Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Modi-Trump: रातोरात गेम पलटला! ट्रम्पकडून 500 अब्ज डॉलर्सच्या कराराचे ‘रिटर्न गिफ्ट’; अमेरिकेच्या नकाशात PoK भारताचा भाग

US Trade Representative J&K Map: भारतासोबतच्या व्यापार करारानंतर, अमेरिकेने जम्मू आणि काश्मीरला भारताचा भाग म्हणून दाखवणारा नकाशा जारी केला, ज्यामुळे पाकिस्तानच्या प्रचाराला मोठा धक्का बसला आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Mar 10, 2026 | 02:32 PM
us trade rep map shows pok kashmir as part of india trump modi trade deal impact

us trade rep map shows pok kashmir as part of india trump modi trade deal impact

Follow Us
Follow Us:
  • नकाशात ऐतिहासिक बदल
  • पाकिस्तानला मोठा धक्का
  • व्यापार कराराचा परिणाम

US Trade Representative India map 2026 : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (President Donald Trump) यांच्यात झालेल्या ऐतिहासिक ‘मदर ऑफ ऑल डील्स’ (Trade Deal) नंतर आता त्याचे राजनैतिक परिणाम दिसू लागले आहेत. अमेरिकेने एक असे पाऊल उचलले आहे, ज्याची कल्पनाही पाकिस्तानने केली नसेल. अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधी कार्यालयाने (USTR) एक अधिकृत नकाशा प्रसिद्ध केला आहे, ज्यामध्ये संपूर्ण जम्मू-काश्मीर, लडाख आणि पाकव्याप्त काश्मीर (PoK) भारताचा भाग असल्याचे स्पष्टपणे दाखवण्यात आले आहे.

अमेरिकेच्या भूमिकेत ‘यू-टर्न’?

दशकांपासून अमेरिका काश्मीर प्रश्नावर सावध भूमिका घेत आली आहे. काश्मीर हा भारत आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय मुद्दा असून तो चर्चेने सोडवावा, असे अमेरिकेचे स्टेट डिपार्टमेंट वारंवार सांगत असे. मात्र, ७ फेब्रुवारी २०२६ रोजी जारी केलेल्या या नकाशाने जुन्या सर्व परंपरा मोडीत काढल्या आहेत. या नकाशात कोणतीही ‘डॉटेड लाईन’ किंवा विवादित क्षेत्राची खूण नाही, तर संपूर्ण भूभाग भारताच्या सीमांतर्गत दाखवण्यात आला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Nuclear Shift: बटण दाबले की विनाश! भारत शांततेच्या काळातही क्षेपणास्त्रे ठेवणार ‘रेडी टू फायर’; SIPRI अहवालाने पाकला फुटला घाम

पाकिस्तानचे ‘रक्ताचे अश्रू’: शाहबाज आणि मुनीर हतबल

गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख असीम मुनीर हे डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी संबंध सुधारण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत होते. मुनीर यांनी अमेरिकेचे अनेक दौरे केले आणि ट्रम्प यांना गाझा शांतता प्रक्रियेत सहभागी करून घेण्याचे आमिषही दाखवले. मात्र, ट्रम्प यांनी पाकिस्तानच्या या सर्व प्रयत्नांवर पाणी फेरले आहे. भारताशी करार होताच अमेरिकेने नकाशा बदलून पाकिस्तानला स्पष्ट संदेश दिला आहे की, आता अमेरिकेचे प्राधान्य फक्त आणि फक्त भारत आहे.

