Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jeffrey Epstein: जगातील सर्वात मोठे स्कँडल! पण ट्रम्पसाठी फाईल्समध्ये दस्तऐवजांची फेरबदल कूटनीती; ‘अनेक’ नावे गुलदस्त्यात

Jeffrey Epstein Files Release: अमेरिकेच्या न्याय विभागाने जेफ्री एपस्टाईन प्रकरणाशी संबंधित फायली जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. कागदपत्रांमध्ये बिल क्लिंटन, डोनाल्ड ट्रम्प आणि मायकल जॅक्सन सारख्या नावांचा उल्लेख आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Dec 20, 2025 | 02:40 PM
Epstein's files became famous but they were handled to save Trump A new claim has come to light

Epstein's files became famous but they were handled to save Trump A new claim has come to light

Follow Us
Close
Follow Us:
  •  अमेरिकेच्या न्याय विभागाने अखेर वादग्रस्त जेफ्री एपस्टाईन प्रकरणाशी संबंधित हजारो पानांच्या फाईल्स आणि फोटो सार्वजनिक केले आहेत.
  •  प्रसिद्ध झालेल्या कागदपत्रांमध्ये बिल क्लिंटन, डोनाल्ड ट्रम्प, मायकल जॅक्सन आणि मिक जॅगर सारख्या जागतिक हस्तींच्या नावांचा आणि फोटोंचा उल्लेख आहे.
  •  फाईल्समधील अनेक महत्त्वाचे भाग काळ्या शाईने लपवण्यात आल्यामुळे ट्रम्प सरकारवर “निवडक पारदर्शकता” आणि स्वतःला वाचवण्याचा आरोप होत आहे.

Jeffrey Epstein files release December 2025 : अमेरिकेच्या (America) इतिहासातील सर्वात वादग्रस्त आणि रहस्यमयी प्रकरणांपैकी एक असलेल्या ‘जेफ्री एपस्टाईन’ (Jeffrey Epstein) प्रकरणाने पुन्हा एकदा जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आणि राजकीय ओढाताणीनंतर, अमेरिकेच्या न्याय विभागाने या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रांचा पहिला संच सार्वजनिक केला आहे. मात्र, या फाईल्स बाहेर येताच पारदर्शकतेपेक्षा वादाचे वादळ अधिक निर्माण झाले आहे. या कागदपत्रांमध्ये जगातील काही सर्वात शक्तिशाली व्यक्तींच्या नावांचा उल्लेख असल्याने खळबळ उडाली आहे.

काय आहे एपस्टाईन फाइल्सचा वाद?

अब्जाधीश जेफ्री एपस्टाईन हा अल्पवयीन मुलींच्या लैंगिक तस्करीच्या रॅकेटचा मास्टरमाईंड होता. २०१९ मध्ये न्यू यॉर्कच्या तुरुंगात त्याचा संशयास्पद मृत्यू झाला (ज्याला अधिकृतपणे आत्महत्या म्हटले गेले). एपस्टाईनचे संबंध जगातील राजकारणी, सेलिब्रिटी आणि बड्या उद्योगपतींशी होते. नुकताच ‘एपस्टाईन फाइल्स पारदर्शकता कायदा’ संमत करण्यात आला, ज्यानुसार १९ डिसेंबर ही ही कागदपत्रे सार्वजनिक करण्याची अंतिम तारीख होती. डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या प्रचारादरम्यान या फाईल्स पूर्णपणे उघड करण्याचे आश्वासन दिले होते, परंतु आता प्रसिद्ध झालेल्या फाईल्समुळे नवा राजकीय वाद सुरू झाला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Release The Files : अमेरिकेचा सत्तेच्या पडद्यामागील ‘डर्टी गेम’! ‘Epstein Files’ जगासमोर येताच गळून पडणार ‘अनेक’ प्रख्यात मुखवटे

गौप्यस्फोटात काय समोर आले?

प्रसिद्ध झालेल्या फाइल्समध्ये काही धक्कादायक फोटो आणि नोंदी आहेत: १. बिल क्लिंटन यांचे फोटो: एका फोटोमध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन ‘हॉट टब’ मध्ये दिसत आहेत. दुसऱ्या फोटोमध्ये ते एपस्टाईनची सहकारी घिसलेन मॅक्सवेल हिच्यासोबत पोहताना दिसत आहेत. २. सेलिब्रिटींची नावे: पॉप स्टार मायकल जॅक्सन, मिक जॅगर, वुडी ॲलन आणि प्रसिद्ध विचारवंत नोम चॉम्स्की यांची नावे आणि फोटो या कागदपत्रांमध्ये समोर आले आहेत. ३. डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव: ट्रम्प यांचे नाव ‘फ्लाइट लॉग्स’ आणि संपर्क पुस्तकांमध्ये आहे. मात्र, तपासात असे दिसून आले की ट्रम्प आणि एपस्टाईन यांचे संबंध १९९० च्या दशकात होते आणि नंतर ते संपुष्टात आले होते.

