फोटो सौजन्य AI
जवळजवळ गाझा मधील शहरं उध्वस्थ केली असताना ,तेथील अत्यावश्यक सुविधा ही नामशेष होण्याच्या मार्गावर असताना , जागतिक मिळणारी रसद ही इस्रायलच्या नियंत्रणात असताना . भूकमारीने रोज लोकं मरत असताना आणखीच नवीन मुद्द्याची यात भर पडली आहे .
Hormuz Crisis : ओमानला ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतच्या करारावर अडथळा आणल्यास बॉम्बिंग करू
इस्रायलचे राष्ट्रीय सुरक्षा मंत्री इटामर बेन क्वीर यांनी अलीकडेच एका पॉडकास्ट मध्ये दररोज रात्री ३० ते ४० पॅलेस्टानी नागरिकांना शोधून मारण्याची भूमिका मांडली होती . तसेच त्यांनी गाझा मध्ये इस्रायली नागरिकांनी वसाहती निर्माण करण्याची गरज असल्याचे देखील विधान केले .
तसेच गाझामधील पॅलेस्टानी नागरिकांनी आता मोठ्या प्रमाणात स्थलांतरित झाले पाहिजे अशीही मागणी केली . या मागण्यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे . आणि यूएई मधील लोकांनी सुद्धा या मागणीचा विरोध आणि निषेध केला आहे .
इस्रायलला स्थापना झाल्यानंतर जगभरात मान्यता मिळाली नाही . जगातले अजूनही बरेचसे देश हे इस्रायलला एक देश म्हणून मनात नाहीत , याला कारण असे आहे कि इस्रायल हा पॅलेस्टिन लोकांच्या जमिनीवर वसवला गेलेला देश आहे म्हणून ,त्यामध्ये आखातातील देश सुद्धा आहे . फक्त यूएई ने २००२ मध्ये अब्राहाम एकॉर्ड्स च्या करारानुसार इस्रायल सोबत फक्त राजनैतिक संबंध मान्य केले आहेत .
त्यानंतर दोन्ही देशांमध्ये व्यापार , सुरक्षा , पर्यटन , तंत्रज्ञान या क्षेत्रामध्ये मोठे संबंध निर्माण झाले . मात्र गाझा युद्धामुळे यूएई मध्ये इस्रायल विरुद्ध नाराजी वाढायला लागली आहे . असे अलीकडच्या विश्लेषणामध्ये दिसते .
यूएई ने अजूनतरी इस्रायल सोबतचे अब्राहाम एकॉर्ड्स तोंडल्याची घोषणा केलेली नाही . पण इस्रायल चे वागणे पॅलेस्टिन लोकांसोबत असेच राहिल्यास परिणामी यूएई मध्ये इस्रायल बद्दल तीव्र नाराजी वाढत जाईल , याचा उद्रेक हा जनतेमधून झाल्यास यूएई च्या राज्यकर्त्यांना सुद्धा विचार करावा लागेल असे राजकीय विश्लेषक सांगतात . पण उलट बाजूला अब्राहाम एकॉर्ड्स चे महत्व आता किती इस्रायलला राहिले आहे . हा सुद्धा प्रश्न यामुळे उपस्थित होत असल्याचे देखील बोलले जात आहे .