्यंत टॅरिफ लादले आहे. यामध्ये मान्यमार आणि लाओ पीपल्स डेमोक्रॅटिक रिपब्लिक(लाओस)वर ४०% कर लादण्यात आला आहे. तर कंबोडिया, थायलंड वर ३६% तर बांग्लादेश आणि सर्बियावर ३५% टक्के कर लादण्यात आला आहे. तसेच इंडोनेशियावर ३२% शुल्क लागू करण्यात आले आहे, तर दक्षिण आफ्रिका, बोस्निया आणि हर्जेगोविनावर ३०% टक्के कर लागू करण्यात आले आहेत. तसेच जपान, कझाकस्तान, मलेशिया, दक्षिण कोरिया आणि ट्युनिशिया या देशांवर २५% कराची घोषणा ट्रम्प यांनी केली आहे.
गेल्या काही वर्षात चुकीच्या व्यापर धोरणांमुळे मोठ्या प्रमाणात व्यापर तूट अमेरिकेवर ओढावली होती. यामुळे ट्रम्प यांनी ही व्यापर तूट भरुन काढण्यासाठी नवीन नियम महत्त्वाचे असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या मते, पू्र्वीच्या धोरणांमध्ये टॅरिफ आणि नॉन-टॅरिफमध्ये अनेक अडथळे होते. यामुळे अमेरिकेला मोठ्या प्रमाणात व्यापर तूट सहन करावी लागली. याचा अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला. यामुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेसाठी आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका निर्माण झाला होता. यामुळे यामध्ये ट्रम्प यांनी सुधारणा केली असल्याचे म्हटले.
दरम्यान ट्रम्प यांनी या नवीन करातून भारताला सूट दिली आहे. तसेच ट्रम्प यांनी म्हटले आहे की, लवकरच भारत आणि अमेरिकेमध्ये एक मोठा व्यापार करार होईल. त्यांनी म्हटले की, “आम्ही भारतासोबतच्या व्यापर कराराच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. त्यांनी सांगतिले की, अमेरिकेने याआधी चीनसोबत व्यापार करार केला आहे. आता भारतासोबतही व्यापार करार करण्यात येईल. ट्रम्प यांची ही रणनीती जागतिक व्यापर संबंधांना आकार देण्याच्या आणि टॅरिफद्वारे अमेरिकेची सत्ता स्थापन करण्याचा भाग असल्याचे मानले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिका आणि भारतामधील अंतरिम व्यापर करारवर सध्या चर्चा सुरु आहे.