Erdogan Urges Meloni to Quit Smoking in Lighthearted Gaza Summit Exchange
Georgia Meloni Smoking : इजिप्त : इस्त्रालय विरुद्ध हमासमधील विध्यंवस युद्ध थांबवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर जोरदार प्रयत्न सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर गाझा युद्धबंदी करार करण्यात आला आहे. सोमवार, १३ ऑक्टोबर २०२५ रोजी इजिप्तमधील अल-शेख रिसॉर्ट येथे गाझा युद्ध संपवण्यासाठी आंतरराष्ट्रीय शांतता परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेची संपूर्ण विश्वामद्ये जोरदार चर्चा झाली. मात्र ईटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी या जोरदार चर्चेत आल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय शांतता परिषद आयोजित करण्यात आली होती. यामध्ये तुर्कीचे अध्यक्ष एर्दोगान, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जियो मेलोनी, कतारचे अमीर, जर्मन चान्सलर आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी या परिषदेला हजेरी लावली होती. परिषदेत तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगान यांनी मेलोनीच्या धूम्रपानाच्या सवयीवर विनोदी भाष्य केले. याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यामुळे जॉर्जिया मेलोनी या स्मोकिंग करत असल्याचे देखील सर्वांसमोर आले आहे. यामुळे सार्वजनिक ठिकाणी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मेलोनी यांच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर घाला घालण्यात आल्याचे बोलले जात आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
शांतता परिषदेदरम्यान तुर्कीचे एर्दोगान हे हसण्याच्या मूडमध्ये दिसून आले. यामध्ये त्यांनी अनेक नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा केली आणि त्यांच्या विनोदाने हलकेफुलके वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. एर्दोगान अनेक नेत्यांसोबत विनोद करताना दिसले. मात्र त्यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याबाबत केलेल्या विनोदावरुन जोरदार चर्चा रंगली आहे.
🇹🇷🇮🇹 ERDOGAN TO MELONI: I HAVE TO MAKE YOU STOP SMOKING Erdogan: “I saw you coming down from the plane. You look great. But I have to make you stop smoking.” Meloni: “I know, I know. I don’t want to kill somebody” Source: @ihacomtr https://t.co/FX7G3CR5g1 pic.twitter.com/glcfOZAA6Z — Mario Nawfal (@MarioNawfal) October 13, 2025
शांतता परिषदेदरम्यान, तुर्कीच्या पंतप्रधान एर्दोगानने जॉर्जिया मेलोनीला गंमतीने सांगितले की, “तू खूप छान दिसतेस, पण तुला धूम्रपान (स्मोकिंग) सोडायला लावावे लागेल.” दोन्ही नेत्यांमधील संभाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याचबरोबर व्हिडिओमध्ये फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे देखील जवळच उभे असलेले दिसले. एर्दोगानच्या विधानावर मोठ्याने हसत ते म्हणाले की, ते अशक्य आहे. मेलोनी हसून उत्तर देतात, “मला माहित आहे, पण जर मी धूम्रपान सोडले तर मी कदाचित कमी सामाजिक होईन. मला कोणालाही मारायचे नाही.” अशा मिश्किल संवादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल आहे. यावर जोरदार चर्चा देखील सुरु आहे.
आंतरराष्ट्रीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मीडिया रिपोर्ट्सनुसार, एर्दोगान यांनी पुढे असेही म्हटले की त्यांचा देश, तुर्की, धूम्रपानमुक्त भविष्यासाठी काम करत आहे. म्हणूनच ते जिथे जातात तिथे लोकांना धूम्रपान सोडण्यास प्रोत्साहित करतात. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू परिषदेला अनुपस्थित होते. त्यांच्या कार्यालयाने आधीच स्पष्ट केले होते की नेतान्याहू उपस्थित राहणार नाहीत. गाझा युद्धबंदीची ही परिषद जोरदार चर्चेत आली आहे.