Saudi VS UAE : एकेकाळचे जिवलग, आज बनले शत्रू! मध्यपूर्वेत वर्चस्वासाठी सौदी-यूएईत संघर्ष, काय आहे प्रकरण? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सौदी अरेबिया सुरुवातीपासून यूएईचा समर्थक होता. दोन्ही देशांची मैक्षी ही सुन्नी मूस्लिम राजेशाही आणि तेलाच्या अर्थव्यवस्थेवर अवलंबून होती. इराणच्या वाढत्या प्रभावामुळे दोन्ही देश याविरोधात एकत्र आले होते. सौदीचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान आणि यूएईचे शासक मोहम्मग बिन झायेद इराणच्या विरोधात उभे राहिले होते. इस्लामिक चवळींमध्ये दोन्ही देशांनी संयुक्त आघाडीही स्थापन केले होते. तसेच बहरीनमध्ये उठाव दडपण्यासाठी आणि 2013 मद्ये इजिप्तमधील मुस्लिम ब्रदरहूड सरकार उथऴून टाकण्यात दोन्ही देशांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
पण सध्या दोन्ही देशांत तीव्र युद्ध सुरु असून यामागचे मुख्य कारण म्हणजे, 30 डिसेंबर 2025 रोजी येमेनमधील सौदी अरेबिया समर्थित सरकारने यूएईच्या एका शस्त्रास्त्रवाहून नेणाऱ्या जहाजावर हल्ला केला. हे जहाज येमेनच्या दक्षिणी बंदरगाह मुकल्लावरुन निघाले होते. सौदी अरेबियाने याचे स्पष्टीकरण देताना यूएई ही शस्त्रे फुटीरतावादी गटांना पुरवत होता असा दावा केला आहे.
परंतु यूएईने सौदीचा हा दावा नाकरला असून ही शस्त्रांची खेप केवळ त्यांच्या सैनिकांसाठी होती असे म्हटले आहे. परंतु येमेनमधील सौदी समर्थिक सरकारने यूएई सैन्याला देश सोडण्यास सांगितले आहे. यासाठी 24 तासांचा अल्टीमेटम देण्यात आला होता आणि यूएईने आपले सैन्य माघारी घेतले आहे.
दोन्ही देश सध्या तेलाच्या अर्थव्यवस्थेपलीकडे जाण्याचा प्रयत्न करत आहे. यूएईने दुबईला जागतिक हब बनवण्याचे उद्दिष्ट ठेवले होते, तर सौदीने देखील व्हिजन 2030 अंतर्गत यूएईला आव्हान दिले आहे. दोन्ही देश स्वत:ची अर्थव्यवस्था बळकट करण्याचा प्रयत्न करत आहे. शिवाय सौदीने 2021 मध्ये यूएई फ्री झोनमधून आयातींवर निर्बंध लादले आहेत. सध्या दोन्ही देशत आखाती देशांवर वर्चस्व करण्यासाठी स्पर्धा करत आहे. येमेन, लिबिया, इजिप्त, इराण, अशा वेगवेळ्या गटांना पाठिंबा देत दोन्ही देश आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहेत.






