Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kash Patel : कोण आहेत काश पटेल? ज्यांना डोनाल्ड ट्रम्प यांनी FBI चे संचालक बनवलं

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारतीय वंशाच्या व्यक्तीवर विश्वास दाखवला आहे. शनिवारी त्यांनी काश पटेल यांची FBI चे नवीन संचालक म्हणून नियुक्त केली.

  • By संदीप गावडे
Updated On: Dec 01, 2024 | 06:38 PM
कोण आहेत काश पटेल? ज्यांना डोनाल्ड ट्रम्प यांनी FBI चे संचालक बनवलं

कोण आहेत काश पटेल? ज्यांना डोनाल्ड ट्रम्प यांनी FBI चे संचालक बनवलं

Follow Us
Close
Follow Us:

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा पुन्हा भारतीय वंशाच्या व्यक्तीवर विश्वास दाखवला आहे. शनिवारी त्यांनी काश पटेल यांची FBI चे नवीन संचालक म्हणून नियुक्त केली. पटेल ॲटर्नी जनरल पाम बोंडी यांच्या नेतृत्वाखाली काम करतील, असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. FBI अमेरिकेतील वाढती गुन्हेगारी, स्थलांतरित गुन्हेगारी टोळ्यांचा नायनाट करेल आणि सीमेपलीकडून होणारी मानवी आणि अंमली पदार्थांची तस्करीही थांबवेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी केला आहे. दरम्यान ट्रम्प यांनी विश्वास दाखवत इतकी मोठी जबाबदारी टाकलेले काश पटेल नेमके आहेत तरी कोण, जाणून घेऊया…

नेमकं कोण आहेत काश पटेल?

काश पटेल यांचा जन्म न्यूयॉर्कमध्ये गुजराती अनिवासी कुटुंबात झाला होता. अमेरिकन मीडिया नुसार, काश पटेल ट्रम्प यांचे निकटपर्तीय मानले जातात. ट्रम्प यांच्यासोबत अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांची उपस्थिती होती. पटेल यांनी अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेवर “गव्हर्नमेंट गँगस्टर्स: द डीप स्टेट, द ट्रुथ अँड द बैटल फॉर अवर डेमोक्रसी” नावाचे एक पुस्तक लिहिलं आहे, ज्याची मीडियामध्ये मोठी चर्चा झाली होती.

काश पटेल यांच्या कुटुंबाने 1980 मध्ये पूर्व अफ्रिकेतून न्यूयॉर्कच्या क्वीन्समध्ये स्थलांतर केलं होतं. त्यांचे वडील गुजरातच्या बडोदामधील रहिवासी होते, कामानिमित्ताने निमित्ताने युगांडामध्ये स्थायिक झाले होते. पटेल एलएलबी आहेत आणि यापूर्वी त्यांनी फ्लोरिडामध्ये सरकारी वकील म्हणून काम केलं आहे. ट्रम्पच्या पहिल्या कार्यकाळात काश पटेल त्यांच्यासोबत होते. त्यावेळी पटेल हाऊस इंटेलिजन्स कमिटीचे अध्यक्ष होते आणि त्यानंतर ते ट्रम्पचे कार्यवाहक संरक्षण सचिव देखील राहिले आहेत.

डोनाल्ड ट्रम्प सध्याचे एफबीआय संचालक क्रिस्टोफर रे यांच्या कामावर खूश नाहीत. 2017 मध्ये ट्रम्प यांनी स्वत: त्यांची एफबीआयच्या संचालकपदी नियुक्ती केली. मात्र गोपनीय कागदपत्रांसंदर्भातील तपासात ट्रम्प यांच्यावर ज्या पद्धतीने कारवाई करण्यात आली त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे.

ट्रम्प यांच्या घोषणेनंतर काश पटेल यांनी एफबीआयमध्ये बदल करणार असल्याचं म्हटलं आहे. ज्यामध्ये FBI च्या गुप्तचर माहिती गोळा करण्याच्या पद्धतीत बदल करणे आणि मुख्यालयाची पुनर्बांधणी करण्याचं त्यांचे ध्येय आहे. एफबीआय आणि न्याय विभागाच्या जवळच्या सहकाऱ्यांना वरीष्ठ पातळीवर ठेवण्यासाठी ते प्रयत्नशिल असल्याचंही समजतं.

क्रिस्टोफर रे यांच्या जागी काश पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  2017 मध्ये ट्रम्प यांनी त्यांयी नियुक्ती केली होती परंतु ते अध्यक्ष आणि त्यांच्या सरकाऱ्यांच्या पसंतीस उतरले. जरी हे पद 10 वर्षांच्या कालावधीसाठी असलं तरी, ट्रम्प आणि एफबीआय यांच्यावर दीर्घकाळ चाललेली सार्वजनिक टीका, कोर्टात चाललेले खटले यामुळे  रे यांना काढून टाकणे अनपेक्षित असं काही नव्हतं. यात दस्तऐवजांसाठी त्याच्या फ्लोरिडा मालमत्तेचा शोध आणि त्याच्यावर आरोप लावण्यात आलेल्या दोन तपासांचाही समावेश असल्याचंही सांगितलं जात आहे.

Web Title: Who is kash patel who donald trump made us fbi director know it

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 01, 2024 | 02:55 PM

Topics:  

  • Donald Trump

संबंधित बातम्या

Japan China Tension: जपानची चीनला धडक! तैवानजवळ घातक क्षेपणास्त्रे तैनात; ट्रम्प यांच्या निर्णयाने आशियात वाढली भीती
1

Japan China Tension: जपानची चीनला धडक! तैवानजवळ घातक क्षेपणास्त्रे तैनात; ट्रम्प यांच्या निर्णयाने आशियात वाढली भीती

G-20 चं ३९ पानी घोषणा पत्र जाहीर अन् डोनाल्ड ट्रम्प यांचा उफळला संताप, कारण काय?
2

G-20 चं ३९ पानी घोषणा पत्र जाहीर अन् डोनाल्ड ट्रम्प यांचा उफळला संताप, कारण काय?

Russia-Ukraine War: ट्रम्पला नेमकं हवंय काय? ‘US Peace Plan’ वादाच्या पार्श्वभूमीवर Trumpचा युक्रेनला ‘असा’ अत्यंत स्फोटक सल्ला
3

Russia-Ukraine War: ट्रम्पला नेमकं हवंय काय? ‘US Peace Plan’ वादाच्या पार्श्वभूमीवर Trumpचा युक्रेनला ‘असा’ अत्यंत स्फोटक सल्ला

युद्धाची जोरदार तयारी सुरू! व्हेनेझुएलावर फुटणार अमेरिकेच्या क्रोधाचा ज्वालामुखी; trump चा लष्कराला आदेश…
4

युद्धाची जोरदार तयारी सुरू! व्हेनेझुएलावर फुटणार अमेरिकेच्या क्रोधाचा ज्वालामुखी; trump चा लष्कराला आदेश…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.