Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Thackeray Brothers Alliance |
  • Marathi news |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vijay Mallya : विजय मल्ल्या म्हणाले, ‘फरार हा शब्द काढून टाका’; मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले, ‘आधी भारतात परत या’

Vijay Mallya News: फरार उद्योगपती विजय मल्ल्या यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून झटका मिळाला. न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले की तो भारतात परत येईपर्यंत त्याच्या याचिकेवर सुनावणी होणार नाही.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Dec 24, 2025 | 11:43 AM
Vijay Mallya said remove the word absconder Bombay High Court said return to India first

Vijay Mallya said remove the word absconder Bombay High Court said return to India first

Follow Us
Close
Follow Us:
  • जोपर्यंत विजय मल्ल्या प्रत्यक्ष भारतात हजर होत नाही, तोपर्यंत त्यांच्या कोणत्याही याचिकेवर सुनावणी घेतली जाणार नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले.
  • मल्ल्याने भारतात कधी परतणार याची निश्चित वेळ सांगणारे प्रतिज्ञापत्र सादर करावे, असे निर्देश मुख्य न्यायमूर्तींच्या खंडपीठाने दिले आहेत.
  • ‘मल्ल्याने स्वतःला ‘फरार’ मानण्यास नकार दिला असला, तरी ईडीने (ED) याला तीव्र विरोध करत “कायद्यापासून पळ काढणाऱ्यांना सवलत नको” अशी भूमिका घेतली.

Vijay Mallya Bombay High Court latest news : बँकांना हजारो कोटींचा चुना लावून लंडनमध्ये आश्रय घेतलेले उद्योगपती विजय मल्ल्या (Vijay Mallya) यांना मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) पुन्हा एकदा जमिनीवर आणले आहे. “मला फरार म्हणू नका” आणि “माझ्यावरील गुन्हेगारी शिक्का पुसून टाका” अशी विनंती घेऊन आलेल्या मल्ल्याला न्यायालयाने स्पष्ट शब्दांत सुनावले आहे की, “जर तुम्हाला न्याय हवा असेल, तर आधी भारताच्या कायद्यासमोर शरणागती पत्करा.” या निकालामुळे मल्ल्याच्या कायदेशीर टीमला मोठा धक्का बसला असून, पुन्हा एकदा त्यांच्या प्रत्यार्पणाची चर्चा सुरू झाली आहे.

नेमकं प्रकरण काय? न्यायालयातील खडाजंगी

मंगळवारी मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंकर यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. विजय मल्ल्या यांनी ‘फरार आर्थिक गुन्हेगार कायदा’ (FEO Act, 2018) च्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणारी याचिका दाखल केली होती. मात्र, न्यायालयाने ही याचिका ऐकण्यासच नकार दिला. खंडपीठाने मल्ल्याला विचारले की, “तुम्ही न्यायालयाच्या अधिकारक्षेत्रात नसताना आणि देशाबाहेर बसून कायद्याला आव्हान कसे देऊ शकता? आधी भारतात परतण्याची तारीख सांगा, मगच आम्ही विचार करू.”

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : DOJ Release: Trump-Epsteinचे ‘डार्क’ कनेक्शन; ट्रम्पविरुद्ध महिलांवर अत्याचार अन् ‘Lolita Express’मध्ये प्रवासाचे धक्कादायक पुरावे

“जबाबदारीपेक्षा वसुली जास्त झालीय!” : मल्ल्याचा युक्तिवाद

विजय मल्ल्या यांची बाजू मांडणारे वरिष्ठ वकील अमित देसाई यांनी एक वेगळाच आकडा मांडला. त्यांनी सांगितले की, “मल्ल्या यांचे बँकांचे देणे सुमारे ६,००० कोटी रुपये आहे. मात्र, ईडीने त्यांची मालमत्ता जप्त करून तब्बल १४,००० कोटी रुपये आधीच वसूल केले आहेत. मल्ल्या यांना सर्व प्रकरणे संपवून जबाबदाऱ्या पूर्ण करायच्या आहेत.” यावर न्यायालयाने उपरोधिक टोमणा मारला की, “प्रत्यक्ष हजर न राहता गुन्हेगारी जबाबदारी कशी संपवता येईल?”

