पंतप्रधान मोदी 16 व्या ब्रिक्स परिषदेच्या निमित्ताने संयुक्त अरब अमिराती (यूएई), इजिप्त आणि कझाकिस्तानच्या अध्यक्षांचीही भेट घेताना ( फोटो सौजन्य: @narendramodi)
कझान: पंतप्रधान नरेंद्र मोदी कझानमध्ये होणाऱ्या 16 व्या BRICS परिषदेसाठी दोन दिवसाच्या दौऱ्यावर रशियाला गेले आहेत. यादरम्यान त्यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन तसेच चीनचे पंतप्रधान शी जिनपिंग यांच्याशी द्वीपक्षीय बैठक घेतली. तसेच त्यांनी इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियन यांच्यासोबत देखील महत्त्वपूर्ण बैठक घेतली. यानंतर पंतप्रधान मोदींनी 16 व्या ब्रिक्स परिषदेच्या निमित्ताने संयुक्त अरब अमिराती (यूएई), इजिप्त आणि कझाकिस्तानच्या अध्यक्षांचीही भेट घेतली.
UAE चे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांची भेट
याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या एक्स अकाउंटवर काही ट्विट देखील केले आहेत. यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रथम UAE चे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांनी एकमेकांची विचारपूस केली. तसेच भारत-यूएई संबंध अधिक दृढ करण्यासाठी वचनबद्धता व्यक्त केली. या बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर फोटो शेअर केले आहेत.
Glad to have met my brother, His Highness Sheikh Mohamed bin Zayed Al Nahyan, President of UAE, on the sidelines of the BRICS Summit in Kazan. @MohamedBinZayed pic.twitter.com/rupjAEUHgV
— Narendra Modi (@narendramodi) October 23, 2024
इजिप्तच्या अध्यक्षांची भेट
यानंतर इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फताह एलसीसी यांचीही भेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली. याबाबत एक्सवर फोटो शेअर करताना मोदींनी म्हटले आहे की, काझानमध्ये इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देलफताह एल-सिसी यांच्याशी बोलून आनंद झाला.
Happy to have interacted with President Abdelfattah Elsisi in Kazan. @AlsisiOfficial pic.twitter.com/Pv2i5olK8D
— Narendra Modi (@narendramodi) October 23, 2024
पीएम मोदींनी उझबेकिस्तानचे अध्यक्ष शौकत यांचीही भेट घेतली
या 16 व्या ब्रिक्स परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदींनी काझानमध्ये उझबेकिस्तानचे अध्यक्ष शवकत मिर्जिओयेव यांचीही भेट घेतली. याबाबत पंतप्रधान मोदींनी पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये नरेंद्र मोदींनी, कझानमध्ये उझबेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष शवकत मिर्झीयोयेव यांच्याशी त्यांची छान भेट झाली. भारत आणि उझबेकिस्तानमधील व्यापार आणि सांस्कृतिक संबंधांसह द्विपक्षीय सहकार्याला चालना देण्याच्या मार्गांवर चर्चा करण्यात आली असे म्हटले आहे.
Had a wonderful meeting with President Shavkat Mirziyoyev in Kazan. Discussed ways to boost bilateral cooperation between India and Uzbekistan including trade and cultural linkages.@president_uz pic.twitter.com/CZFKChfwS2
— Narendra Modi (@narendramodi) October 23, 2024
भारत-उझबेकिस्तान द्विपक्षीय सहकार्यातील प्रगतीचा आढावा घेतला
मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही देशाच्या नेत्यांनी व्यापार, आर्थिक, आरोग्य, कनेक्टिव्हिटी, क्षमता निर्माण आणि डिजिटल तंत्रज्ञानासह भारत-उझबेकिस्तान द्विपक्षीय सहकार्यातील प्रगतीचा आढावा घेतला. याशिवाय त्यांनी ग्लोबल साउथचा आवाज बळकट करण्यासाठी प्रादेशिक आणि जागतिक मंचांवर एकत्र काम करण्याचे ठरवले.