गेल्या काही दिवसापासुन पाकिस्तान सतत आर्थिक संकटातून जात (Pakistan Economic Crisis) असून लोकांना दोन वेळच्या जेवणासाठी संघर्ष करावा लागतोय. एकतर आधीच वाढत्या लोक महागाईने (inflation) हैराण झाले आहेत. अशा परिस्थितीत मोफत धान्य मिळवण्यासाठी लोकांमध्ये अक्षरहा चढाओढ लागली आहे. त्यातच रमजानचा महिना असल्याने या पार्श्वभूमीवर शाहबाज शरीफ सरकार गरिबांना मोफत पीठ वाटप करत आहे. रविवारी मोफत पिठाचे वाटप सुरू असताना खैबर पख्तुनख्वामध्ये चेंगराचेंगरी झाली आणि त्यात अनेक लोक जखमी झाले.
[read_also content=”प्रेमाला नकार देणाऱ्या तरुणीच्या घरात तरुणाचा तमाशा! मुलीच्या वडिलांना घरात घुसून मारहाण https://www.navarashtra.com/crime/boy-beaten-girl-father-who-refused-his-love-nrps-378832.html”]
पाकिस्तानच्या वृत्तपत्र, एक्सप्रेस ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, रमजानच्या पार्श्वभुमीवर नागरिकांना मोफत धान्या वाटप करण्यात येत होत. मात्र, मर्दान येथील क्रीडा संकुलात मोफत पीठ वाटपासाठी कोणतीही नियम पाळले जात नव्हते. फुकट मिळणाऱ्या पिठासाठी पात्र असलेल्यांनाही प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी तासनतास रांगेत उभे राहावे लागले.
त्यामुळे संतप्त लोकांनी आंदोलन करत नौशेरा रोड अडवला. आंदोलनादरम्यान पोलिसांवर आणि क्रीडा संकुलाच्या गेटवर दगडफेक करण्यात आली. प्रत्युत्तरादाखल, पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्ज आणि हवाई गोळीबार केला, अनेक पाकिस्तानी जखमी झाले. या घटनेत अनेक महिला आणि वृद्धही बेशुद्ध झाले.
पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, दररोज शेकडो पिठाच्या पिठाची चोरी होत आहे. बनावट स्लिप देऊन गोरगरिबांना पिठाच्या पोत्या देण्याऐवजी बाजारात चढ्या भावाने विकल्या जात आहेत. जिल्हा प्रशासनाची प्रभावी तपासणी होत नसल्याने आणि कर्मचाऱ्यांच्या कथित सहभागामुळे दररोज डझनभर लोक मोफत पिठापासून वंचित राहत आहेत. पाकिस्तानमध्ये मोफत आणि अनुदानित पिठाच्या वितरणादरम्यान यापूर्वीही चेंगराचेंगरीच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये अनेकांचा मृत्यू झाल्याचीही माहिती समोर आली आहे.