Epstein files dropped via DOJ after Trump urged release + AG Pam Bondi’s Transparency Act deadline. BIG NB: docs are real, but Epstein’s email claims are unverified. They don’t allege Trump wrongdoing—only mention him. No law enforcement records tie Trump to Epstein crimes. pic.twitter.com/TRnh5MzfWx — Comedy Threads (@Abiaonline1) December 20, 2025

credit : social media and Twitter

पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह: काय लपवले जात आहे?

या फाईल्स सार्वजनिक करण्यात आल्या असल्या तरी, टीकाकारांच्या मते यात प्रचंड “सेन्सॉरशिप” (Redaction) करण्यात आली आहे. फाईल्समधील २५४ महिला मालिश करणाऱ्यांची यादी असलेली पाने पूर्णपणे काळ्या रंगाने लपवण्यात आली आहेत. न्याय विभागाने सुरक्षेचे कारण दिले असले तरी, डेमोक्रॅटिक नेत्यांनी आरोप केला आहे की ट्रम्प सरकार आपल्या सोयीची नावे लपवत आहे. सिनेट नेते चक शुमर यांनी याला “निवडक पारदर्शकता” म्हटले असून, ट्रम्प यांना त्यांच्या भूतकाळातील संबंधांपासून वाचवण्यासाठी हे केले जात असल्याचा आरोप केला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : VIRAL: ‘सेक्स टॉय ते काँडोम..’ Epstein Files फोटोंनी जगभरात आश्चर्याचा स्फोट; अमेरिकेत ट्रम्पसोबत सर्वच दिग्गज वादाच्या भोवऱ्यात

तपास आणि लोकांच्या मनातले प्रश्न

एपस्टाईनकडे त्याच्या ‘क्लायंट्स’ची यादी होती का? तो या बड्या लोकांना ब्लॅकमेल करत होता का? हे प्रश्न आजही अनुत्तरित आहेत. जुलैमध्ये एफबीआयने एका मेमोत म्हटले होते की एपस्टाईनकडे अशी कोणतीही अधिकृत क्लायंट लिस्ट नव्हती. मात्र, आता समोर आलेल्या कागदपत्रांमुळे लोकांचा संशय अधिक बळावला आहे. जरी नाव किंवा फोटो असणे हा गुन्ह्याचा पुरावा नसला, तरी नैतिकतेच्या पातळीवर या जागतिक नेत्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. पुढील काही आठवड्यांत लाखो अतिरिक्त कागदपत्रे सार्वजनिक केली जाणार आहेत. या प्रकरणातील गुपिते जशी बाहेर येतील, तशी अमेरिकेच्या राजकारणातील समीकरणे बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही.

💡

Frequently Asked Questions

  • Que: जेफ्री एपस्टाईन फाइल्स म्हणजे काय?

    Ans: या फाईल्स लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टाईनच्या तपासाशी संबंधित असून, त्यात त्याच्याशी संबंधित उच्च-प्रोफाइल व्यक्तींच्या भेटीगाठी आणि व्यवहारांच्या नोंदी आहेत.

  • Que: या फाईल्समध्ये बिल क्लिंटन आणि डोनाल्ड ट्रम्प यांची नावे का आहेत?

    Ans: हे दोन्ही नेते १९९० च्या दशकात एपस्टाईनच्या सामाजिक वर्तुळात होते, त्यामुळे त्यांचे नाव फ्लाइट लॉग्स आणि फोटोंमध्ये आढळून आले आहे.

  • Que: फाईल्समध्ये काही भाग लपवलेले (Redacted) का आहेत?

    Ans: अमेरिकेच्या न्याय विभागाच्या मते, पीडितांची ओळख जपणे आणि चालू तपासाची गोपनीयता राखण्यासाठी काही संवेदनशील माहिती लपवण्यात आली आहे.

Web Title: Us doj releases high profile epstein files naming bill clinton donald trump and michael jackson

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 20, 2025 | 01:41 PM

Topics:  

  • America
  • Donald Trump

संबंधित बातम्या

फोटोनंतर व्हिडिओही व्हायरल; बेडरुम, बाथरुम अन्…,  वाचा Jeffery Epstein च्या प्रकरणातील धक्कादायक खुलासे
1

फोटोनंतर व्हिडिओही व्हायरल; बेडरुम, बाथरुम अन्…, वाचा Jeffery Epstein च्या प्रकरणातील धक्कादायक खुलासे

Jeffrey Epstein Files : एपस्टाईन फाइल्समुळे पुन्हा खळबळ ; सेलिब्रिटींच्या संबंधाची नवी यादी समोर 
2

Jeffrey Epstein Files : एपस्टाईन फाइल्समुळे पुन्हा खळबळ ; सेलिब्रिटींच्या संबंधाची नवी यादी समोर 

ट्रम्पची सीरियावर कृपा! अमेरिकेने हटवले सर्व कठोर निर्बंध
3

ट्रम्पची सीरियावर कृपा! अमेरिकेने हटवले सर्व कठोर निर्बंध

Epstein Files मधून फुटला बॉम्ब! Bill Gates यांच्या फोटोंसह अनेक दिग्गजांची गुपिते आली जगासमोर
4

Epstein Files मधून फुटला बॉम्ब! Bill Gates यांच्या फोटोंसह अनेक दिग्गजांची गुपिते आली जगासमोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.