Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

100 दिवसांचा प्लॅन अन् रशियाचे युक्रेनवर हल्ले; ट्रम्प यांच्या योजनेमुळे झेलेन्स्कींची उडाली झोप

Russia-Ukraine War: रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी युद्धबंदीसाठी नकार दिला त्यानंतर ट्रम्प यांनी एक नवी योजना आखली आहे. यामध्ये त्यांनी रशिया आणि युक्रेनला युद्ध संपण्यासाठी 100 दिवसांची मुदत दिली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 29, 2025 | 10:50 AM
What Is Trump 100 Days Plan Fon to End Russia-Ukriane War

What Is Trump 100 Days Plan Fon to End Russia-Ukriane War

Follow Us
Close
Follow Us:

कीव: रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी युद्धबंदीसाठी नकार दिला त्यानंतर ट्रम्प यांनी एक नवी योजना आखली आहे. यामध्ये त्यांनी रशिया आणि युक्रेनला युद्ध संपण्यासाठी 100 दिवसांची मुदत दिली आहे. यामुळे पुतिन यांना युक्रेनला संपुष्टात आणण्यासाठी वेळ मिळाला असल्याचे म्हटले जात आहे. यामुळे झेलेन्स्कींची चिंता वाढली असून त्यांनी नाटो देशांशी युद्धबंदीसाठी चर्चा सुरु केली आहे. खरंतर डोनाल्ड ट्रम्पयांनी निवडणुकीच्या वेळी शपथ घेतल्यानंतर 24 तासांत युद्ध संपवण्याचे आश्वासन दिले होते.

यासंबंधी त्यांनी रशियाला धमकी देखील दिली होती. मात्र पुतिन यांनी याला स्पष्टपणे नकार दिल्याने ट्रम्प यांनी 100 दिवसांची योजना आखली. सध्या या 100 दिवसांत युद्धबंदीच्या योजनेवर कार्य सुरु झाले आहे, मात्र या योजनेमुळे युक्रेनचे मोठे नुकसान होऊ शकते असते तज्ज्ञांनी म्हटले आहे. ट्रम्प यांच्या या नव्या योजनेमुळे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की या कालावधीत रशियाला युक्रेनमधील दक्षिण-पूर्व भागांवर पूर्णपणे कब्जा करण्याची संधी मिळू शकते अशी चिंता त्यांनी व्यक्त केली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- चीनने भारतासोबत संबंध सुधारण्याचा निर्णय का घेतला? काय आहे ड्रैगनचा नेमका हेतू?

काय आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी नेमकी योजना?

डोनाल्ड ट्रम्प यांच्या या 100 दिवसांच्या योजनेनुसार, युक्रेनला हरवलेल्या प्रदेशांचा ताबा रशियाला सुपूर्त करावा लागणार आहे, तसेच रशियाने कब्जा केलेल्या युक्रेनच्या प्रदेशांमधून माघार घ्यावी लागेल. याशिवाय, नाटोने रशियावर लादलेल्या निर्बंधांचाही पुनर्विचार करण्यात येणार असल्याचे या योजनेत म्हटले आहे.

दरम्यान, रशियाने युक्रेनवरील आपल्या हल्ल्यांची तीव्रता वाढवली आहे. रशियन सैनिक वेगाने पुढे सरकत आहेत आणि गुड फ्रायडेपूर्वी अधिकाधिक प्रदेशांवर कब्जा करण्याचा रशियाचा उद्देश आहे. कुर्स्क प्रदेशातून युक्रेनियन सैन्याला हटवून, रशियाच्या कोणत्याही भागावर युक्रेनचा ताबा राहू नये, याची काळजी पुतिन घेत आहेत.

युक्रेनच्या भवितव्याबद्दल अनिश्चितता

या परिस्थितीत, झेलेन्स्की यांनी युद्धविरामाच्या या योजनेला रोखण्यासाठी नाटो देशांशी चर्चा सुरु केली आहे. ट्रम्प यांच्या नव्या योजनेमुळे युरोमध्ये अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले असून युक्रेनच्या भवितव्याबद्दल अनिश्चितता वाढली आहे. यापूर्वी देखील ट्रम्प यांनी युक्रेनला शस्त्र पुरवठ्याची मदत थांबवली होती. डोनाल्ड ट्रम्प यांच्या युक्रेनला शस्त्रस्त्र पुरवठा थांबवण्याच्या निर्णायामुळे आदेशाचा विकासापासून ते लष्करी मदतीपर्यंत अनेक गोष्टींवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

ट्रम्प यांच्या या 100 दिवसांच्या योजनेमुळे युक्रेनला आपल्या हरवलेल्या प्रदेशांचा ताबा सोडावा लागेल, यामुळे झेलेन्स्की यांच्या चिंतेत भर पडली आहे. रशियाच्या वाढत्या हल्ल्यांमुळे युक्रेनच्या सैन्याला मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे, आणि या परिस्थितीत ट्रम्प यांच्या योजनेचे परिणाम काय असतील, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- जगभरातील देशांना अमेरिकेच्या मदतीचे दरवाजे बंद; पण ‘या’ दोन देशांना सूट का?

Web Title: What is trump 100 days plan fon to end russia ukriane war

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 29, 2025 | 10:50 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.