
News Year Celebration
जगात सर्वात आधी २०२६ ची पहाट ही किरिबाती (Kiribati) या देशातील किरीतिमाती(Kiritimati) बेटावर झाली आहे. प्रशांत महासागराच्या मध्यभागी हवाईच्या दक्षिणेला आणि ऑस्ट्रेलियाच्या उत्तर पूर्वेला हे बेट आहे. किरिबाती हा ३३ कोरल बेटांचा समहू असून ४ हजार किलोमीटरच्या क्षेत्रात पसरला आहे, भौगोलिकदृष्ट्या हवाईजवळ हे बेट आहे. किरिबाती अनेक देशांपेक्षा जवळपास एक दिवसांनी पुढे आहे. यामुळे या वेगळ्या टाईमझोनमुळे किरिबातीने भारतासह इतर देशांपूर्वी नव्या वर्षाचा जल्लोष साजरा केला आहे.
अहवालांनुसार, १९९४ मध्ये देशाने एक ऐतिहासिक निर्णय घेतला होता. किरिबातीने संपूर्ण देशात एकच तारिख राहावी यासाठी टाइम झोनमध्ये बदल केला होता. यामुळे हे बेट जगातील नववर्षाचे स्वागत करणारे ठरले आहे. या बेटावर सुमारे १.१६ लाख लोक राहतात. या देशाला १९७९ मध्ये ब्रिटनकडून स्वातंत्र मिळाले होते.
Kiribati 2026 yılına girdi. pic.twitter.com/EchXDjmvps — BPT (@bpthaber) December 31, 2025
किरिबातीनंतर न्यूझीलंडच्या चैथम आयलंडवर नववर्ष २०२६ चे स्वागत करण्यात आले आहे. अवघ्या ६०० लोकसंख्या असलेल्या या बेचटावर जल्लोषात नववर्ष साजरे झाले आहे. लोकांनी २०२५ ला निरोप दिला आहे. यामागचे कारण म्हणजे न्यूझीलंड भारतापेक्षा ७ तास ३० मिनिटांनी पुढे आहे.यामुळे भारतात ३१ डिसेंबरची संध्याकाळ सुरु असताना न्यूझीलंडमध्ये १ जानेवारी २०२६ ची मध्य रात्र सुरु आहे. यामुळे तिथे नवीन वर्षाचा जल्लोष ठरला आहे.
न्यूजीलैंड के ऑकलैंड में आधिकारिक तौर पर 2026 की शुरुआत हुई. #HappyNewYear #HappyNewYear2026 pic.twitter.com/PrLPXkVIfw — Versha Singh (@Vershasingh26) December 31, 2025
भारताच्या समुद्री ताकदीत होणार वाढ; S-5 Nuclear पाणबुडी लवकरच होणार तयार