Explainer : ट्रम्पच्या धमक्यांना नाही बधले ममदानी! न्यूयॉर्कच्या ख्रिश्चन लोकसंख्येमध्ये खाऊन गेले भाव, कसे? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सध्या अमेरिकेचे न्यूयॉर्क शहर जागतिक स्तरावर चर्चेचे केंद्रबिंदू बनले आहे. या शहराने ४ नोव्हेंबर रोजी आपल्या शहराचा महापौर निवडला. एका मुस्लिम तरुणाला न्यूयॉर्कच्या नागरिकांना आपला महापौर निवडला आहे. ३४ वर्षीय, जोहरान क्वामे ममदानी यांच्या हातात न्यूयॉर्कचे नेतृत्त्व आले. परंतु सध्या एक ख्रिश्चन बहुसंख्यिकी देशात एक मुस्लिम व्यक्ती नेता कसा बनला?, तसेच ट्रम्प यांचा विरोध असतानाही ममदानी महापौर कसे बनले?, यावर सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. आज आपण यावर थोडक्यात जाणून घेणार आहोत.
भारतीय वंशाचे जोरहान ममदानी यांनी या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला आहे. ते महापौरपदाच्या शर्यतीत सुरुवातीपासूनच ममदानी आघाडीवर होते. ममदानी न्यूयॉर्कचे पहिले मुस्लिम महापौर बनले आहेत. त्यांनी न्यूयॉर्कचे माजी महापौर ॲंड्र्यू कुओमा यांचा पराभव केला आहे. तसेच त्यांच्या पराभवाने डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनाही मोठा धक्का बसला आहे.
ममदानी यांनी केवळ त्यांच्या कुओमांनाच पराभूत केले नाही, तर त्यांनी रिपल्बिकन उमेदवार कर्टिस स्लिवालाही मागे टाकले आहे. शिवाय ट्रम्प आणि ममदानी यांच्यात अनेक राजकीय मतभेद आहेत. ट्रम्प यांनी ममदानी जिंकल्यानंतर निधी थांबवण्याची धमकीही दिली होती, परंतु ट्रम्प यांच्या धमक्यांना न घाबरता न्यूयॉर्कच्या जनतेने ममदानी यांची आपला नेता म्हणून निवड केली आहे.
न्यूयॉर्क हे केवळ एक शहर नाही, तर अमेरिकेची आर्थिक राजधानी आहे. २०२४ मध्ये न्यूयॉर्कचा GDP २.३२ ट्रिलियन डॉलरपेक्षा जास्त होता. न्यूयॉर्क स्वतंत्र देश असता तर यामुळे हे शहर जगात सर्वात जास्त GDP च्या यादीत १३व्या क्रमांकावर असता. न्यूयॉर्कमध्ये फायनान्स, हेल्थ केअर, बायोटेक. रिअल इस्टेट व इन्शुरन्स यांसारख्या क्षेत्रांमध्ये मोठा विकार झाला आहे. या शहरात वॉल स्ट्रीट येथे जागतिक व्यापार केला जातो. तसेच युनाटेड नेशन्सचे हेडक्वार्टर देखील येथे आहे.
आता यामागे काही प्रमुख कारण आहेत. ती कोणती ते आपण जाणून घेऊयात
यावरुन लक्षात येते की, धर्माच्या आधारावर नव्हे, तर योग्य अशा मुद्यांवर, ज्यामुळे सामान्यांचे प्रश्न सुटतील त्यांना त्यांच्या नेत्यावर कायम विश्वास राहिले अशा पद्धतीने ममदानी यांनी न्यूयॉर्कच्या जनतेचा विश्वास जिंकला आहे.






