जगभरात अजब गजब गोष्टी घडत असतात. कधी कुणी संशोधन करण्यासाठी जंगलात मात्र, रस्ता भटकल्याने त्यांना कित्येक दिवस त्यांना जंगलात अडकून पडून राहाव लागल्याच्या घटना यापुर्वीही घडल्या आहेत. आता तुर्कस्थानमधून एक अशीच घटना समोर आली आहे. गुहेच्या 3000 फूट खोलीत 40 वर्षांचा एक व्यक्ती अडकला (Man Stuck In Caves) आहे. तो एका खास उद्देशाने आत गेला होता मात्र तो आत गेल्यावर आजारी पडला होता. ज्यामुळे तो काही करू शकत नाही आहे. त्याला वाचवण्यासाठी तब्बल 170 जणांची टिम बचावकार्यात (rescue operation ) सहभागी झाली आहे. मार्क डिकी असे या व्यक्तीचे नाव आहे. नेमका काय प्रकार आहे जाणून घ्या.
[read_also content=”https://www.navarashtra.com/crime/bangladeshi-passenger-masturbate-in-plane-mumbai-police-arrested-455039.html https://www.navarashtra.com/crime/bangladeshi-passenger-masturbate-in-plane-mumbai-police-arrested-455039.html”]
मार्क डिकी टॉरस हिल्समधील मोराका गुहेत अडकला आहे.
मार्क डिकी हा अमेरिकन संशोधक आहे. सध्या तुर्कस्तानमधील डिकी टॉरस हिल्समधील मोराका गुहेत अडकला आहे. त्याच्यासोबत आणखी तीन अमेरिकन आहेत. संशोधनाच्या हेतून मार्क आणि त्याचे साथीदार गुहेत गेले मात्र, आत गेल्यावर त्याची तब्येत बिघडली. त्याला येथे गॅस्ट्रोइंटेस्टाइनल रक्तस्त्राव होत आहे. हंगेरियन डॉक्टरांना आत पाठवले. ते मार्कवर उपचार करत आहे. मार्कला बाहेर काढण्यासाठी बचावकार्य तीव्र करण्यात आले आहे. या कामात युरोपियन जवानही या बचाव कार्यात गुंतले आहेत. गुहा अतिशय अरुंद असून त्यात स्ट्रेचर नेता येत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या कामात दोन ते तीन आठवडे लागतील, असे युरोपियन असोसिएशन ऑफ केव्ह रेस्क्यूर्सचे म्हणणे आहे.
मार्कने गुहेच्या आतून व्हिडिओ बनवून तुर्की सरकार आणि इतरांचे आभार मानले असले तरी. तो म्हणतो की त्याला आवश्यक औषधे मिळाली आहेत, ज्यामुळे त्याचा जीव वाचला. पुढे, डॉक्टर सांगतील की मार्कला स्ट्रेचरने आणता येईल की तो स्वतः येऊ शकतो. आजारी पडल्यानंतर त्याने बरेच दिवस अन्न खाल्ले आहे. गुहेच्या आत 4 ते 6 अंश सेल्सिअस तापमान असते. त्यांची यशस्वीरित्या सुटका करणे आव्हानात्मक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यांना बाहेर काढण्याचा मार्ग मोकळा केला जात आहे. याशिवाय दगड पडण्याचं कामही सुरू आहे.