
donald trump flirt catherine burgum video hired husband for beauty controversy
Donald Trump flirt Catherine Burgum video : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) हे आपल्या बिनधास्त आणि अनेकदा वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखले जातात. मात्र, आता त्यांनी थेट आपल्याच कॅबिनेट मंत्र्यांच्या पत्नीबाबत केलेल्या एका विधानाने खळबळ माजली आहे. ओव्हल ऑफिसमध्ये एका अधिकृत कार्यक्रमादरम्यान ट्रम्प यांनी अमेरिकेचे गृहमंत्री (Interior Secretary) डग बर्गम यांच्या पत्नी कॅथरीन बर्गम यांच्याशी चक्क फ्लर्टिंग केल्याचे समोर आले आहे.
शुक्रवारी व्हाईट हाऊसच्या ओव्हल ऑफिसमध्ये ड्रग्ज आणि व्यसनाधीनतेच्या मुद्द्यावर एका कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी गृहमंत्री डग बर्गम आणि त्यांची पत्नी कॅथरीन उपस्थित होत्या. कॅथरीन बर्गम यांनी व्यसनातून सावरण्याचा आपला वैयक्तिक अनुभव उपस्थितांसमोर मांडला. त्यांचे भाषण संपल्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी माईकचा ताबा घेतला आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : China Coup : चीनमध्ये सत्तापालटाचा थरार! दोन बड्या जनरल्सना बेड्या; लष्कराने थेट शी जिनपिंग यांनाच दिले आव्हान
ट्रम्प म्हणाले की, “मी एकदा कॅथरीनचा घोड्यावर स्वार होण्याचा व्हिडिओ पाहिला होता. त्या व्हिडिओत ती इतकी सुंदर दिसत होती की मी लगेच विचारले, ही महिला कोण आहे? जेव्हा मला कळाले की ती डगची पत्नी आहे, तेव्हा मी ठरवले की तिला नाही पण तिच्या पतीला (डग बर्गम) नक्कीच नोकरीवर ठेवेन.” यानंतर कॅथरीनकडे बघत ते हसून म्हणाले, “तू खरंच खूप सुंदर आहेस आणि तुझ्या सौंदर्यामुळेच डगला व्हाईट हाऊसमध्ये ही नोकरी मिळाली आहे.”
BREAKING: Trump just claimed that he hired Doug Burgum because he was attracted to his wife. What an awkward moment. “I saw them riding horses in a video. And I said, ‘Who is that?’ I was talking about her, not him. I said, ‘I’m gonna hire her,’ because anybody that has… pic.twitter.com/BE7BqEql0T — Brian Krassenstein (@krassenstein) January 29, 2026
credit – social media and Twitter
६९ वर्षीय डग बर्गम हे ट्रम्प यांचे जुने मित्र आहेत. ते नॉर्थ डकोटाचे दोन वेळा गव्हर्नर राहिले असून एक यशस्वी उद्योजक आहेत. ट्रम्प यांच्या ऊर्जेविषयक धोरणांमध्ये त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. मात्र, ट्रम्प यांनी त्यांच्या निवडीचे श्रेय त्यांच्या पत्नीच्या सौंदर्याला दिल्याने आता अमेरिकन माध्यमांमध्ये यावर उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US-Iran War: ‘शरणागती नाही, युद्धच!’ अमेरिकेचा इराणला 3 बाजूंनी वेढा, 6 विनाशक नौका; ट्रम्प यांच्या अटींनी आखात पेटले
ट्रम्प यांची ही पहिलीच वेळ नाही. काही दिवसांपूर्वी ‘एअर फोर्स वन’ विमानातून प्रवास करताना त्यांनी आपली प्रेस सेक्रेटरी कॅरोलिना लेविट यांच्याबद्दलही अशाच कमेंट्स केल्या होत्या. “विमान थरथरत आहे, मला काहीतरी पकडायचे आहे पण मी कॅरोलिनाला पकडणार नाही,” असे विधान त्यांनी केले होते. तसेच एका रॅलीमध्ये कॅरोलिनाच्या चेहऱ्याचे आणि ओठांचे कौतुक करताना त्यांनी “लिप्स लाइक अ मशीन गन” (ओठ मशीन गनसारखे चालतात) असेही म्हटले होते.
Ans: ट्रम्प यांनी म्हटले की, कॅथरीनच्या सौंदर्यामुळेच त्यांनी तिचे पती डग बर्गम यांना अमेरिकेचे गृहमंत्री म्हणून कामावर ठेवले आहे.
Ans: डग बर्गम हे अमेरिकेचे गृहमंत्री (Secretary of the Interior) आहेत आणि ते नॉर्थ डकोटाचे माजी गव्हर्नर आहेत.
Ans: कॅरोलिना लेविट या व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी आहेत, ज्यांच्याबद्दल ट्रम्प यांनी अनेकदा त्यांच्या सौंदर्यावरून कमेंट्स केल्या आहेत.