Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुर्कीच्या मानवरहीत ‘Bayraktar KIZILELMA’ फायटर जेटने केली अविश्वसनीय कामगिरी; ‘हा’ VIRAL VIDEO पाहून समजेल नक्की काय घडलं?

Bayraktar Unmanned Fighter Jet : तुर्कीच्या मानवरहित लढाऊ विमान, किझिलेल्माने जगात पहिल्यांदाच हवेतून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राचा वापर करून विमान पाडले आहे, ज्यामुळे जगभरातील ड्रोन बाजारात खळबळ उडाली आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Dec 01, 2025 | 10:51 AM
Turkey made history when its unmanned fighter jet the Kizililma shot down a plane in mid-air using a missile

Turkey made history when its unmanned fighter jet the Kizililma shot down a plane in mid-air using a missile

Follow Us
Close
Follow Us:
  1. तुर्कीच्या किझिलेल्मा मानवरहित लढाऊ विमानाने हवेतून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राचा वापर करून पहिल्यांदाच लक्ष्य पाडत इतिहास रचला आहे.
  2. रडार मार्गदर्शित ‘गोकडोगन’ क्षेपणास्त्र व स्वदेशी AESA रडारच्या साहाय्याने ही चाचणी सिनोप किनाऱ्यावर यशस्वी ठरली.
  3. या यशामुळे जागतिक ड्रोन बाजारात तुर्कीची मक्तेदारी मजबूत होत असून दक्षिण आशियातील सामरिक समीकरणांवरही परिणाम होऊ शकतो.
Bayraktar Unmanned Fighter Jet : तुर्कीच्या (Turkey) संरक्षण क्षेत्राने पुन्हा एकदा जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. ‘बायकर’ (Baykar) या अग्रगण्य तुर्की ड्रोन उत्पादक कंपनीने विकसित केलेल्या किझिलेल्मा या मानवरहित लढाऊ विमानाने (Unmanned Fighter Jet / UCAV) चाचणीदरम्यान हवेत उडणाऱ्या लक्ष्यावर हवेतूनच क्षेपणास्त्राचा अचूक मारा केला. जागतिक विमानवाहतूक आणि मानवरहित युद्धाच्या इतिहासात हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. याआधी अशी कामगिरी प्रामुख्याने मानवी वैमानिक असलेल्या लढाऊ विमानांनीच केली होती; परंतु आता मानवरहित प्रणालीने ही क्षमता दाखवून दिल्याने युद्धतंत्रज्ञानातील समीकरणेच बदलण्याची शक्यता आहे.

तुर्कीच्या सिनोप किनाऱ्याजवळ पार पडलेल्या या चाचणीत किझिलेल्माने आपल्या स्वदेशी AESA (Active Electronically Scanned Array) रडार आणि ‘मुराद’ फायर-कंट्रोल रडारच्या साहाय्याने लक्ष्य ओळखले. त्यानंतर ‘गोकडोगन’ या दृश्यमान पल्ल्याच्या (Beyond Visual Range) एअर-टू-एअर क्षेपणास्त्राचा वापर करून हवेत असलेले लक्ष्य नष्ट करण्यात आले. सीएनएनसह आंतरराष्ट्रीय माध्यमांनुसार, क्षेपणास्त्राने थेट लक्ष्यावर आदळत ते पूर्णपणे निष्क्रिय केले. तुर्की सरकार आणि बायकर कंपनीकडून या यशस्वी चाचणीचा अधिकृत व्हिडिओही प्रसिद्ध करण्यात आला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘नाते तुटणार नाही’, पण प्रश्न राहतोच…’ Sheikh Hasina यांच्या प्रत्यार्पणाबाबत Bangladeshची कठोर भूमिका; पण भारत सरकार मौन

विश्लेषकांच्या मते, पारंपरिक लढाऊ विमानांच्या तुलनेत किझिलेल्मा हा ड्रोन खूप कमी रडार सिग्नल निर्माण करतो, त्यामुळे शत्रूच्या रडारपासून लपून राहण्याची त्याची क्षमता अधिक आहे. लाँग-रेंज सेन्सर्समुळे तो दूरवरूनच शत्रूची विमाने, ड्रोन किंवा लक्ष्य ओळखू शकतो. यामुळे हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर अशा दोन्ही प्रकारचे हल्ले करण्याची क्षमता या मानवरहित लढाऊ विमानाला प्राप्त झाली आहे. भविष्यात मानवी वैमानिकांचा धोका टाळून स्वयंचलित युद्धाभ्यास करण्यासाठी ही प्रणाली महत्वाची ठरू शकते.

किझिलेल्मा हा प्रकल्प तुर्कीच्या ‘बायकर’ कंपनीने विकसित केला असून या कंपनीचे सीईओ हे तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगान यांचे जावई आहेत, ही बाबही आंतरराष्ट्रीय चर्चेचा विषय ठरली आहे. गेल्या काही वर्षांत बायकरने आपल्या TB-2 आणि अकिन्सी (Akinci) ड्रोनद्वारे युक्रेन, अझरबैजान आणि इतर संघर्षग्रस्त भागांमध्ये प्रभावी कामगिरी दाखवली आहे. केवळ २०२३ आणि २०२४ या काळात ड्रोन विक्रीतून कंपनीला अंदाजे अब्जावधी डॉलर्सचे उत्पन्न मिळाल्याचे सांगितले जाते, ज्यापैकी सुमारे ९० टक्के उत्पन्न निर्यातीमधून येते. सलग चार वर्षे ही कंपनी तुर्कीतील सर्वोच्च संरक्षण व एरोस्पेस उद्योगांपैकी एक ठरली आहे.