‘Come back to India first’ The Bombay High Court asked fugitive businessman Vijay Mallya on Dec 23 when he intended to come back to India, while hearing his plea challenging the invocation of the Fugitive Economic Offenders (FEO) Act against him, along with his challenge to… pic.twitter.com/55wkOjvR1l — CNBC-TV18 (@CNBCTV18News) December 24, 2025

credit : social media and Twitter

ईडीचा तीव्र विरोध: तुषार मेहतांची फटकेबाजी

अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी मल्ल्याच्या याचिकेला कडाडून विरोध केला. त्यांनी सांगितले की, “एखादी व्यक्ती देशाचा कायदा धाब्यावर बसवून पळून जाते आणि पुन्हा त्याच कायद्याच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करते, हे स्वीकारार्ह नाही. फरार व्यक्तींना अशा प्रकारची सवलत दिल्यास कायद्याचा धाक उरणार नाही.”

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : LVM3-M6 : मोफत इंटरनेटच्या दिशेने ISROचे लक्षणीय पाऊल; ‘Bluebird-2 Satellite’ मुळे होणार स्मार्टफोन क्रांती, वाचा कसे?

ललित मोदींसोबतचा ‘तो’ व्हिडिओ अन् मल्ल्याची हसती मुद्रा

एकीकडे न्यायालयात ही कायदेशीर लढाई सुरू असताना, दुसरीकडे सोशल मीडियावर मल्ल्या यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये हे दोन्ही ‘फरार’ उद्योगपती एका पार्टीत मजा करताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये ललित मोदी व्यंग्यात्मकपणे ओरडताना दिसतात, “आम्ही पळून जाणारे (Fugitives) आहोत!” यावर विजय मल्ल्या मोठ्याने हसताना दिसत आहेत. या व्हिडिओमुळे मल्ल्या यांची प्रतिमा अधिकच मलीन झाली असून, त्यांना कायद्याचा कोणताही आदर नसल्याची टीका जनतेतून होत आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: मुंबई उच्च न्यायालयाने विजय मल्ल्याला कोणती अट घातली आहे?

    Ans: न्यायालयाने अट घातली आहे की, मल्ल्याने भारतात परतण्याची निश्चित वेळ सांगणारे प्रतिज्ञापत्र सादर करावे, त्याशिवाय त्यांच्या याचिकेवर सुनावणी होणार नाही.

  • Que: विजय मल्ल्या यांच्या मालमत्तेतून किती वसुली झाली आहे?

    Ans: मल्ल्याच्या वकिलांनुसार, ६,००० कोटींच्या दायित्वाच्या बदल्यात ईडीने त्यांची मालमत्ता जप्त करून सुमारे १४,००० कोटी रुपये वसूल केले आहेत.

  • Que: व्हायरल व्हिडिओमध्ये ललित मोदींनी काय म्हटले आहे?

    Ans: एका पार्टीच्या व्हिडिओमध्ये ललित मोदी व्यंग्यात्मकपणे "आम्ही भारतातील सर्वात मोठे फरार आहोत" असे म्हणताना आणि मल्ल्या त्यावर हसताना दिसत आहेत.

Web Title: Vijay mallya said remove the word absconder bombay high court said return to india first

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 24, 2025 | 11:43 AM

Topics:  

  • Bombay High Court
  • international news
  • Lalit Modi
  • Vijay Mallya

संबंधित बातम्या

Bangladesh Violence : लक्ष्मीपूरमध्ये नरसंहार! घराला आग लावून पेटवून दिले; चिमुरडीचा आक्रोश विरला आगीत, VIDEO VIRAL
1

Bangladesh Violence : लक्ष्मीपूरमध्ये नरसंहार! घराला आग लावून पेटवून दिले; चिमुरडीचा आक्रोश विरला आगीत, VIDEO VIRAL

जागतिक नेत्यांच्या जीवाला लागलाय घोर; जेफ्री एपस्टाईनच्या फाईलने उलघडणार गुपित
2

जागतिक नेत्यांच्या जीवाला लागलाय घोर; जेफ्री एपस्टाईनच्या फाईलने उलघडणार गुपित

‘एकदाच संपवून टाका अन्…’; कंबोडीया-थायलंड संघर्षावर ‘ASEAN’ ने स्पष्ट केली निर्णायक भूमिका
3

‘एकदाच संपवून टाका अन्…’; कंबोडीया-थायलंड संघर्षावर ‘ASEAN’ ने स्पष्ट केली निर्णायक भूमिका

बांगलादेशमध्ये उडाला भडका! भारतविरोधी आवाजाने सीमा भागांमध्ये तणावपूर्ण परिस्थिती
4

बांगलादेशमध्ये उडाला भडका! भारतविरोधी आवाजाने सीमा भागांमध्ये तणावपूर्ण परिस्थिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.