Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tupac Murder Trial : 30 वर्षांनी टुपॅक हत्या प्रकरणाचा खटला सुरू!

Tupac Murder Trial : प्रसिद्ध अमेरिकन रॅपर टुपॅक शकूर यांच्या १९९६ मधील हत्येच्या प्रकरणाला तब्बल ३० वर्षांनंतर न्यायालयीन वळण मिळाले आहे. लास वेगासमध्ये डुआन ‘केफी डी’ डेव्हिस याच्याविरोधातील खटल्याला सुरुवात झाली असून, न्यायालयात सरकारी पक्षाने प्रारंभिक निवेदनातून हत्येचा कट आणि आरोपीची कथित भूमिका मांडली.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Aug 17, 2026 | 09:03 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • ३० वर्षांनंतर पोहोचले न्यायालयात पोहोचले प्रकरण
  • सरकारी पक्षाचा दावा हल्ल्याचा कट डेव्हिस ने रचला
  • डेव्हिसच्या पुस्तकातील दावे ठरू शकतात पुरावे
Tupac Murder Trial : हिप-हॉप जगतातील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या हत्येच्या प्रकरणाला अखेर न्यायालयीन सुरुवात झाली आहे. प्रसिद्ध रॅपर टुपॅक शकूर यांची सप्टेंबर १९९६ मध्ये लास वेगासमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर जवळपास तीन दशके हे प्रकरण अनुत्तरित राहिले. आता ६३ वर्षीय डुआन ‘केफी डी’ डेव्हिस याच्यावर या हत्येचा आरोप ठेवण्यात आला असून लास वेगासमधील न्यायालयात त्याच्या खटल्याची सुनावणी सुरू झाली आहे.

टुपॅक यांच्यावर कारमधून गोळीबार करण्यात आला होता. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आणि काही दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर अमेरिकेतील संगीतविश्वासह जगभरात मोठी खळबळ उडाली होती.

हल्ल्याचा कट रचल्याचा सरकारी पक्षाचा दावा

सरकारी पक्षाच्या म्हणण्यानुसार, टुपॅक आणि डेव्हिसचा पुतण्या ऑरलँडो अँडरसन यांच्यात हत्येच्या काही तास आधी वाद झाला होता. लास वेगासमधील एका कॅसिनो परिसरात झालेल्या मारामारीनंतर बदला घेण्यासाठी टुपॅकवर हल्ला करण्याची योजना आखण्यात आली, असा दावा सरकारी पक्षाने केला आहे.

Israel-UAE : बेन-ग्विर यांच्या वक्तव्याने UAE नाराज; इस्रायलसोबतच्या संबंधांवर प्रश्नचिन्ह!

विशेष म्हणजे डेव्हिसने स्वतः टुपॅकवर गोळी झाडल्याचा आरोप नाही. मात्र हल्ल्याचे नियोजन करण्यात आणि कथितरित्या वापरलेले शस्त्र उपलब्ध करून देण्यात त्याची भूमिका होती, असा आरोप आहे. नेवाडाच्या कायद्यानुसार एखाद्या गंभीर गुन्ह्याच्या नियोजनात किंवा अंमलबजावणीत सहभागी असलेल्या व्यक्तीवरही हत्या प्रकरणात कारवाई होऊ शकते.

डेव्हिसने न्यायालयात स्वतःला निर्दोष असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे सरकारी पक्षाला त्याची कथित भूमिका ठोस पुराव्यांद्वारे सिद्ध करावी लागणार आहे.

पुस्तक आणि जुन्या वक्तव्यांवर न्यायालयाचे लक्ष

या खटल्यातील सर्वात महत्त्वाच्या मुद्द्यांपैकी एक म्हणजे डेव्हिसने स्वतः भूतकाळात केलेली वक्तव्ये. त्याच्या मुलाखती आणि ‘Compton Street Legend’ या आत्मचरित्रात्मक पुस्तकातील दाव्यांचा तपासात महत्त्वाचा उपयोग झाला आहे.

सरकारी पक्ष या वक्तव्यांमधून डेव्हिसचा हत्येतील सहभाग सिद्ध करण्याचा प्रयत्न करणार आहे. मात्र बचाव पक्षाचा दावा आहे की पुस्तकातील काही माहिती अतिशयोक्त किंवा काल्पनिक स्वरूपाची असू शकते. त्यामुळे डेव्हिसची जुनी वक्तव्ये न्यायालयात कितपत विश्वासार्ह ठरतात, हे महत्त्वाचे ठरणार आहे.

Hormuz Crisis : ओमानला ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतच्या करारावर अडथळा आणल्यास बॉम्बिंग करू

या खटल्यात मोठ्या संख्येने साक्षीदारांची साक्ष नोंदवली जाण्याची शक्यता आहे. सुनावणी अनेक आठवडे सुरू राहू शकते. टुपॅकसोबत त्या रात्री कारमध्ये असलेले सुज नाइट यांचे नावही या प्रकरणात महत्त्वाचे ठरले आहे.

टुपॅक शकूर हे केवळ २५ वर्षांचे असताना जगाचा निरोप घेऊन गेले. त्यांच्या हत्येभोवती गेल्या तीन दशकांत अनेक तर्क-वितर्क झाले. आता डेव्हिसवरील खटल्यातून या हत्येच्या प्रकरणातील सत्य समोर येते का, याकडे संगीतविश्व आणि टुपॅकचे चाहते लक्ष ठेवून आहेत.

Web Title: Tupac murder trial tupac murder case trial begins after 30 years

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2026 | 09:03 PM

Topics:  

  • Brutal murder
  • Las Vegas
  • Rap Song

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.