
Trump-Mamdani Meeting
पूर्वी एकमेकांचे कट्टर राजकीय शत्रू असणारे दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर आले. या भेटीत दोन्ही नेत्यांनी वाढती महागाई, न्यूयॉर्क शहराची सुरक्षा आणि स्थलांतरितांच्या मुद्द्यांवर चर्चा केली. तसेच दोन्ही नेत्यांनी या मुद्यांवर एकत्र येऊन काम करणार असल्याचे म्हटले. आश्चर्यकारक बाब म्हणजे ममदानी निवडणूकीत विजयी होण्यापूर्वी ट्रम्प यांनी त्यांना तीव्र विरोध केला होते. त्यांना धमकीही देण्यात आली होती. परंतु आता ट्रम्प यांचे सूर बदलताना दिसत आहे. ममदानी यांनी देखील ट्रम्प प्रती आपल्या भूमिकेत बदल करत असल्याचे स्पष्ट होत आहे.
निवडणूकीदरम्यान ममदानी यांना ट्रम्पने १०० कम्युनिस्ट लूनाटिक म्हणून संबोधले होते. तर ममदानी यांनी देखील ट्रम्पला हुकूमशाहीवादी नेता असे म्हटले होते. त्यांच्या या भेटीवेळी एका पत्रकाराने ममदानी यांना यावर एक प्रश्न देखील विचारला होता. यावर ट्रम्प यांनी अगदी हलक्या-फुलक्या मजेशीर अंदाजात उत्तर दिले होते.
ममदानी यांना विचारण्यात आले होते की, ते अजूनही ट्रम्प यांना फासिस्टवादी समजतात का? यावर ममदानी यांनी उत्तर देण्यापूर्वी ट्रम्प यांनी, तू हो म्हणू शकतोस, समाजवून सांगण्यापेक्षा हे सोपे आहे. याचा मला काही फरक पडत नाही असे म्हटले होते.
ममदानी यांचे ट्रम्प यांनी केले कौतुक
याशिवाय ट्रम्प यांनी जोहरान ममदानी यांचे खूप मेहनती म्हणून संबोधत कौतुकही केले. तसेच त्यांनी विचारण्यात आलेल्या प्रश्नावर ते ममदानी यांना जिहादी मानत नाहीत, असेही म्हटले. ममदानी यांना शांत, समजुतदार आणि तार्कित व्यक्ती म्हटले.
Q: Are you affirming that you think President Trump is a fascist? MAMDANI: I’ve spoken about– TRUMP: That’s okay. You can just say yes. I don’t mind. pic.twitter.com/uWZFRcmGxB — Aaron Rupar (@atrupar) November 21, 2025
या मुद्यांवर झाली ममदानी-ट्रम्प यांच्या चर्चा
Ans: डोनाल्ड ट्रम्प आणि ममदानी यांच्या भेटीदरम्यान, वाढती महागाई, स्थलांतरित, न्यूयॉर्क शहराची सुरक्षितता यांसारख्या मुद्यांवर चर्चा झाली.
Ans: पत्रकाराच्या प्रश्नावर ममदानी एक्सप्लेन करत असताना, ट्रम्प यांनी मजेशीर अंदाजात उत्तर दिले. त्यांनी म्हटले की, तू हो म्हणून शकोस, समजावून सांगत बसण्याची गरज नाही. मला याचा काहीही फरक पडत नाही.
Ans: ट्रम्प यांनी ममदानींशी भेटीदरम्यान पत्रकाराच्या प्रश्नावर ते ममदानी यांना जिहादी मनत नसल्याचे म्हटले आहे.