BREAKING — First in aviation history: Turkey’s unmanned fighter jet Kizilelma successfully hit another aircraft by using an air-to-air missile in the coast of Sinop The jet successfully destroyed a jet-engine–powered aerial target using a BVR (Beyond Visual Range) air-to-air… pic.twitter.com/h7E8od4DsD — Ragıp Soylu (@ragipsoylu) November 30, 2025

credit : social media and Twitter

या यशाचा भू-राजकीय परिणामही चर्चेत आहे. तुर्कीने पाकिस्तानला मोठ्या प्रमाणात ड्रोन पुरवले असून भविष्यात किझिलेल्माही तेथे तैनात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे दक्षिण आशियातील सामरिक समतोलावर परिणाम होऊ शकतो, असे काही तज्ज्ञांचे मत आहे. टीबी-२ आणि अकिन्सी यांसारख्या ड्रोनने आधीच विविध युद्धक्षेत्रांत प्रभाव दाखवला आहे. त्यामुळे तुर्कीच्या या नव्या तंत्रज्ञानाकडे भारतासह अनेक देश बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Elon Muskलाही भारतीय वंशाचा सार्थ अभिमान; जाणून घ्या का मुलाचे नाव ठेवले शेखर आणि बायकोला संबोधले Half-Indian?

चाचणीच्या दिवशी मर्झिफॉन एअर बेसवरून एफ-१६ लढाऊ विमानांनीही उड्डाण केले होते, ज्यामुळे हा संपूर्ण प्रयोग उच्च सुरक्षा आणि समन्वयाखाली पार पडल्याचे स्पष्ट होते. किझिलेल्मा हे एकाच टर्बोफॅन इंजिनवर चालणारे मानवरहित विमान असून त्याचे कमाल टेकऑफ वजन सुमारे ६,००० किलो आहे आणि ते जवळपास १,५०० किलो शस्त्रसाठा वाहून नेऊ शकते. हे विमान भविष्यात तुर्कीच्या TCG अनाडोलू युद्धनौकेवरूनही तैनात केले जाऊ शकते, अशी माहिती समोर आली आहे. एकूणच, किझिलेल्माच्या यशस्वी हवाई क्षेपणास्त्र चाचणीने मानवरहित युद्धतंत्रज्ञानाच्या नव्या पर्वाची सुरुवात केली असून जागतिक संरक्षण क्षेत्रात तुर्कीला एक महत्त्वाचा आणि प्रभावी खेळाडू म्हणून अधिक मजबूत स्थान मिळाले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: किझिलेल्मा ड्रोन इतका खास का आहे?

    Ans: कारण त्याने मानवरहित असूनही हवेतून हवेत क्षेपणास्त्र हल्ला करून लक्ष्य पाडण्याची क्षमता प्रथमच यशस्वीपणे दाखवली आहे.

  • Que: या तंत्रज्ञानाचा जागतिक परिणाम काय?

    Ans: यामुळे भविष्यातील युद्धांमध्ये मानवी वैमानिकांऐवजी मानवरहित प्रणालींचा वापर वाढण्याची शक्यता आहे आणि ड्रोन युद्धाचे महत्त्व अनेक पटींनी वाढेल.

  • Que: भारतासाठी ही बाब महत्वाची का आहे?

    Ans: कारण तुर्कीचे ड्रोन पाकिस्तानसारख्या देशांपरर्यंत पोहोचत असल्याने दक्षिण आशियातील सुरक्षा समीकरणांवर त्याचा अप्रत्यक्ष परिणाम होऊ शकतो.

Web Title: Turkey made history when its unmanned fighter jet the kizililma shot down a plane in mid air using a missile

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 01, 2025 | 10:49 AM

Topics:  

  • international news
  • Turkey

संबंधित बातम्या

UN Revelation : संविधान बदलले अन् वाद पेटला! पाकिस्तान पुन्हा जागतिक चर्चेत; संयुक्त राष्ट्रांनी व्यक्त केली तीव्र चिंता
1

UN Revelation : संविधान बदलले अन् वाद पेटला! पाकिस्तान पुन्हा जागतिक चर्चेत; संयुक्त राष्ट्रांनी व्यक्त केली तीव्र चिंता

Indus Valley : ‘5000 वर्षांपूर्वी सिंधू संस्कृती अचानक संपली…’; IITटीच्या शास्त्रज्ञांनी शोधून काढले ऱ्हासामागचे खरे कारण
2

Indus Valley : ‘5000 वर्षांपूर्वी सिंधू संस्कृती अचानक संपली…’; IITटीच्या शास्त्रज्ञांनी शोधून काढले ऱ्हासामागचे खरे कारण

Plane Crash : आकाशात मृत्यूचा थरार! दोन विमानांची समोरासमोर भीषण टक्कर; झुडुपांमध्ये आढळला पायलटचा मृतदेह
3

Plane Crash : आकाशात मृत्यूचा थरार! दोन विमानांची समोरासमोर भीषण टक्कर; झुडुपांमध्ये आढळला पायलटचा मृतदेह

Stockton : कॅलिफोर्नियामध्ये मुलांच्या वाढदिवसाच्या पार्टीत अंदाधुंद गोळीबार; 4 जणांचा मृत्यू, 19 जखमी, धक्कादायक VIDEO VIRAL
4

Stockton : कॅलिफोर्नियामध्ये मुलांच्या वाढदिवसाच्या पार्टीत अंदाधुंद गोळीबार; 4 जणांचा मृत्यू, 19 जखमी, धक्कादायक VIDEO VIRAL

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.