Not a good News for Pakistan. US Trade Representative’s Office has released India Map which shows entire J&K including PoK as part of India. Usually there is a clear demarcation. US agrees with India political map. pic.twitter.com/ke7ii0nlZS — Aditya Raj Kaul (@AdityaRajKaul) February 7, 2026

credit – social media and Twitter

व्यापार ठरला ‘गेमचेंजर’

हा नकाशा अचानक बदलण्यामागे भारतासोबत झालेला ५०० अब्ज डॉलर्सचा व्यापार करार असल्याचे मानले जाते. ट्रम्प हे व्यवसायाभिमुख नेते आहेत आणि त्यांना जाणीव आहे की भारत ही जगातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. रशियन तेलाच्या मुद्द्यावरून निर्माण झालेला तणाव दूर करून भारताने अमेरिकेकडून मोठी खरेदी करण्याचे मान्य केल्यावर, ट्रम्प यांनी भारताच्या सर्वात संवेदनशील मुद्द्यावर (काश्मीर) उघडपणे साथ दिली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Trade Deal: ‘मेक इन इंडिया’ला मिळाले जागतिक पंख; मोदींच्या एका ‘ट्विट’ने बदललं जागतिक समीकरण अन् India-US मैत्री आणखी घट्ट

आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताचे वाढते वजन

केवळ पोकळ आश्वासने न देता प्रत्यक्ष नकाशात बदल करणे, ही भारतासाठी मोठी कुटनीतिक विजय (Diplomatic Win) मानली जात आहे. यामुळे केवळ पाकिस्तानच नाही तर चीनलाही मोठा संदेश गेला आहे, कारण या नकाशात ‘अक्साई चीन’चा भागही भारताचाच असल्याचे सूचित करण्यात आले आहे. आता पाकिस्तान यावर काय अधिकृत प्रतिक्रिया देतो, याकडे जगाचे लक्ष लागले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: अमेरिकेच्या नवीन नकाशात जम्मू-काश्मीरची स्थिती काय आहे?

    Ans: अमेरिकेच्या USTR कार्यालयाने जारी केलेल्या नवीन नकाशात संपूर्ण जम्मू-काश्मीर, लडाख आणि पाकव्याप्त काश्मीर (PoK) भारताचा अविभाज्य भाग म्हणून दाखवण्यात आले आहे.

  • Que: या बदलाचे मुख्य कारण काय मानले जाते?

    Ans: भारत आणि अमेरिका यांच्यात झालेला ५०० अब्ज डॉलर्सचा व्यापार करार आणि ट्रम्प प्रशासनाची भारतासोबतचे सामरिक संबंध दृढ करण्याची इच्छा हे याचे मुख्य कारण आहे.

  • Que: पाकिस्तानची यावर काय प्रतिक्रिया आहे?

    Ans: पाकिस्तानने या नकाशावर तीव्र आक्षेप घेतला असून, याला 'आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन' म्हटले आहे, मात्र अमेरिकेने अद्याप यावर आपली भूमिका बदललेली नाही.

Web Title: Us trade rep map shows pok kashmir as part of india trump modi trade deal impact

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2026 | 01:38 PM

Topics:  

  • Donald Trump
  • international news
  • PM Narendra Modi
  • POK
  • Shahbaz Sharif
  • Shehbaz Sharif

संबंधित बातम्या

Trump vs US Media : डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा मोठा धक्का; CNN सह 3 माध्यम संस्थांवरील बंदी अखेर उठवली
1

Trump vs US Media : डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा मोठा धक्का; CNN सह 3 माध्यम संस्थांवरील बंदी अखेर उठवली

Trump-Xi Meet : रेड कार्पेट, 21 तोफांची सलामी अन् B-1 बॉम्बरची गर्जना; जिनपिंग यांचे USमध्ये जंगी स्वागत, चर्चेत 4 मोठे मुद्दे
2

Trump-Xi Meet : रेड कार्पेट, 21 तोफांची सलामी अन् B-1 बॉम्बरची गर्जना; जिनपिंग यांचे USमध्ये जंगी स्वागत, चर्चेत 4 मोठे मुद्दे

Maharashtra Today’s Live News in Marathi: विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची पुन्हा शक्यता
3

Maharashtra Today’s Live News in Marathi: विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची पुन्हा शक्यता

Iran–US War : होर्मुझवर पेझेश्कियानांचा इशारा; युद्धाला कोणतीही सीमा नसते
4

Iran–US War : होर्मुझवर पेझेश्कियानांचा इशारा; युद्धाला कोणतीही सीमा नसते

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.