Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 8 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur News : फलाटांवर नरकयातना घेऊन आली दिवाळी; नागपूरहून उत्तर भारताकडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी

Nagpur News : दिवाळीनिमित्त नागपूर रेल्वे स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी उसळली आहे. उत्तर भारताकडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये जनरल आणि स्लीपर डबे खचाखच भरले असून आरक्षित तिकीटधारकांनाही बर्थपर्यंत पोहोचण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. गर्दी नियंत्रण आणि सुरक्षेच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Nov 08, 2026 | 03:27 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • डब्यात शिरण्यासाठी झटापट; श्वास घेणेदेखील कठीण
  • गर्दी नियंत्रणासाठी सुरक्षारक्षकांचा पत्ताच नाही
  • आरक्षित तिकीट असूनही बर्थपर्यंत पोहोचण्याची कसरत
Nagpur News : दिवाळी सणानिमित्त गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढल्याने नागपूर रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी उसळली आहे. उत्तर भारताकडे जाणाऱ्या नियमित रेल्वेगाड्यांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करत असल्याचे चित्र आहे.

विशेष रेल्वेगाड्या सुरू केल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात प्रवाशांच्या गैरसोयी कमी झालेल्या नाहीत. फलाटांवरील गर्दी, डब्यात चढण्यासाठी होणारी धक्काबुक्की आणि सुरक्षारक्षकांची अपुरी उपस्थिती यामुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

डब्यात शिरण्यासाठी झटापट; श्वास घेणेदेखील कठीण

दिवाळीनिमित्त गोरखपूर, दिल्ली, लखनऊ आणि पाटणा या शहरांकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्यांमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी होत आहे. विशेषतः जनरल आणि स्लीपर डब्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. फलाटावर गाडी येताच डब्यात प्रवेश मिळवण्यासाठी प्रवाशांची एकच धावपळ सुरू होते.

हातातील सामान आणि मोठ्या बॅगा सांभाळत प्रवाशांना दरवाजातून आत जाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. डब्यांमध्ये आधीच क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी असल्याने उभे राहण्यासाठीही जागा मिळत नाही. विशेष गाड्यांच्या घोषणांनंतरही परिस्थितीत फारसा बदल झालेला नसल्याने रेल्वेच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Nagpur News : मुख्यमंत्र्यांची दिवाळी लोहारी सावंग्यात! शेतकऱ्यांसोबत साजरा करणार सण; संत्रा उत्पादकांसह ग्रामस्थांना प्रश्न मांडण

गर्दी नियंत्रणासाठी सुरक्षारक्षकांचा पत्ताच नाही

रेल्वे स्थानकावर प्रवाशांची एवढी मोठी गर्दी असताना सुरक्षेची जबाबदारी असलेल्या कर्मचाऱ्यांची उपस्थिती प्रभावीपणे जाणवत नसल्याचे चित्र आहे. उत्तर भारताकडे जाणाऱ्या गाड्यांजवळ गर्दी नियंत्रित करण्यासाठी पुरेसे सुरक्षारक्षक दिसत नसल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

गाडीत चढताना होणारी धक्काबुक्की आणि दरवाजाजवळील गर्दी पाहता अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी एखादी दुर्घटना घडल्यास जबाबदारी कोणाची, असा सवाल उपस्थित होत आहे. गर्दीच्या काळात फलाटांवर अतिरिक्त सुरक्षारक्षक तैनात करणे आणि प्रवाशांना शिस्तबद्ध पद्धतीने डब्यात प्रवेश देणे आवश्यक असताना त्याकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना प्रवाशांमध्ये आहे.

Nagpur News : ८० शेडवर चालला बुलडोझर मनपा-नासुप्रची संयुक्त मोहीम; कडेकोट पोलिस बंदोबस्तात दिवसभर कारवाई

आरक्षित तिकीट असूनही बर्थपर्यंत पोहोचण्याची कसरत

अनेक दिवस आधी आरक्षित तिकीट काढूनही प्रवाशांना आपल्या बर्थपर्यंत पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. स्लीपर डब्यांमध्ये अनारक्षित प्रवाशांची गर्दी झाल्याने आरक्षित प्रवाशांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. वातानुकूलित डब्यांमध्येही परिस्थिती फारशी वेगळी नाही. काही प्रवाशांना शौचालयाजवळील जागेत जमिनीवर बसून प्रवास करावा लागत आहे.

डब्यांमधील मार्गिका आणि शौचालयांकडे जाणारे रस्तेही प्रवाशांनी व्यापले आहेत. याचा सर्वाधिक त्रास महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना होत आहे. गर्दीमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा आणि वैयक्तिक गोपनीयतेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. घर गाठण्याच्या आनंदाने निघालेल्या प्रवाशांचा प्रवास मात्र गैरसोयी, अस्वस्थता आणि धक्काबुक्कीमुळे त्रासदायक ठरत आहे.

Web Title: Nagpur railway station diwali rush passenger crowding special trains failure cp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2026 | 03:27 PM

Topics:  

  • Marathi News
  • Nagpur News
  • Railway News

संबंधित बातम्या

Diwali Saree Looks 2026: दिवाळीच्या सणात मराठमोळ्या सौंदर्याची खास झळाळी! पारंपरिक साड्यांमधील ‘या’ ७ अभिनेत्रींचे लूक्स ठरले खास
1

Diwali Saree Looks 2026: दिवाळीच्या सणात मराठमोळ्या सौंदर्याची खास झळाळी! पारंपरिक साड्यांमधील ‘या’ ७ अभिनेत्रींचे लूक्स ठरले खास

Chandrapur News: कन्हाळगाव अभयारण्याच्या प्रस्तावाला ४७ गावांचा विरोध; मुनगंटीवार म्हणाले, ‘इच्छेविरुद्ध निर्णय लादू देणार नाही’
2

Chandrapur News: कन्हाळगाव अभयारण्याच्या प्रस्तावाला ४७ गावांचा विरोध; मुनगंटीवार म्हणाले, ‘इच्छेविरुद्ध निर्णय लादू देणार नाही’

Raigad News: अपघातग्रस्त टँकरमधून वायूगळतीची भीती; संभाव्य धोका टाळण्यासाठी पोलिसांनी घेतली तज्ज्ञांची मदत
3

Raigad News: अपघातग्रस्त टँकरमधून वायूगळतीची भीती; संभाव्य धोका टाळण्यासाठी पोलिसांनी घेतली तज्ज्ञांची मदत

Divyanka Tripathi: T1-T2 चा सस्पेन्स अखेर संपला! दिव्यांका त्रिपाठी-विवेक दहियाने जाहीर केली जुळ्यांची नावं
4

Divyanka Tripathi: T1-T2 चा सस्पेन्स अखेर संपला! दिव्यांका त्रिपाठी-विवेक दहियाने जाहीर केली जुळ्यांची नावं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.