
फोटो सौजन्य सोशल मीडिया
ही बंदी घालताना ट्रम्प यांनी असे सांगितले कि बॅन केलेले चॅनेल्स हे ट्रम्प यांच्या विरोधात खोट्या आणि चुकीच्या बातम्या देतात . तसेच ट्रम्प यांची बदनामी करतात . त्यामुळे त्यांच्यावर बंदी घातली आहे . तर दुसऱ्या बाजूला बॅन केलेले चॅनेल्स यांनी आपली बाजू मांडताना म्हंटले आहे कि , अमेरिकेच्या संविधानातील पहिले मूल्य म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र आहे . आणि ट्रम्प यांनी यावरच गदा आणली असून .
या तिन्ही चॅनेल्स नी अमेरिकेच्या कोर्टात ट्रम्प विरोधात याचिका दाखल केल्या आहेत . याआधीही बाराक ओबामा राष्ट्राध्यक्ष असताना त्यांनी एका पत्रकाराला फक्त एका कार्यक्रमासाठी बंदी घातली होती तेव्हा मीडिया आणि जनतेच्या रेट्यामुळे ओबामा यांना बंदी मागे घ्यावी लागली होती .
त्यामुळे अमेरिकेत पत्रकारितेवर गदा आणणे हे पूर्णपणे शक्य नाही . याउलट भारतात एकाही पत्रकाराची किंवा मीडिया हाऊसची हिंमत आहे का राजकीय नेत्यांवर बंदी किंवा कोर्टात जाऊन केस लढण्याची अशा चर्चा विरोधी पक्षातील नेतेमंडळी आता करू लागली आहेत .
पत्रकारितेमधील मूल्यांना ,त्याच्या दर्जाला , त्याच्या खऱ्या आवाजाला किमान अमेरिकन नागरिकांसाठी का होईना पण अमेरिकन मीडिया ही लढत असते . स्वतंत्र पत्रकारितेसाठी अमेरिकन लोकं सरकारशी वेळ प्रसंगी दोन हात करतात . असे आपल्याला बऱ्याच प्रसंगातून दिसून आले आहे .
भारतातील , चीनमधील , पाकिस्तानमधील शोध पत्रकारिता जरी मुख्य प्रवाहात नसली तरी अमेरिकेत मात्र ती अजूनही मुख्य प्रवाहात आहे . पण अमेरिकेत वाढत्या इस्रायली लॉबीचे वर्चस्व पाहता अमेरिकेत भांडवशाही पासून ते मीडिया पर्यंत इस्रायल धार्जिणे लॉबी काम करत असल्याने .
त्यांच्या विचारधारेच्या सरकार साठी काम करण्याचा प्रयत्न हा होतच असतो . असे राजकीय जाणकार सांगतात . पण अजून तरी अमेरिकन मीडिया ही पूर्णपणे सरकारच्या गोठ्यात बांधली गेली नसल्याचे सुद्धा दिसून येते .
सतत प्रसिद्धी झोतात राहणे , आपल्या आवडीचे प्रश्न विचारणारे पत्रकार आवडणे , त्यांच्या मताशी सहमत होणारे लोक आवडणे ,असा ट्रम्प यांचा स्वभाव आहे . पण अमेरिकेतील सर्वच टीव्हीवरील प्रसारमाध्यमांनी ट्रम्प यांच्यावर पूर्णपणे बंदी घातल्याने तसेच ट्रम्प यांच्या आवडत्या फॉक्स या चॅनेल ने सुद्धा या बंदीत सहभागी झाल्याने आता टीव्ही वरील ट्रम्प यांचे दिसणे पूर्णपणे बंद झाले आहे .
पण पटकन हा वाद मिटवून परिस्थिती पूर्ववत आणल्यावर ट्रम्प यांचा इगो हर्ट होईल म्हणून ते बंदी रद्द करणार नाहीत . यामुळे ट्रम्प यांची गोची आणि घालमेल सुरु झाली आहे .
ट्रम्प यांच्यावरील बंदी फक्त सर्व टीव्हीवर दिसणाऱ्या प्रसार माध्यमांनी घातली आहे . त्यामुळे प्रिंट मीडिया , खाजगी यूट्यूबवरील चॅनेल्स , फोटो पत्रकार , रेडिओ इत्यादी लोकांनी त्यांना कव्हर करण्याचे सुरु ठेवले आहे . तसेच यासगळ्या वादाच्या पार्श्वभूमीवर व्हाईट हाऊस ने स्वतःचे युट्युब चॅनेल सुरु केले आहे . पण त्याची रिच आणि व्हीवरशिप अजून मोठी नसल्याने त्याकडे तूर्तास अमेरिकन जनतेचे दुर्लक्ष आहे .