Why is Venezuela poor despite having the largest oil reserves in world
Largest Oil Reserve Country in World : काराकास : सध्या अमेरिकेने दक्षिण अमेरिकन ड्रग्ज कार्टेल्सविरुद्ध लष्करी कारवाईची घोषणा केली आहे. अनेक अमेरिकन युद्धनौका आणि लढाऊ विमाने दक्षिण अमेरिकन देशांच्याभोवती गस्त घालत आहे. २ सप्टेंबर रोजी अमेरिकन नौदलाने व्हेनेझुलाच्या बोटीवर हल्ला केला होता. यामध्ये ११ नागरिक ठार झाले होते. ड्रग्ज तस्करी वरुन अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेन देश व्हेनेझुलामध्ये हा तणाव निर्माण झाला आहे. पण संबंध बिघडण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या अेक काळाुपासून अमेरिका आणि व्हेनेझुएलाचे संबंध तणापूर्ण आहेत. याचा फटका मात्र व्हेनेझुएलालाच्या तेल साठ्यांवर होत आहे.
व्हेनेझुएला हा जगातील सर्वाधिक तेलाचे भंडार असणार देश आहे. मात्र हा देश तरीही दारिद्र्य आणि महागाईने त्रस्त आहे.२०२३ पर्यंत या देशाकडे सुमारे ३०३ अब्ज बॅरल तेलसाठा असल्याचा अंदाज होता. तुलनेने सौदी अरेबियाकडे २६७ अब्ज, इराकणे २०८ अब्ज तर कॅनडाकडे १६३ अब्ज बॅरल साठा आहे. परंतु इतकी मोठी नैसर्गिक साधनसंपत्ती असूनही व्हेनेझुएलाची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट आहे.
काय आहेत यामागची कारणे?
ऑब्झर्वेटरी ऑफ इकॉनॉमिक कॉम्पलेसिटी (OEC) नुसार, २०२३ मध्ये व्हेनेझुएलाला ४.०५ अब्ज डॉलर्सचा तेल निर्यातीचा महसूल मिळाला होता. यामुळे व्हेनेझुएलाच्या तुलनेत सौदीर अरेबियाने १८१ अब्ज, अमेरिकेने १२५ अब्ज, रशियाने १२२ अब्ज डॉलर्स महसूल कमवला. यावकुन दिसून येते की, तेलाचा विपुल साठा असूनही प्रत्यक्ष उत्पादन आणि विक्री नगण्य पातळीवर आहे.
ब्रिटीश पथकाची तिहार तुरुंगाला भेट; माल्ल्या-नीरव मोदीसह फरार आरोपींना लवकरच भारतात आणणार?