
G20 summit South africa adopts declaration despite US boycott
G-20 Summit News in Marathi : जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेत (South Africa) जोहान्सबर्ग येथील G-20 परिषदेचा समारोप झाला आहे. या परिषदेत भारत, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, यांसारख्या देशांनी आपला सहभाग नोंदवला होता. 20 वर्षात पहिल्यांदाच आफ्रिकन खंडात ही परिषद पार पडली. या परिषदेत जागतिक शांतता, हवामान बदल, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि दहशतवाद यांसारख्या मुद्यांवर चर्चा करण्यात आली.
जागतिक व्यासपीठावर नवे टेक-त्रिकुट! भारत-ऑस्ट्रेलिया-कॅनडाची ACITI भागीदारीची मोठी घोषणा
दरम्यान या परिषदेनंतर G-20 देशांनी 39 पानांचा व्यापक जाहीरनामा प्रसिद्ध केले आहे. मात्र यामुळे अमेरिकेने तीव्र संताप व्यक्त केला आहे. या जाहीरनाम्यानतील काही घोषमांमुळे अमेरिकेचा राग उफाळून आला आहे. या घोषणापत्राला थांबवण्याचा प्रयत्न देखील अमेरिकेने केला, पण तो अयशस्वी ठरला आहे.
या घोषणापत्रात G-20 देशांनी, उर्जा सुरक्षा, हवामान बदल, आपत्ती व्यवस्थापन आणि जागतिक विकासावर भर दिला आहे. तसेच यामध्ये वाढती, भू-राजकीय स्पर्धी, आर्थिक अस्थिरता आणि जागतिक तणावाचा उल्लेख करण्यात आला आहे. याला तोंड देण्यासाठी G-20 देशांनी एकता, समानता आणि स्थिरता हे पुढील पिढीसाठी आधारस्तंभ असल्याचे म्हटले आहे. दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरल रामाफोसा यांच्या अध्यक्षतेखाली परिषदेच्या प्रमुखांनी १२२ कलमी प्रस्ताव एकमताने स्वीकारला आहे.
दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी या परिषदेवर बहिष्कार टाकला होता. तसेच अमेरिकेचे अधिकृत प्रतिनिधी देखील या चर्चेसाठी सहभागी झाले नव्हते. यामुळे व्हाइट हाउसने या परिषदेला G-20 च्या कायद्याचे उल्लंघन म्हटले आहे. ट्रम्पच्या समर्थनार्थ अर्जेंटिनाचे अध्यक्ष जेवियर मेली यांनी देखील परिषदेवर बहिष्कार टाकला आहे. अमेरिकेने घोषणापत्रावर आक्षेप घेतला आहे.
Ans: G-20 परिषदेच्या घोषणापत्रावर अमेरिकेने संताप व्यक्त केला आहे. या परिषदेला अध्यक्ष ट्रम्प किंवा अमेरिकेचा कोणताही प्रतिनिधी उपस्थित नव्हता. यामुळे हे घोषणापत्र परिषदेच्या मूलभूत कायद्याचे उल्लंघन करणारे असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.
Ans: अमेरिकेसह ट्रम्प पाठोपाठ अर्जेंटिनाचे अध्यक्ष जेवियर मेली यांनी परिषदेवर बहिष्कार टाकला आहे.