Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

फिलिपाइन्समध्ये टायफून ट्रामीचा कहर; 26 लोकांचा मृत्यू, दीड लाखांहून अधिक लोकांना फटका

फिलिपाइन्समध्ये टायफून ट्रामीने मोठा हाहाकार माजवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिलीपाइन्समध्ये या वादळामुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला असून अनेकांना याचा मोठा फटका बसला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Oct 24, 2024 | 04:16 PM
फिलिपाइन्समध्ये टायफून ट्रामीचा कहर; 26 ठार, दीड लाखांहून अधिक लोकांना फटका

फिलिपाइन्समध्ये टायफून ट्रामीचा कहर; 26 ठार, दीड लाखांहून अधिक लोकांना फटका

Follow Us
Close
Follow Us:

मनीला: फिलिपाइन्समध्ये टायफून ट्रामीने मोठा हाहाकार माजवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिलीपाइन्समध्ये या वादळामुळे किमान 26 लोकांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय 150,000 हून अधिक लोकांना याचा फटका बसला आहे. फिलीपाइन्सच्या अनेक नागरिकांना आपली घरे सोडावी लागली आहेत. ट्रामी टायफून फिलिपाइन्सच्या ईशान्येकडील प्रांतांमध्ये ताशी 95 किलोमीटर वेगाने वारे वाहून पूर आणि भूस्खलनाला कारणीभूत ठरले आहे. मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.

बचाव कार्य सुरू आहे 

तसेच अनेक गाड्या रस्त्यावरून वाहून गेल्या आहेत. बिकोल प्रदेशाला या टायफूनचा सर्वाधिक फटका बसला आहे. याशिवाय इफुगाओ डोंगराळ भागातही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पूर आणि भूस्खलनामुळे घरांच्या छतांवर अडकलेले लोक बाहेर काढण्यासाठी प्रमाणात बचावकार्य सुरू आहे. मोटरबोटींच्या साहाय्याने लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले जात आहे. अनेकांचा पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. तर काही ठिकाणी लोकांना त्यांच्या घरांमध्ये अडकले आहे.

हे देखील वाचा- भारतासोबतचा वाद कॅनडाच्या पंतप्रधानांना पडला महागात; त्यांच्याच पक्षातील खासदारांनी केली राजीनाम्याची मागणी

Tropical Storm Trami makes landfall, floods northern Philippine provinces https://t.co/IdeADdx6N0 pic.twitter.com/EswehFYRli

— Reuters (@Reuters) October 24, 2024

बचाव कार्यात अडचणी

प्रादेशिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या बचाव कार्यात अनेक अडचणी येत आहेत. कारण हवामान अत्यंत खराब आहे. फिलिपाइन्सच्या बचाव कार्यात मदत करण्यासाठी सुमारे 1,500 पोलिस आणि आपत्कालीन कर्मचारी काम करत आहेत. प्रादेशिक पोलिस प्रमुख ब्रिगेडियर आंद्रे डिझोन यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, बचाव कार्यासाठी अतिरिक्त मोटरबोट्सची आवश्यकता आहे, परिस्थिती अत्यंत बिकट आहे. बचाव पथकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच अन्न आणि इतर आवश्यक वस्तूंचीही तातडीने गरज भासत आहे.

याआधीही टायफूनमुळे मोठे नुकसान झाले होते

याआधीही फिलिपाइन्समध्ये टायफूनमुळे मोठे नुकसान झाले आहे. दरवर्षी उन्हाळ्यात सुमारे 20 चक्रीवादळे देशाच्या किनाऱ्यांना धडकतात. 2013 मध्ये हैयान या चक्रीवादळामुळे 7,300 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता, आणि अनेक गावे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती. ट्रामी हे वादळ त्या स्मरणात अजून एक मोठे संकट म्हणून नोंदले गेले आहे. सरकारने शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश दिले असून, लोकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन केले आहे.

हे देखील वाचा- BRICS परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदींनी घेतली UAE, इजिप्त व उझबेकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांची भेट

Web Title: Typhoon trami devastates the philippines 26 killed more than 1 5 lakh people affected nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2024 | 04:16 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.